________________
४५-१८१)
महापुराण
सवप्रजघनाभोगां वापीकूपोरुनाभिकाम् । परीतजातरूपोच्चप्राकारकटिसूत्रिकाम् ॥ १७२ अलडकृतमहावीथीविलसद्बाहुवल्लरीम् । सौधोत्तुङगकुचां भास्वद्गोपुराननशोभिनीम् ॥ १७३ कुडकुमागुरुकर्पूरकर्दमादितगात्रिकाम् । नानाप्रसवसन्दृब्धमालाधम्मिल्लधारिणोस् ॥ १७४ तोरणाबद्धरत्नादिमालालङकृतविग्रहाम् । आह्वयन्तीमिवोधिः पतत्केत्वग्रहस्तकः ॥ १७५ द्वारासंवृतिविश्रम्भनेत्रां वासान्तरुत्सुकाम् । पुरोहितः पुरन्ध्रीभिर्मन्त्रिभिनैश्यविश्रुतः ॥ १७६ दत्त शेषः पुरः स्थित्यासाशीर्वादैः समुत्सुकैः । तूर्यमङ्गलनिर्घोषः पुरन्दर इवापरः ॥ १७७ सुलोचनामिवान्यां स्वां प्रविश्य नगरी जयः । आवसत्कान्तया साधं नगर्या हृदयं मुदा ॥ १७८ राजगेहं महानन्दविधायि विविद्धिभिः । तिथ्यादिपञ्चभिः शुद्धः शुद्धे लग्ने महोत्सवे ॥ १७९ सर्वसन्तोषणं कृत्वा जिनपूजापुरःसरम् । विश्वमङ्गलसम्पत्त्या स्वोचितासनसुस्थिताम् ॥ १८० हेमाङगदादिसानिध्ये राजा जातमहोदयः। सुलोचनां महादेवी पट्टबन्धं व्यपान्मुदा ॥ १८१
उत्तम जो धूलिसाल हाच जिचा ओटीचा विस्तृत प्रदेश आहे अशी, लांबट विहिरी व आड हेच जिची विस्तृत बेंबी आहे अशी, सभोवती असलेला जो सोन्याचा उंच तट तोच जिचा कंबरपट्टा आहे, सुंदर रचनायुक्त अशा ज्या अनेक गल्ली त्याच जणु जिचे हात आहेत अशी, मोठे जे वाडे हेच जिचे उंच स्तन आहेत अशी, सुशोभित जी वेस तीच जणु मुख त्याने शोभणारी केशर, अगुरु व कापूर यांच्या उटीने जणु जिचे शरीर ओलसर दिसत आहे, अनेक प्रकारच्या पुष्पमालारूपी केशपाश जिने धारण केला आहे अशी, तोरणाला बांधलेल्या ज्या रत्नांच्या व मोत्यांच्या माळा त्यानी जी सुंदर दिसत आहे, वर व खाली फडफडणाऱ्या पताकांचे अग्रभाग हेच जणु हात त्यानी जणु जी बोलावित आहे, उघडलेले जे दरवाजे हेच जिचे जणु विश्वास उत्पन्न करणारे नेत्र आहेत अशी जिच्या प्रत्येक घरात उत्सव चालला आहे अशी ही नगरी जणु दुसरी सुलोचना आहे अशी दिसत होती. अशा नगरीतले पुरोहित, सौभाग्यवती स्त्रिया, मन्त्रिगण व प्रसिद्ध असे वैश्य हे जयकुमाराचे दर्शनासाठी व त्याला आशीर्वाद देण्यासाठी उत्कण्ठित झाले होते. त्यांचा आशीर्वाद घेणारा हा जयकुमार जणु दुसरा इन्द्र आहे असा भासला. अतिशय आनन्द देणाऱ्या व नानाप्रकारच्या ऋद्धीनी सहित अशा त्या नगरीत-हस्तिनापुरात नानाप्रकारच्या वाद्यांच्या मंगलघोषासहित जयकुमाराने सुलोचनेसह प्रवेश केला व नगरीचे जणु हृदय अशा राजभवनात प्रिया सुलोचनेबरोबर मोठ्या आनंदाने निवास केला ।। १७२-१७८ ॥
तिथि, वार, नक्षत्र, योग, करण यानी शुद्ध असलेल्या शुभमुहूर्तावर मोठा उत्सव करून जयकुमाराने प्रथमतः सर्वमंगल वस्तूनी जिनेश्वराची पूजा केली. नंतर आपल्या योग्य आसनावर बसलेल्या सुलोचनेला तिचे हेमांगदादि भाऊ समक्ष असताना ज्याचा मोठा उत्कर्ष झाला आहे अशा जयकुमाराने महादेवीचे पट्टबंधपद अर्पण केले. अर्थात् पट्टराणीला योग्य असा अलंकार तिच्या मस्तकावर बांधला. बरोबरच आहे की ज्यानी पुण्यसंचय केला आहे अशा स्त्रियावर पतीचे एवढे प्रेम असतेच ।। १७९-१८१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org