Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-१४२)
महापुराण
(५२५
सुमत्याख्यामला शुक्लनिशेवावर्द्धयत्कलाः । धात्री शशाङ्करेखायास्तस्याः सातिमनोहरा ॥ १३७ अभद्रागी स्वयं रागस्तत्क्रमाजं समाश्रितः। रागाय कस्य वा न स्यात् स्वोचितस्थानसंधय ॥१३८ नखेन्दुचन्द्रिकातस्याः शश्वत्कुवलयं किल । विश्वमाह्लादयच्चित्रमनुवृत्त्या क्रमाब्जयोः ॥ १३९ रेजुरङगुलयस्तस्याः क्रमयोर्नखरोचिषा । इयन्त इति मद्वेगाः स्मरेणेव निवेशिताः ॥ १४० नताशेषो जयः स्नेहादनंसीते ततस्तयोः । याः श्रीः क्रमाब्जयोस्तस्याः सा किमस्ति सरोरुहे ॥१४१ न स्थूले न कृशे न— न वक्रे न च सङ्कटे । विकटे न च तज्जो शोभान्यवेनयोरसौ ॥ १४२
शुक्लपक्षातील निर्मलरात्र जशी प्रतिपदेच्या चन्द्राच्या रेखेला कलाकलांनी वाढविते तशी सुमति नांवाची दाई या सुलोचना कन्येच्या अति सुन्दर अशा कलांना वाढवित असे ॥ १३७॥
तिच्या चरणकमलाचा ज्याने आश्रय घेतला आहे असा राग (तांबडा वर्ण) तांबडी कान्ति स्वतः रागी-तिच्यावर राग-प्रेम करू लागला. बरोबरच आहे की, स्वतःला योग्य अशा स्थानाचा लाभ तिला झाला आहे अशी कोणती व्यक्ति रागी प्रेमयुक्त होणार नाही बरे ? अर्थात् योग्य आश्रय मिळाला म्हणजे कोणतीही वस्तु सुंदर दिसते ॥ १३८ ॥
. तिच्या नखरूप चन्द्राची कान्ति दोन चरणकमलांना अनुकूल राहून देखिल सम्पूर्ण कुवलयाला-नीलकमलांना अथवा पृथ्वीमण्डलाच्या आनंदाला नेहमी विकसित करीत होती. तात्पर्य- चन्द्राचे चांदणे कमलाला अनुकूल असत नाही ते त्याला मिटविते परन्तु सुलोचनेच्या नखरूपी चन्द्राचे चांदणे तिच्या चरणकमलांना अनुकूल राहूनही कुवलयाला नीलकमलांना विकसित करीत होते हे आश्चर्यकारक होते ।। १३९ ॥
तिच्या दोन पायांच्या नखांच्या कान्तीनी तिच्या पायांची दहा बोटे शोभत होती जणु मदनाने माझे वेग इतके आहेत हे दाखविण्याच्या हेतूने त्यांची स्थापना केली आहे असे वाटते. ( ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला मदनबाधा होते ती दहा प्रकारची होते. त्या दहा बाधा अशा- १) चिन्ता, २) स्त्री-पुरुषांना एकमेकांना पाहण्याची इच्छा, ३) मोठ्याने श्वासोच्छ्वास करणे, ४) ज्वर, ५) अंगात दाह होणे, ६) अरुचि, ७) मूर्छा, ८) उन्मत्तपणा, ९) जगण्याविषयी संशय, १०) मृत्यु, या मदनाच्या दहा अवस्था होत ॥ १४० ॥
ज्याला सर्व नमस्कार करतात असा हा जयकुमारही प्रेमाने तिच्या चरणकमलांना नमस्कार करीत होता. यास्तव तिच्या चरणकमलात जी शोभा होती ती त्या कमलांच्या ठिकाणी असू शकते काय ? अर्थात् असणार नाही ।। १४१ ॥
त्या सुलोचना सतीच्या मांड्या स्थूलही नव्हत्या व कृशही नव्हत्या. त्या सरळही नव्हत्या व वाकड्याही नव्हत्या. त्या एकमेकीला चिकटलेल्याही नव्हत्या व अगदी विलगही पण नव्हत्या. अशा त्या दोन मांड्यांची शोभा कांही वेगळीच होती ।। १४२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org