Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६२४)
महापुराण
(४५-२१२
प्रमाणकालभावेभ्यो यद्रतेः समता तयोः । ततः सम्भोगशङगारावारापारान्तगौ हि तो ॥ २१२ अतिपरिणतरत्या लोपितालेपनादिः । स सकलकरणानां गोचरीभूय तस्याः ॥ हितपरविषयाणां सापि तस्यैवमेतौ । समरतिकृतसाराण्यन्वभूतां सुखानि ॥ २१३ मनसि मनसिजस्यावापि सौख्यं न ताभ्याम् । पृथगनुगतभावः संगताभ्यां नितान्तम् ॥ करणमुखसुखैस्तैस्तन्मनः प्रीतिमापत् । भवति परमुखं च क्वापि सौख्यं सुतप्त्यै ॥ २१४ शिशिरसुरभिमन्दोच्छवासजैः स्वः समीरैः । मदुमधुरवचोभिः स्वादनीयप्रदेशः ॥ ललिततनुलताभ्यां मार्दवैकाकराभ्याम् । अखिलमनयतां तो सौख्यमात्मेन्द्रियाणि ॥ २१५
अवयवाचे प्रमाण, काल व भाव यामुळे या दोघांच्या रतिसुखात समता होती. म्हणून ते दोघे संभोगशृंगाराच्या समुद्राच्या अन्तापर्यन्त पोहोचलेले होते ।। २१२ ॥
अतिशय वृद्धि पावलेल्या रतिमुळे अंगाला लावलेल्या चन्दनाची उटी, याचप्रमाणे पुष्पमाला धारण करणे वगैरे बंद पडले. त्यामुळे तो जयकुमार तिच्या सर्व इन्द्रियांचा विषय बनला व ती सुलोचना देखिल जयकुमाराचे हित करणाऱ्या सर्व विषयात तत्पर होती. याप्रमाणे हे दोघे समान प्रेम करणे हाच सारभाग ज्यात आहे अशा सुखांचा अनुभव घेऊ लागले ॥ २१३ ॥
दोघांच्या अन्तःकरणात उत्पन्न झालेल्या वेगवेगळया परिणामानी त्यानी- त्या दोघानीही अन्तःकरणात मदनाचे सुख-कामसुख बिलकुल अनुभवले नाही. कारण एकमेकांची इन्द्रिये हीच ज्याची द्वारे आहेत अशा प्रकारच्या सुखानीच त्यांचे मन सन्तुष्ट होत होते. बरोबर आहे की दुसऱ्यांच्या द्वारे मिळणारे सुख काय कोठे तरी अतिशय तृप्तीला कारण होत असते काय ? ॥ २१४ ॥
शीतल, सुगन्धित आणि मंद अशा श्वासापासून उत्पन्न होणाऱ्या वायूनी नम्र आणि गोड अशा भाषणानी, रुचि घेण्याला योग्य अशा अधरोष्ठ वगैरे अवयवानी व मृदुपणाची जणु खाण अशी जी एकमेकांची शरीरे, यांच्या द्वारे त्या दोघानी, आपल्या इन्द्रियाना व आत्म्याला सर्व प्रकारची सुखे दिली ॥ २१५ ॥
ज्यानी कमलातील उत्कृष्ट सुगन्धाला हरण करून आणले आहे, जे नेहमी रति सुखाला कारण आहेत, खिडकीच्या मार्गाने वाहणारे, आवडत्या नोकराप्रमाणे असलेले मृदु व अधिक थंड अशा वाऱ्यानी त्या दोघानी संभोगक्रीडेच्या समाप्तीमुळे उत्पन्न झालेला घाम सुकल्यामुळे उत्पन्न झालेल्या सुखाला त्यानी भोगले ॥ २१६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org