Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६०८)
महापुराण
(४५-७७
अस्मितां सस्मितां कुर्वन्नहसन्ती सहासिकाम् । सभयां निर्भयां बालामाकुलां तामनाकुलाम् ॥ ७७ अनालपन्तीमालाप्य लोकमानो विलोकिनीम् । अस्पृशन्ती समास्पृश्य व्यधाद्वीडाविलोपनम् ॥७८ कृतो भवान्तराबद्धतत्स्नेहबलशालिना । सुलोचनायाः कौरव्यः कामं कामेन कामुकः ॥ ७९ सुलोचनासुमनोवृत्ती रागामृतकरोधुरा । क्रमाच्चबाल वेलेव कामनाममहाम्बुधेः ॥ ८० मुकुले वा मुखे चक्रे विकासोऽस्याः क्रमात्पदम् । आक्रान्तशूर्पकारातिग्रहानक्षरसूचनः ॥८१ सखीमुखानि संवीक्ष्य जञ्जपित्वा दिशामसौ । स्वैरं हसितुमारब्ध गहीतमदनग्रहा ॥ ८२ सितासितशितालोलकटाक्षेक्षणतोमरैः । जयं तदा जिताननं कृत्वानङ्गप्रतिष्कशम् ॥८३ ससाध्वसा सलज्जा सा विव्याध विविषेर्मनाक । अनालोकनवेलायामतिसन्धित्सव तम् ॥ ८४ न भुजङ्गेन सन्दष्टा नापि संसेवितासवा । न भ्रमेण समाक्रान्ता तथापि स्विद्यति स्म सा ॥ ८५
हा जयकुमार मंदहास्याने युक्त नसलेल्या सुलोचनेला मंदस्मितयुक्त करीत असे. मोठ्याने न हसणाऱ्या तिला त्याने मोठ्याने हसणारी बनविले. भयभीत अशा तिला त्याने निर्भय केले व घाबरलेल्या तिला त्याने निर्भय केले. न बोलणान्या तिला त्याने बोलावयास लावले. मर्यादेने आपल्याकडे ( जयकुमाराकडे ) न पाहणाऱ्या तिला त्याने पाहावयास लाविले व स्पर्श न करणाऱ्या तिला त्याने स्वतःला स्पर्श करावयास लाविले. अशा रीतीने जयकुमाराने तिला लज्जारहित केले ॥ ७७-७८ ।।
पूर्वभवात बांधलेल्या सुलोचनेच्या स्नेहाच्या सामर्थ्याने शोभणाऱ्या अशा या काम देवाने जयकुमाराला अतिशय कामुक बनविले ।। ७९ ।।
प्रेमरूपी चन्द्राच्या उदयाने वर उसळलेली आणि मदन नांवाच्या मोठ्या समुद्राची जणु मोठी लाट अशी सुलोचनेची मनोवृत्ति क्रमाने उंच उंच उसळत चालली ॥ ८० ॥
कमलाच्या कळीप्रमाणे असलेल्या या सुलोचनेच्या मुखावर तिच्या अंगात चोहीकडे फिरणाऱ्या मदनरूपी पिशाचाने न बोलता प्रफुल्लपणा उत्पन्न केला. अर्थात् हिच्या मुखावर मदनाची कांति झळकू लागली ॥ ८१ ॥
जिने मदनरूपी पिशाच आपल्या अंगात धारण केला आहे अशी ही सुलोचना मैत्रिणींची तोंडे पाहून व दिशांची मुखे पाहून काही तरी बडबड करून यथेच्छ हसत असे ।। ८२ ।।
भीतीने युक्त व लज्जायुक्त अशा त्या सुलोचनेने तो जयकुमार आपल्याकडे पाहत नाही अशा वेळी ज्याने आपल्या सौन्दर्याने मदनाला जिंकले आहे अशा त्याच्यावर मदनाला साहायक करून शुभ्र व कृष्ण असे व किंचित् तीक्ष्ण आणि चंचल अशा कटाक्षानी पाहणे हेच कोणी तोमर नांवाच्या अनेक प्रकारच्या आयुधानी थोडेसे प्रहार केले ॥ ८३-८४ ॥
ती सुलोचना जिला सर्पाने दंश केलेला आहे अशी नव्हती, किंवा तिने मद्य प्राशिले नव्हते, किंवा जिला भ्रम-वेडसरपणा उत्पन्न झाला आहे अशीही पण नव्हती, तथापि ती आपल्या पतीकडे पाहत असता घामेजून जात असे ।। ८५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org