________________
४५-२१९)
महापुराण
हृतसर सिजसारैरिष्टचेटीयमानैः । सततरतनिमित्तैर्जालमार्गप्रवृत्तेः ॥ मृदुशिशिरतरैः सम्प्रापतुस्तौ समीरैः । सुरतविरतिजात स्वेदविच्छेद सौख्यम् ॥ २१६ तां तस्य वृत्तिरनुवर्तयति स्म तस्याश्चैनं तदेव रतितृप्तिनिमित्तमासीत् । प्रेमापदत्र निजभावमचिन्त्यमन्त्यसातोदयश्च भवभूतिफलं तदेव ॥ २१७ कामोऽगमत्सुरतवृत्तिषु तस्य शिष्यभावं सुधीरिति रतिश्च सुलोचनायाः । को गर्वमुद्वहति चेन्न वृथाभिमानी । स्वेष्टार्थसिद्धिविषयेषु गुणाधिकेषु ॥ २१८ एवं सुखानि तनुजान्यनुभूय तौ च । नैवेयतुश्चिररतेऽप्यभिलाष कोटिम् ॥ furrष्टमिष्ट विपयोत्यसुखं सुखाय । तद्वीत विश्वविषयाय वृथा यतध्वम् ॥ २१९ इत्यार्षे त्रिषष्टिलक्षण महापुराणसग्रहे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीते जय-सुलोचना सुखानुभवव्यावर्णनं नाम पञ्चचत्वारिंशत्तमं पर्व समाप्तम् ।
त्या कुमाराची मनोवृत्ति तिचे अनुसरण करीत होती आणि तिची मनोवृत्ति कुमाराच्या मनोवृत्तीला अनुसरत होती. तेच त्यांच्या प्रेमाच्या तृप्तीचे स्थान झालेले होते. येथे प्रेम हे अज्ञेय - ज्याला जाणणे शक्य नाही अशा आपल्या स्वरूपाला प्राप्त झाले आणि प्रेमाच्या अगदी शेवटच्या सुखाचा उदय झाला व सुखाची उत्पत्ति होणे हेच जन्म व ऐश्वर्य यांचे फल आहे ॥ २१७ ।।
( ६२५
मदन हा चांगल्या बुद्धीचा असल्यामुळे सुरतक्रीडेच्या प्रवृत्तीत जयकुमाराचा शिष्य झाला आणि रति ही या सुलोचनेची शिष्या झाली होती. आपल्या इष्टपदार्थांची प्राप्ति होण्याच्या कामी ज्याचे गुण अधिक आहेत अशा मनुष्याविषयी कोण गर्व धारण करणार नाही बरे ? ।। २१८ ॥
याप्रमाणे अन्योन्य शारीरिक सुखाचा अनुभव घेणारे ते दोघे पुष्कळ दिवस सुरतसुखाचा अनुभव घेऊन देखिल इच्छेच्या समाप्तीला प्राप्त झाले नाहीत. अर्थात् त्यांची संभोगेच्छा अतृप्तच राहिली. म्हणून आवडत्या विषयापासून उत्पन्न होणान्या सुखाला धिक्कार असो. कारण ते अतृप्तीच उत्पन्न करते. म्हणून हे विद्वजनानो ज्यातील सर्व विषय नष्ट झाले आहेत अशा आत्मसुखासाठीच यत्न करा ।। २१९ ।।
म. ८२
याप्रमाणे भगवद्गुणभद्राचार्यप्रणीत या आर्षत्रिष्टिलक्षण महापुराणसंग्रहामध्यें जयकुमार आणि सुलोचना यांच्या सुखानुभवाचे विशेष वर्णन करणारे हे पंचेचाळीसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org