Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६१०)
महापुराण
(४५-९३
रतावसाने निःशक्त्योर्गाढौत्सुक्यात्प्रपश्यतोः । तयोरन्योन्यमाभातां नेत्रयोरिव पुत्रिके ॥ ९३ अवापि च तया प्रीतिस्तस्मात्तेन च या ततः । तयोरन्योऽन्यमेवासीदुपमानोपमेयता ॥ ९४ भुक्तमात्मम्भरित्वेन यत्सुखं परमात्मना । ततोऽप्यधिकमासीद्वा संविभागेऽपि तत्तयोः ॥ ९५ इत्यन्योन्यसमुद्भूतप्रीतिस्फीतामृताम्भसि । कामाम्भोधौ निमग्नौ तौ स्वरं चिक्रीडतुश्चिरम् ॥९६ तदा स्वमन्त्रिप्रहितगढपत्रार्थचोदितः । जयो निगमिषस्तूर्ण स्वं स्थानीयं धियो वशः ॥ ९७ भवद्धिर्भावितश्वयं मां मदीया दिदक्षवः । इति माम समभ्येत्य प्रस्थानार्थमबबुधत् ॥ ९८ तबुद्ध्वा नाथवंशेशः किञ्चिदासीत्ससम्भ्रमः । जये जिगमिषो स्वस्मान्न स्यात्कस्याकुलं मनः ॥
संभोगक्रीडेच्या समाप्तीच्या वेळी शक्तिरहित झालेले व अतिशय तीव्र उत्सुकतेमुळे एकमेकाकडे पाहणारे ते दोघे एकमेकांच्या डोळ्यातील बाहुल्याप्रमाणे एकमेकाना दिसले ॥१३॥
त्या जयकुमारापासून सुलोचनेने जी प्रीति व सुख मिळविले व तिच्यापासून त्याने जे सुख मिळविले त्या दोन्ही सुखांचा उपमानउपमेयपणा एकमेकावर अवलंबून होता अर्थात् सुलोचनेचे सुख जयकुमाराच्या सुखासारखे होते व जयकुमाराचे सुख सुलोचनेच्या सुखासारखे होते. असा भाव येथे जाणावा ॥ ९४ ॥
परमात्मा जिनेश्वराने सर्वाचे स्वामी होऊन जे सुख भोगले त्यापेक्षाही सुलोचना जयकुमार या जोडप्याने भोगलेले सुख जरी दोघाची विभागणी त्या सुखामध्ये झाली होती तरीही ते परमात्म्याच्या सुखापेक्षा अधिक होते. तेथे त्यानी पुष्कळ सुख भोगले हा अभिप्राय समजावा. अतिशयोक्तीने हे वर्णन कविने केले आहे. वास्तविकसर्वज्ञ जिनेश्वराचे अतीन्द्रिय सुख यापेक्षा अनन्तपटीने अधिक आहे ।। ९५ ।।
याप्रमाणे एकमेकापासून उत्पन्न झालेले प्रीतिरूपी विपुल अमृतासारखे पाणी ज्यात भरले आहे अशा कामसमुद्रात बुडालेल्या त्या दोघानी स्वच्छंदाने दीर्घकालपर्यन्त क्रीडा केली ॥ ९६ ॥
त्यावेळी आपल्या मन्त्र्याने पाठविलेल्या गुप्तपत्रातील अभिप्रायाने ज्याला प्रेरणा केली आहे, असा तो जयकुमार प्रधानाच्या बुद्धीच्या वश होऊन आपल्या राजधानीला शीघ्र जाण्याची इच्छा करू लागला. तो मामाकडे (अकम्पन सासऱ्याकडे) आला व म्हणाला अहो मामा आपण माझे ऐश्वर्य प्रकट केले आहे. मला आता माझी प्रजा वगैरे लोक पाहण्याची इच्छा करीत आहेत. असे म्हणून आपल्या प्रस्थानाचा अभिप्राय त्याने कळविला ॥ ९७-९८ ।।
ते जाणून नाथवंशीय राजा अकम्पन थोडासा घाबरल्यासारखा झाला. बरोबरच आहे की, जय अर्थात् शत्रूला जिंकल्यामुळे प्राप्त झालेला जय जर आपल्यापासून निघून जाऊ लागला तर कोणाचे मन व्याकुल होणार नाही बरे? तात्पर्य जयकुमार हा शत्रूला जिंकून मिळविलेल्या जयाप्रमाणे अकम्पन राजाला प्रिय वाटत होता ।। ९९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org