Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
“६२०)
महापुराण
(४५-१८२
स्त्रीष सञ्चितपुण्यासु पत्युरेतावती रतिः । हेमाङगदं ससोदर्यमुपचर्य स सम्भ्रमम् ॥ १८२ पुरोभूय स्वयं सर्वैर्भाग्यः प्राघूर्णकोचितैः । नृत्यगीतसुखालापर्बारणारोहणादिभिः ॥ १८३ वनवापीसर:क्रीडाकन्दुकादिविनोदनः । अहानि स्थापयित्वैवं सुखेन कतिचित्कृती ॥ १८४ तदीप्सितगजाश्वास्त्रगणिकाभूषणादिकम् । प्रदाय परिवारं च तोषयित्वा यथोचितम् ॥ १८५ चतुर्विषेन कोशेन तत्पुरीं तमजीगमत् । सुखप्रयाणः सम्प्राप्य दृष्ट्वा भूपं ससुप्रभम् ॥ १८६ प्रणम्याह्लादयन्नस्थात् स वधूवरवार्तया । सुखं काले गलत्येवमकम्पनमहीपतिः ॥ १८७ तवा सञ्चिन्तयामास विरक्तः कामभोगयोः । अहो मया प्रमत्तेन विषयान्धेन नेक्षिता ॥ १८८ कष्टं शरीरसंसारभोगनि:स्सारता चिरम् । आदावशुच्युपादानमशुच्यवयवात्मकम् ॥ १८९ विश्वाशुचिकरं पापं दुःखं दुश्चेष्टितालयम् । निरन्तरत्रवोत्कोथनवद्वारशरीरकम् ॥ १९०
हेमांगदादि जे त्याचे मेहुणे होते स्वतः त्यांच्या पुढे होऊन जयकुमाराने त्यांचा चांगला आदर केला. अर्थात् पाहुण्याना योग्य अशा सर्वभोग्य वस्तुनी त्याने संतुष्ट केले. नृत्य, गीत, मधुर, सुखदायक भाषण, हत्तीवर बसून विहार करणे, वनविहार करणे, लांबट विहीर, सरोवर, यात क्रीडा करणे, चेण्डू वगैरेनी खेळणे इत्यादिकानी त्याने त्याना आनंदित केले. अशा रीतीने सेवा करून काही दिवस त्या कुशल जयकुमाराने आपल्या घरी सुखाने ठेविले. यानंतर त्याने त्याना इच्छित असे हत्ती, घोडे, अस्त्रे, गणिका-दासी, वस्त्रालङकार आदिक दिले. त्यांच्या परिवार लोकानाही यथायोग्य सन्तुष्ट केले आणि बरोबर चार प्रकारचा कोश दिला अर्थात् (रत्ने, सोने, चांदी, नाणी) व त्यांच्या नगरीला पाठवून दिले ॥ १८२-१८५ ॥
हेमांगदादिकुमार सुखाने काही मुक्काम करून सुप्रभाराणीसह असलेल्या राजा अकम्पनाकडे आले आणि त्यानी त्याना नमस्कार करून वधू-सुलोचना व वर-जयकुमार यांची सर्व कुशल वार्ता सांगून आनन्दित केले ।। १८६ ।।
याप्रमाणे सुखाने काल जात असता अकम्पन महाराजाना काम व भोग यामध्ये अर्थात् पंचेन्द्रियाच्या सुखाविषयी विरक्ति उत्पन्न झाली व त्यानी याप्रमाणे विचार केला ॥ १८७ ॥
अरेरे मी पंचेन्द्रियांच्या विषयात आंधळा बनलो, विचारशून्य बनलो आणि दीर्घकालपर्यन्त शरीर, संसार व भोगांचे पदार्थ यातील निःसारपणाला जाणले नाही. ही खेद करण्याची गोष्ट मजकडून घडली ॥ १८८ ॥
हे शरीर अपवित्र-घाण अशा शुक्र व शोणित या कारणापासून उत्पन्न झाले आहे व हे शरीर अपवित्र अवयवानी बनले आहे व सर्व पदार्थाना अपवित्र करणारे आहे. पाप उत्पन्न करणारे आहे आणि दुःखे व पापरूपी क्रियांचे स्थान आहे ।। १८९ ॥
ज्याच्या नवद्वारांतून नेहमी दुर्गंध वाहत आहे असे हे शरीर किड्यांच्या समुदायाने भरलेले, चितेतील राख व विष्ठा यांनी युक्त होणारे व नाश पावणारे आहे ॥ १९० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org