Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५-९२)
महापुराण
(६०९
स्खलन्ति स्म कलालापाश्चकम्पे हृदयं भृशम् । चलान्यालोकितान्यासन्नवशेवात्मनश्च सा ॥८६ प्रक्षालितेव लज्जागात्सुदत्याः स्वेदवारिभिः । वागिन्धनैर्व्यदीपिष्ट विचित्रश्चित्तजोऽनलः ॥ ८७ तावत्रपा भयं तावत्तावत्कृत्यविचारणा । तावदेव धृतिर्यावज्जम्भते न स्मरज्वरः ॥ ८८ विषयीकृत्यसर्वेषामिन्द्रियाणां परस्परम् । परामवापतुः प्रीति दम्पती तौ पथक् पृथक् ॥ ८९ अत्यासङ्गा-क्रमग्राहिकरणैस्तावपितौ । अनिन्दतामशेषेककरणाकारिणं विधिम् ॥ ९० अन्योन्यविषयं सौख्यं त्यक्त्वाशेषान्यगोचरम् । स्तोकेन सुखमप्राप्तं प्रापतुः परमात्मनः ॥ ९१ सम्प्राप्तभावपर्यन्तो विदतुर्न स्वयं च तौ । मुक्त्वैकं शं सहैवोद्यत्स्वक्रियोद्रेकसम्भवम् ॥ ९२
तिच्या तोंडातले मधुर शब्द बाहेर पडत असता अडखळत असत व तिचे हृदय अतिशय कंपित होत असे व कटाक्ष चंचल होत असत. जणु ती स्वतःच्या स्वाधीन नसल्यासारखी झाली होती ॥ ८६ ।।
सुन्दर जिचे दात आहेत अशा त्या सुलोचनेची लज्जा तिच्या घामाच्या पाण्यानी जणु धुतली अशी होऊन निघून गेली व तिच्या मनातला विचित्र मदनाग्नि जयकुमाराच्या भाषणरूपी लाकडानी विशेष रितीने भडकू लागला ।। ८७ ।।
जोपर्यन्त कामज्वर वाढलेला नाही तोपर्यन्त लज्जा, भय व कर्तव्याचा विचार मनात उत्पन्न होतो व धैर्यही तोपर्यन्तच असते ।। ८८ ॥
ते जोडपे एकमेकाना आपापल्या सर्व विषयांचे विषय करून निरनिराळे प्रकाराचे उत्कृष्ट सुख भोगीत होते ॥ ८९ ।।
अत्यासक्तीमुळे-विषयभोगात अतिशय आसक्ति उत्पन्न झाल्यामुळे क्रमाने विषय ग्रहण करणान्या इन्द्रियानी जे सुख त्यांना मिळाले त्यात त्याना तृप्ति वाटली नाही, सन्तोष वाटला नाही. म्हणून त्यांनी ज्याने सर्व सुखे एकदम भोगता येतील असे एक इन्द्रिय ब्रह्मदेवाने बनविले नाही म्हणून त्या जयकुमार व सुलोचना या जोडप्याने ब्रह्मदेवाची निन्दा केली ॥ ९० ॥
त्या दोघांनी सर्वसाधारण लोकाना मिळणारे परस्पराचे सुख त्यागले व जे क्षुद्र लोकांना प्राप्त करून घेणे शक्य नव्हते असे आत्म्याचे उत्तम सुख त्यानी प्राप्त करून घेतले ॥ ९१ ॥
मनात उत्पन्न झालेल्या कामविकाराच्या शेवटच्या अवस्थेला जे प्राप्त झाले आहेत असे ते दोघे स्त्रीपुरुषांनी समानसमयी चाललेल्या क्रियांच्या आधिक्याने उत्पन्न झालेल्या सुखाशिवाय दुसरे काहीच जाणले नाही ।। ९२ ॥ म.८०
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org