Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५-१६५)
महापुराण
(६१७
...................
वसन्ततिलकोद्याने क्रीडन्ती सैकदा दिवा । दष्टा तत्र मया दत्तनमस्कारपदान्यलम् ॥ १५५ भावयन्ती मृतात्रेयं भूत्वायान्स्नेहिनी मयि । इत्यववीदतौ सोऽपि ज्ञात्वा सन्तुष्टचेतसा ॥ १५६ तत्कालोचितसामोक्त्या गडगादेवी विसर्म्य ताम् । सबलाकं प्रकुर्वन्तं खंचलत्केतुमालया ॥ १५७ स्वावासं सम्प्रविश्योच्चैः सप्रियः सह बन्धुभिः। सस्नेहं राजराजोक्त्वामुत्क्वातत्प्रहितं स्वयम् ॥१५८ पृथक् पृथक् प्रदायाति मुदमासाद्य वल्लभाम्।नीत्वा तत्रैव तां रात्रि प्रातरुत्थाय भानुवत् ॥१५९ विषातुमनुरक्तानां भुक्तिमुधोतिताखिलः । अनुगडगं प्रयान्प्रेम्णा कमिन्याः कुरुवल्लभः ॥ १६० कमनीयैरतिप्रीतिमालापरतनोत्तराम् । जाह्नबी दर्शितावर्तनाभिः कूलनितम्बिका ॥ १६१ चटुलोज्ज्वलपाठीनलोचना रमणोन्मुखी । तरङगबाहुभिगाढमालिङगनसमुत्सुका ॥ १६२ स्वभावसुभगा दृष्टहृदया स्वच्छतागुणात् । तटद्वयवनोत्फुल्लसुमनोमालभारिणी ॥ १६३ अभिवृद्धरसावेगं सन्धर्तुमसहा द्रुतम् । पश्य कान्ते प्रियं याति स्वानुरूपं पयोनिधिम् ॥ १६४ रतेः कामाद्विना नेच्छा न नीचेषतमस्पृहा । सङगमे तन्मयी जाता प्रेम नामेवृशं मतम् ॥ १६५
ती एके दिवशी दिवसा वसन्ततिलक नामक बगीचात खेळत असता एक सर्प तिला चावला, त्यावेळी मी तिला पंचपरमेष्ठिमन्त्र सांगितला. तिने अतिशय भक्तीने त्या मंत्राचे चिन्तन केले व ती मरण पावली आणि ती तेथे गंगादेवता झाली. माझ्यावरील स्नेहामुळे येथे आली. याप्रमाणे सुलोचनेने सांगितल्यावर जयकुमाराच्या मनाला फार आनंद वाटला ॥ १५५-१५६ ॥
त्यावेळी त्या प्रसंगाला योग्य असे जयकुमाराने मधुर भाषण केले व त्याने तिला निरोप दिला. चंचल अशा ध्वजमालेने सर्व आकाश जणु बगळयानी युक्त करणारा असा तो जयकुमार आपल्या पत्नीसह व आपल्या सर्व हितका मित्र-बान्धवासह आपल्या निवासस्थानी आला. सर्व राजांच्या अधिपतीने अर्थात् भरतेश्वराने स्नेहपूर्वक जे भाषण केले होते ते त्याने सर्वाना सांगितले आणि त्याने वस्त्रालंकारादिक दिले होते ते वेगळे वेगळे देऊन त्याने आपल्या पत्नीला-सुलोचनेला अतिशय आनन्दित केले व ती रात्र त्याने त्याच ठिकाणी घालविली व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे उदरपोषणासाठी ज्याने सर्व विश्व प्रकाशित केले आहे अशा सूर्याप्रमाणे तत्काळी उठून तो कुरुवल्लभ जयकुमार आपल्या पत्नीसह गंगेच्या किनाऱ्याला अनुसरून प्रयाण करून तिला त्याने अत्यन्त सन्तुष्ट केले ॥ १५७-१६० ॥
__ पाण्यात उत्पन्न होणारे भोवरे हेच जणु बेंबी, तिला ही गंगानदी दाखवित आहे. दोन्ही किनारे हेच जणु ढुंगण आहे. चंचल व चमकणारे असे जे मासे हेच जिचे डोळे आहेत, अशी ही नदी क्रीडा करण्यास उत्सुक झाली आहे आणि आपल्या तरंगरूपी बाहुनी गाढ आलिंगन देण्यास उत्सुक झाली आहे. ही स्वभावाने सुन्दर आहे व स्वच्छतागुण धारण करीत असल्यामुळे हिचे हृदय सर्वाना स्पष्ट दिसत आहे. आपल्या दोन्ही किनाऱ्यावरील वनात प्रफुल्ल झालेल्या पुष्पांच्या माला ही धारण करीत आहे. जिचा रस-प्रेम व पाणी यांच्या वेगाला धारण करण्यास-आटोक्यात ठेवण्यास ही असमर्थ झाली आहे. अशी गंगानदी आपणास अनुरूप अशा म.८१
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org