________________
४५-१४५)
महापुराण
पुराद्गजं समारुह्य निष्क्रम्येप्सुमनःप्रियाम् । सद्यो गङ्गां समासन्नः स्वमनोवेगचोदितः ॥ १३८ शुष्कभूरुहशाखाग्ने सम्मुखीभूय भास्वतः । रुवन्तं ध्वाङक्षमालोक्य कान्तायाश्चिन्तयन्भयम् ॥१३९ मूच्छितः प्रेमसद्भावात्तादृशो षिक् सुखं रतेः । समाश्वास्य तदोपायः सुखमास्ते सुलोचना ॥१४० जलाभयं भवेत्किञ्चिदस्माकं शकुनादितः । इत्युदोर्येगितज्ञेन शकुनझेन सान्त्वितः॥ १४१ सुरदेवस्य तद्वाक्यं कृत्वा प्राणावलम्बनम् । व्रजन्स सत्वरं मोहादतीर्थेऽचोदयद्गजम् ॥ १४२ हेयोपेयविवेकः कः कामिनां मुग्धचेतसाम् । उत्पुष्करं स्फुरद्दन्तं प्रोद्यत्तत्प्रतिमानकम् ॥ १४३ तरन्तं मकराकारं मध्येह्नदमिभाधिपम् । देवी कालोति पूर्वोक्ता सरय्वाः सङ्गमेऽग्रहीत् ॥ १४४ नक्राकृत्या स्वदेशस्थः क्षुद्रोऽपि महतां बली । दृष्ट्वा गजं निमज्जन्तं प्रत्यागत्य तटे स्थिताः ॥१४५
त्यावेळी, नागरिक लोक व याचकांचा समूह जयकुमाराच्या साहसाची स्तुति करू लागले. यानन्तर जयकुमार अयोध्या शहरातून हत्तीवर बसून निघाला व आपल्या आवडत्या स्त्रीला पाहण्यास तो उत्कंठित झाला. आपल्या मनोवेगाने प्रेरिला गेलेला तो जयकुमार लौकरच गंगानदी जवळ येऊन पोचला ।। १३८ ।।
__ सुकलेल्या झाडाच्या एका फांदीच्या अग्रभागी एक कावळा सूर्याकडे तोंड करून रडत असलेला जयकुमाराने पाहिला व त्याला आपल्या प्रियेला कांहीं भीति आहे असे वाटले. तो जरी धैर्यशाली होता तरीही सुलोचनेवरील प्रेमाने तो मूच्छित झाला. येथे आचार्य म्हणतात. अशा प्रेमापासून उत्पन्न होणाऱ्या सुखाला धिक्कार असो. त्यावेळी उपायांनी त्याची मूर्छा दूर करून त्याला सावध केले व सुलोचना सुखात आहे असे सांगितले ।। १३९-१४० ॥
त्यावेळी एका शकुन जाणत्या शहाण्याने सांगितले की, आम्हाला पाण्यापासून थोडेसे भय उत्पन्न होईल असे या शकुनावरून वाटते. असे म्हणून जयकुमाराचे हृद्गत जाणणाऱ्या त्या शकूनज्ञाने जयकुमाराला शान्त केले. सुरदेवाचे शकनज्ञाचे ते वाक्य जयकुमाराला प्राण टिकण्याला आधारभत वाटले व त्याने तेथन शीघ्र प्रयाण केले व जेथे जाण्या-येण्याची रहदारी नाही अशा ठिकाणी हत्तीला त्याने प्रेरिले ।। १४१-१४२ ।।।
ज्यांची अन्तःकरणे विवेकशून्य झाली आहेत अशा कामी लोकाना टाकाऊ कोणते व ग्राह्य कोणते याचा विवेक-विचार कसा असू शकेल ? ज्याने आपल्या सोंडेचा अग्रभाग वय आकाशात उंच केला आहे व ज्याचे दात चमकत आहेत आणि ज्याच्या तोंडाचा भाग थोडासा वर दिसत आहे, त्यामुळे जो तरंगत असलेल्या सुसरीच्या आकाराप्रमाणे भासत आहे असा तो मोठा हत्ती त्या गंगानदीच्या डोहात जेथे सरयू नदीचा गंगेशी संगम झाला आहे, तेथे (जिचे पूर्वी वर्णन केलेले आहे) अशा कालीदेवीने सुसरीचे रूप धारण करून पकडले. बरोबरच आहे की, आपल्या स्थानी राहणारा क्षुद्र प्राणी देखिल मोठ्यानाही जबरदस्त होतो, हत्ती बुडत आहे असे पाहून तटावर असलेले हेमांगदादिक राजकुमार डोहाजवळ येऊन त्यानी त्वरेने डोहात प्रवेश केला. सुलोचनेने देखिल त्याना पाहिले व ती मनात पंचनमस्कारमंत्राचे स्मरण करू लागली ॥ १४३-१४५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org