Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
षट्चत्त्वारिंशत्तमं पर्व ।
जयः प्रासादमध्यास्य दन्तावलगतो मुदा । यदृच्छयान्यदालोक्य गच्छन्तौ खगदम्पती ॥१ हा मे प्रभावतीत्येतदालपन्नतिविह्वलः । रतिमेवाहितः सद्यः सहायीकृत्य मूर्छया ॥२ । तथा पारावतद्वन्द्वं तत्रैवालोक्य कामिनी। हा मे रतिवरेत्युक्त्वा सापि मूर्छामुपागता ॥ ३ वक्षचेटीजनक्षिप्रकृतशीतक्रियाक्रमात् । सद्यः कुमुदिनीवाप प्रबोधं शीतदीषितेः ॥ ४ हिमचन्दनसम्मिश्रवारिभिर्मन्दमारुतः । सोऽप्यमूर्टो दिशः पश्यन्मन्दमन्दं तनुत्रपः॥५ यूयं सर्वेऽपि सायन्तनाम्भोजानुकृताननाः । किमेतदिति तत्सवं जानानोऽपि स नागरः ॥६ अनेकानुनयोपायर्गोत्रस्खलनदुःखिताम् । सुलोचनां समाश्वास्य स्मरञ्जन्मान्तरप्रियाम् ॥७ आकारसंतिं कृत्वा तामेवालापयस्थितः । वञ्चनाचञ्चवः सर्वे प्रायः कान्तासु कामिनः ॥ तयोर्जन्मान्तरात्मीयवृत्तान्तस्मृत्यनन्तरम् । स्वर्गादनुगतो बोधस्तृतीयो व्यक्तिमीयिवान् ॥ ९
कोणी एके वेळी जयकुमार आपल्या प्रासादात बसून आनन्दाने गच्चीवर गेला. तेथे स्वच्छन्दाने जाणाऱ्या पक्ष्याच्या जोडप्याला पाहून 'अरेरे हे माझ्या प्रभावती' असे बोलून तो अगदी व्याकुळ झाला ब त्याचवेळी मूर्छने त्याला साहाय्य केले व त्याला आनंदित केले अर्थात् मूर्छमुळे त्याला दुःखाची जाणीव झाली नाही ॥ १-२॥
याचप्रमाणे तेथेच पारव्यांची जोडी पाहून जयकुमाराची स्त्री सुलोचना 'हे माझ्या रतिवरा' असे बोलून तीही मूच्छित झाली ॥ ३ ॥
चतुर अशा दासीनी शीघ्र इलाज केल्यामुळे जशी चन्द्राच्या उदयाने कमलिनी तत्काल फुलते तशी सुलोचना तत्काल शुद्धीवर आली ।। ४ ।।
कापूर व चंदनाने मिश्रित केलेल्या पाण्याने व मन्द अशा वाऱ्याने जयकुमार देखिल मूर्छारहित झाला. तो सर्व दिशाकडे पाहू लागला व हळु हळु त्याची लज्जा कमी झाली ॥५॥
__चतुर व सर्व जाणणारा असूनही त्या जयकुमाराने 'तुम्ही सर्व लोक सायंकाळच्या कमलाप्रमाणे म्लान मुखाचे का दिसता ? हे काय आहे ? ' असे त्याने विचारले ।। ६ ।।
___याचप्रमाणे नांवाची चूक झाल्यामुळे अर्थात् सुलोचना नांवाचा उच्चार करण्याच्या ऐवजी प्रभावती असे म्हटल्यामुळे दुःखी झालेल्या सुलोचनेचे त्यानी समाधान केले. मी पूर्वजन्मीच्या पत्नीचे स्मरण केले व अनेक अनुनय विनय आदिक उपायानी तिला समजावून सांगितले. आपला बिघडलेला चेहरा दाबून तिलाच बोलावीत बसला. यात आश्चर्य काय ? कारण कामी लोक प्रायः आपल्या प्रियेला फसविण्याच्या कामात निपुण असतात ।। ७-८ ॥
त्या दोघाना पूर्व जन्माच्या आपल्या वृत्तान्ताच्या स्मरणानन्तर स्वर्गात असताना जे अवधिज्ञान त्याना होते ते यावेळी त्याना व्यक्त झाले ॥ ९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org