________________
४५-१९७)
महापुराण
(६२१
कृमिपुञ्जचिताभस्मविष्ठानिष्टं विनश्वरम् । तवध्युष्य जडो जन्तुस्तप्तः पञ्चेन्द्रियाग्निभिः ॥१९१ विश्वेन्षनः फुलिङ्गीव भूयोऽयात् कुत्सितां गतिम् । साशाखानिः किलात्रैव यत्र विश्वमणूपमम् ॥ तां पुपूर्षः किलाग्राहं धनः सख्यानिवन्धनः । यदादाय भवेज्जन्मी, यन्मुक्त्वा मुक्तिभागयम् ॥ तद्याथात्म्यमिति ज्ञात्वा कथं पुष्णाति धीधनः । हा हतोऽसि चिरं जन्तो मोहेनाद्यापि ते यतः॥ नास्ति कायाशुचिज्ञानं तत्त्यागश्चातिदुर्लभः । दुःखी सुखी सुखी दुःखी दुःखी दुःख्येव केवलम् ॥१९५ धन्यधन्योऽधनो धन्यो निर्धनो निर्धनः सदा । एवंविषैस्त्रिभिर्जन्तुरीप्सितानीप्सितंश्चिरम् ॥ १९६ चतुर्थ भडगमप्राप्य बम्भ्रमीति भवाणवे । यां वष्टघयमसौ वष्टि परं वष्टि स चापराम् ॥ १९७
हा अज्ञानी जीव अशा शरीरात राहून ज्याचे सर्व विषय हीच लाकडे आहेत अशा पंचेन्द्रियरूपी अग्नीनी संतप्त झालेला आहे व कुलिङ्गी-पंचाग्नि तपश्चरण करणाऱ्या साधूप्रमाणे पुनः हीनगतीस प्राप्त झाला आहे ॥ १९१ ।।
आशारूपी खाण या देहातील आत्म्यात आहे व त्या खाणीमध्ये हे विश्व अणुप्रमाणे भासते. ती आशाखाण भरून टाकण्यासाठी मी आज कांही संख्येने युक्त अशा घनाने ती खाण भरून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थात् खाण केव्हाही भरणे शक्य नाही ॥ १९२॥
हा जीव ज्याचे ग्रहण केल्यामुळे जन्मी होतो. म्हणजे पुनः पुनः जन्म धारण करतो पण त्याचे ग्रहण करणे सोडून दिले म्हणजे हा आत्मा मुक्त होतो पण शरीर हेच जीवाचे खरे स्वरूप आहे असे समजून हा ज्ञानधनी आत्मा त्याचेच कसे बरे पोषण करीत आहे ? जोपर्यन्त हा आत्मा शरीर ग्रहण करीत राहील तोपर्यन्त याला जन्म धारण करून संसारात फिरावे लागणारच ॥ १९३ ॥
हे जीवा, तूं मोहाफडून फार दीर्घकालापासून वारंवार मारला जात आहेस व या मोहामुळे तुला या शरीराच्या अपवित्रपणाचे अद्यापि ज्ञान होत नाही व यामुळे त्याचा व मोहाचा त्याग होणे ही अतिशय कठिण वस्तु बनली आहे ॥ १९४ ॥
जो प्राणी दुःखी असून पुनः सुखी होईल. जो सुखी आहे तो दुःखी होईल व एकादा प्राणी दुःखी असून पुनः पुनः दुःखी होईल. तसेच कोणी धनी-श्रीमंत तो निर्धन होईल. जो निर्धन आहे तो श्रीमन्त होईल पण एकादा मनुष्य निर्धन असून सदा निर्धनच राहील. या इष्ट व अनिष्ट अशा तीन प्रकारच्या कल्पना आहेत पण चौथी कल्पना जो सुखी आहे तो सुखीच राहील ही कल्पना प्राप्त न झाल्यामुळे हा जीव या संसारसागरात वारंवार फिरत आहे ।। १९५-१९६ ॥
हा पुरुष ज्या स्त्रीची इच्छा करतो ती स्त्री त्याच्याहून वेगळ्याच पुरुषाची इच्छा करते. पण तो पुरुषही आणखी दुसन्या स्त्रीची इच्छा करितो व ती स्त्रीही आणखी इतराची इच्छा करिते ही अशी इच्छापरम्परा खरोखर कष्टदायक आणि अनिष्ट आहे ॥ १९७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org