Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-१२४)
महापुराण
(५६५
ऋजुत्वादूरदर्शित्वात्सद्यः कार्यप्रसाधनात् । शास्त्रमार्गानुसारित्वाच्छराः सुसचिवैः समाः ॥ १२० ऋव्यास्रपायिनः पत्रवाहिनी दूरपातिनः । लक्ष्येषूड्डीय तीक्ष्णास्याः खगाः पेतुः खगोपमाः ॥ १२१ धर्मेण गुणयुक्तेन प्रेरिता हृदयं गता । शूरान्शुद्धिरिवानषीदगति पत्रिपरम्परा ॥ १२२ पुंसां संस्पर्शमात्रेण हृद्गता रक्तवाहिनी । क्षिप्रं न्यमीलयनेत्रे वेश्येव विशिखावली ॥ १२३ त्यक्त्वेशं खेचरातातिवृष्टो गृध्रतमस्ततौ । परोऽन्विष्य शरावल्या जारयेव वशीकृतः ॥ १२४
ते बाण उत्तम मन्त्र्याप्रमाणे होते. उत्तम मंत्री ऋजु-सरळ मायाचाररहित तसे ते बाणही ऋजु सरळ होते. मंत्री दूरदर्शी असतात अर्थात् भावीकालाच्या गोष्टीना चांगले जाणतात तसे ते बाण दूरदर्शी- दूर जाऊन लक्ष्य भेदन करीत असत. मंत्री तत्काल शीघ्र कार्यसिद्धि करतात तसे बाणही दूर जाऊन शत्रुभेदन करतात. जसे मंत्री राजनीतीच्या शास्त्राला अनुसरून वागतात तसे ते बाण देखिल धनुर्विद्येला अनुसरून होते ॥ १२० ॥
मांस आणि रक्त पिणारे, (अर्थात् ज्याच्या अग्रभागाला रक्त व मांस लागले आहे असे, पंखाना धारण करणारे, बाणाच्या शेवटाला पक्षाचे पंख लावतात) जे दूर जाऊन पडतात, ज्यांची तोंडे तीक्ष्ण आहेत असे, खग-बाण खगोपम- पक्ष्याप्रमाणे उडून आपल्या लक्ष्यावर पडत असत ॥ १२१ ॥
जे गुणवान् अशा धर्माने युक्त आहेत, सर्वज्ञाने सांगितलेल्या धर्माने युक्त आहेत. दुसरा अर्थ- गुणयुक्त -दोरीने युक्त अशा धर्मेण -धनुष्याने सहित आहेत व त्या धनुष्याने ज्याना प्रेरणा केली आहे म्हणजे धनुष्यापासून सुटलेले व हृदयंगता-मनात शिरलेला दुसरा अर्थ वक्षःस्थलात घातलेली अशी पत्रिपरंपरा-बाणाची पंक्ति शूराना शुद्धीप्रमाणे स्वर्गास नेती झाली. युद्धातून पळून न जाता जो लढतो तो स्वर्गास जातो अर्थात् आपल्या शुद्ध परिणामानी मरण पावलेला वीरपुरुष स्वर्ग मिळवितो ॥ १२२ ॥
नुसता स्पर्श झाल्याबरोबर पुरुषांच्या (शत्रूच्या) हृद्गता हृदयतात - मनात दुसरा अर्थ उरात-छातीत शिरलेली व रक्तवाहिनी-प्रेम दाखविणारी दुसरा अर्थ रक्ताला वाहविणारी अशी ती बाणांची पंक्ति वेश्येप्रमाणे त्वरेने डोळे मिटावयास लावीत होती. वेश्या आपल्या स्पर्शाने होणाऱ्या आनन्दाने त्वरेने पुरुषाला डोळे मिटावयास लावते व ही बाणपंक्ति हृदयात शिरूम योद्धयाचे रक्त वाहविते व त्याला डोळे मिटावयास लावते अर्थात् बाणपंक्ति शिरून वीर मरण पावत होते ॥ १२३ ।।
विद्याधरांच्या रक्तांची अतिशय वृष्टि होत असतां, जणु जारिणी स्त्रीप्रमाणे असलेल्या बाणपंक्तीने आपल्या स्वामीचा-पतीचा त्याग करून (जो बाण सोडतो तो त्या बाणपंक्तीचा स्वामी होय ) परपुरुष - जार दुसरा अर्थ शत्रु ) त्याला हुडकून वश केले. अर्थात् त्याला निश्चेष्ट केले ॥ १२४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org