Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४३-२८२)
महापुराण
(५४१
कावेरीवारिजास्वादप्रहृष्टाण्डजनिर्भरक्रीडोच्छलज्जलस्थूलकणमुक्तातिभूषणम् ॥ २७१ दक्षिणानिलमायल्लकात्कटानलदीपनम् । कोकिलालिकलालापर्वाचालमनुकूलयन् ॥ २७२ योषितां मधुगण्डूष पुरारावरञ्जितैः । कुर्वन्वामाघ्रिभिश्चालमहघ्रिपानपि कामुकान् ॥ २७३ कौसुमं धनरादाय वामेनारूढविक्रमः । चूतसूनं करेणोच्चैः परेण परिवर्तयन् ॥ २७४ वसन्तानुचरानीतनिःशेषकुसुमायुधः । जित्वा तदाखिलान्देशानप्यायात्कुसुमायुधः ॥ २७५ तदा पुरात्समागत्य कृती जितपुरन्दरः । समाविर्भूतसाम्राज्यो राज्यचिह्नपुरःसरः ॥ २७६ स्वलक्ष्मीव्याप्तसर्वाशः सुप्रभासहितः पतिः । स्वस्थान्स्वयंवरागारे स्वोचिते स्वजनैर्वृतः ॥ २७७ चित्रं महेन्द्रवत्ताख्यो देवदत्तं रथं पृथुम् । सज्जीकृतं समारोप्य कन्यामायात्तु कञ्चुकी ॥ २७८ समस्तबलसन्दोहं सम्यक्सन्नाह्य सानुजः । हेमाङ्गदो जितानङ्गःप्रीत्यायात्परितो रथम् ॥ २७९ तूर्यध्वानाहतिप्रेङ्कदिक्कन्याकर्णपूरिका । सञ्छन्नच्छत्रनिश्च्छिद्रच्छायाच्छादितभास्करा ॥ २८० लक्ष्मीः पुरीमिवायोध्यां चक्रिदिग्विजयागमे । शालां प्रविश्य राजन्यलोचनाा सुलोचना ॥२८१ सर्वतोभद्रमारुह्य कञ्चुकिप्रेरिता नपान् । न्यषिञ्चल्लोचनर्लोलर्नीलोत्पलदलैरिव ॥ २८२
देशांना जिंकून त्या ठिकाणी आला. अर्थात् सर्व राजांच्या मनात सुलोचनेविषयी इच्छा उत्पन्न झाली ।। २६९-२७५ ॥
त्यावेळी ज्याने इन्द्राला जिंकले आहे, ज्याचे साम्राज्य प्रकट झाले आहे, असा पुण्यवान् आपल्या लक्ष्मीच्या द्वारे ज्याने सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या आहेत असा तो अकम्पन राजा राणी सुप्रभेसहित व आपल्या परिवार जनासह स्वयंवर मण्डपात आला व राज्यचिह्न-छत्र, चामरे या चिह्नांनी युक्त होऊन स्वयोग्यस्थानी विराजमान झाला ।। २७६ ॥
त्यावेळी महेन्द्रदत्त या नांवाच्या कञ्चुकीने देवाने दिलेला आश्चर्यकारक असा मोठा रथ सज्ज केला व त्यात त्याने कन्येला बसविले व तो स्वयंवरमण्डपात आला ॥ २७७-२७८॥
त्याचवेळी ज्याने आपल्या रूपगुणाने कामाला जिंकले आहे असा हेमांगद राजपुत्र आपल्या धाकट्या भावांना बरोबर घेऊन व सुलोचनेच्या रथाला घेऊन निघाला. त्यावेळी त्याने आपले सर्व सैन्यही सज्ज करून आपल्या बरोबर घेतले होते ॥ २७९ ।।
त्यावेळी नाना प्रकारच्या वाद्यांच्या शब्दांच्या आघाताने दिक्कन्यांच्या कानातील कर्णपूरनामक आभूषणे हालू लागली. विस्तीर्ण छत्राच्या छिद्ररहित दाट सावलीने जिने सूर्याला आच्छादले आहे, अशा त्या सुलोचनेने चक्रवर्ती भरत दिग्विजय करून परत आला असता त्याच्या राजलक्ष्मीने जसा अयोध्येत प्रवेश केला तसा स्वयंवरमंडपात प्रवेश केला व सर्व राजवृन्दाच्या डोळ्यानी ती पूजिली गेली म्हणजे सर्व राजांनी तिला पाहिले ॥ २८०-२८१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org