________________
४५-१०८)
महापुराण
विचार्य कार्यपर्यायं तथास्त्वित्याह तं नृपः । स्नेहानुवर्तिनी नैति दीपिका वा धियं सुधीः ॥ १०० प्रादात्प्रागेव सर्वस्वं तस्मै दत्तसुलोचनः । तथापि लौकिकाचारं परिपालयितुं प्रभुः ॥ १०१ वत्त्वा कोशादि सर्वस्वं स्वीकृत्य प्रोतिमात्मनः । अनुगम्य स्वयं दूरं शुभेऽहनि वधूवरम् ॥ १०२ कथं कथमपि त्यक्त्वा स सजानिर्जनाग्रणीः । व्यावर्तत ततः शोको तुग्वियोगो हि दुःसहः ॥ १०३ विजयाद्धं समारुह्य जयोऽपि ससुलोचनः । आरूढसामजः सर्वैः स्वानुजैविजयादिभिः ॥ १०४ हेमाङ्गदकुमारेण सानुजेन च सोत्सवः । प्रवर्तयन्कथाः पथ्याः परिहासमनोहराः ॥ १०५ वृतः शशीव नक्षत्रैरनुगङ्ग ययौ शनैः । इला सञ्चालयन्प्राग्वा श्रीमान्स जयसाधनः ॥ १०६ स्कन्धावारं यथास्थानं पारेगङ्गन्यवीविशत् । वीक्ष्य कक्षपुटत्वेन प्रशास्ता शास्त्रवित्तदा ॥ १०७ हटत्पटकुटीकोटिनिकटाटोपनिर्गमः । बभासे शिबिरावासः स्वर्गावास इवापरः ।। १०८
त्या अकम्पनराजाने पुढील कार्याचा विचार केला व बरे आहे असे त्याने त्यास उत्तर दिले. चांगला बुद्धिमान् मनुष्य स्नेहाला-तेलाला अनुसरणाऱ्या दिवटीप्रमाणे स्नेहाला प्रेमाला अनुसरणाऱ्या बुद्धीचा अवलंब करीत नाही. अर्थात् विवेकयुक्त बुद्धीचा स्वीकार करून तो वागतो ।। १०० ॥
ज्याने सुलोचनेला अर्पण केले आहे अशा त्या अकम्पनराजाने जरी पूर्वीच आपले सर्वस्व दिले होते तरीही लौकिक आचार पाळण्यासाठी कोशादिक सर्वस्व देऊन त्याने प्रीतीचा स्वीकार केला होता. एके शुभदिवशी तो त्या वधूवरास काही मार्गापर्यन्त दूर अनुसरला व नंतर जनाचा पुढारी असा अकम्पन राजा कसे तरी त्यांचा त्याग करून कष्टाने शोकयक्त होऊन आपल्या पत्नीसह तेथून परतला. बरोबरच आहे की, आपल्या अपत्याचा वियोग सोसणे कठिण असते ॥ १०१-१०३ ॥
विजयार्द्धनामक हत्तीवर जयकुमार सुलोचनेसहित बसला व त्याचे सगळे विजयादिक भाऊ देखिल निरनिराळ्या हत्तीवर आरूढ झाले. यानन्तर मोठ्या आनंदाने थट्टेने मनोहर व हितकर अशा गोष्टी आपल्या भावासह व हेमाङ्गदकुमाराबरोबर बोलत त्याने प्रयाण केले. आपल्या जयशाली सैन्याच्याद्वारे जणु पृथ्वीला हालवित आहे असा तो लक्ष्मीवान् कान्तियुक्त जयकुमार नक्षत्रानी घेरलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होता व त्याने हळुहळु गंगानदीच्या किना-यावर आगमन केले ।। १०४-१०६ ॥
शास्त्रोक्त व उत्तम हुकमत चालविणारा अशा त्या जयकुमाराने गवताने आच्छादित अशा जमिनीवर गंगेच्या किनाऱ्यावर आपल्या सेनेचे तंबू ठोकले अर्थात् तेथे मुक्काम केला. चमकणाऱ्या वस्त्रांचे जे कोटयवधि तम्बू त्यांच्या समोरून जाण्या येण्याचा मार्ग बनविला होता अशा रीतीचा तो सैन्याचा निवास जणु दुसरा स्वर्गावास आहे असा शोभ लागला ॥ १०७-१०८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org