Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५-१२८)
महापुराण
तुङ्गसिंहासनासीनं भास्वन्तं वोदयाद्रिगम् । राजराज समालोक्य बहुशो भक्तिनिर्भरः ॥ १२१ स वा प्रणम्य तीर्थशं स्पृष्ट्वाष्टाङ्गर्धरातलम् । करं प्रसार्य सम्भाव्य राजवासन्नमासनम् ॥ १२२ निजहस्तेन निर्दिष्टं दृष्टयालङ्कृत्य तुष्टवान् । व्यभासिष्ट सभामध्ये स तदान्येन तेजसा ॥१२३ प्रसन्नवदनेन्दूद्यदाह्लादिवचनांशुभिः । वधः किमिति नानीता तां द्रष्टुं वयमुत्सुकाः ॥ १२४ वयं किमिति नाहूतास्त्वद्विवाहोत्सवे नवे । आकम्पनैरिदं युक्तं सनाभिभ्यो बहिष्कृताः ॥ १२५ नन्वहं त्वपितृस्थाने मां पुरस्कृत्य कन्यका । त्वयासौ परिणेतव्या त्वं तद्विस्मृतवानसि ॥ १२६ इत्यकृत्रिमसामोक्त्या तपितश्चक्रवर्तिना। तदा विभावयन्भक्ति स्ववक्त्रं मणिकुट्टिमे ॥ १२७ नत्वापश्यत्प्रमादीव प्रतिगृह्य प्रभोर्दयाम् । जयः प्राञ्जलिरुत्थाय राजराजं व्यजिज्ञपत् ॥ १२८
झगमगत होता. अशा मण्डपाच्या मध्यभागी उंच सिंहासनावर उदयपर्वतावर विराजमान झालेल्या सूर्याप्रमाणे भरतचक्री विराजमान झाला होता. जसा चंद्र आपल्या ज्योतिर्गणाने शोभतो तसा भरत राजा राजसमूहाने शोभत होता. स्वतःच्या निर्मल कीर्तीप्रमाणे शुभ्र चामरानी तो वारला जात होता. नाना अलंकारांच्या कांतीनी युक्त झाल्यामुळे इन्द्रधनुष्यानी वेष्टित झालेल्या सूर्याप्रमाणे शोभत होता. जणु भरतेश्वराचे शरीर कान्तिमय आहे असे वाटत होते. शुभ आयु, शुभ नामकर्म, शुभ-उच्चगोत्र आणि सात वेदनीय या चार पुण्यप्रकृतीनी चक्रवर्ती भरत पूजिला गेला होता. सर्व राजांचा राजा अशा भरताला पाहून जयकुमाराच्या मनात फार भक्ति-आदर उत्पन्न झाली. त्याने तीर्थंकराप्रमाणे चक्रवर्तीला साष्टांग नमस्कार केला. भरतेश्वराने हात पसरून त्याचा सन्मान केला व आपल्या जवळचे आसन त्याने आपल्या हाताने दाखविले. ते आसन दृष्टीने पाहून जयकुमाराने सुशोभित केले व मनात फार खुश झाला. जेव्हां तो सभेत आसनावर बसला तेव्हा तो अपूर्व तेजाने झळकू लागला ॥ ११६-१२३ ।।
प्रसन्नमुखचंद्रापासून निघालेल्या आह्लादक वचनकिरणानी सर्वाना आनंदित करणारे भरत महाराजा म्हणाले की हे कुमारा तू आपली पत्नी का बरे आणली नाहीस? आम्ही तिला पाहण्यास फार उत्सुक झालो आहोत ॥ १२४ ।।
__ या नवीन त-हेच्या विवाहोत्सवात आम्हाला का बरे बोलावले नाही. अकम्पन महाराजानी हे योग्य केले का? आम्हाला त्यानी आपल्या बंधुवर्गातून वेगळे केले आहे काय? ॥ १२५ ॥
हे कुमारा, मी तुला तुझ्या वडिलासारखा आहे. मला पुढे करून तू त्या कन्यकेशी विवाह करणे योग्य झाले असते पण ते तू विसरलास ।। १२६ ॥
याप्रमाणे स्वाभाविक शांत वचन बोलून चक्रवर्तीने जयकुमाराला आनन्दित केले. त्यावेळी चक्रवर्तीविषयी आपली भक्ति प्रकट करून एखाद्या अपराधी मनुष्याप्रमाणे नम्र होऊन कुमाराने आपले मुख रत्ननिर्मित जमिनीत पाहिले. या नंतर भरतेश्वराची दया-कृपा त्याने मिळविलो व हात जोडून तो उठला व राजेश्वर चक्रवर्तीला याप्रमाणे त्याने विनन्ती केली ॥ १२७-१२८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org