Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
६०६)
महापुराण
अमुनान्यायवत्मैव प्रावर्तीति न केवलम् । इह स्वयं च दण्डयानां प्रथमः परिकल्पितः ॥ ६० अभूदयशसो रूपं मत्प्रदीपादिवाञ्जनम् । नार्ककोतिरसौ स्पष्टमयशःकोतिरेव हि ॥ ६१ जय एव मदादेशादीदृशोऽन्यायतिनः । समीकुर्यात्ततस्तेन मसाधुदषितोयुधि ॥ ६२ सदोषो यदि निग्राह्यो ज्येष्ठपुत्रोऽपि भूभुजा । इति मार्गमहं तस्मिन्नद्य वर्तयितुं स्थितः ॥ ६३ अक्षमाला किल प्रत्ता तस्मै कन्यावलेपिने । भवद्भिरविचार्यंतद्विरूपकमनुष्ठितम् ॥ ६४ पुरस्कृत्येह तामेतां नीतः सोऽपि प्रतीक्ष्यताम् । सकलङ्केति किं मूतिः परिहर्तुभवेद्विषोः ॥ ६५ अपेक्षितः सदोषोऽपि स्वपुत्रश्चक्रवर्तिना । इतीदमयशः स्थायि व्यधायि तदकम्पनैः ॥ ६६ इति सन्तोष्य विश्वेशः सौमुख्यं सुमुखं नयन् । हित्वा ज्येष्ठं तुजं तोकमकरोन्न्यायमौरसम् ॥ ६७
......................
या अर्ककीर्तीने केवळ अन्यायमार्ग चालू केला आहे असे नाही तर ज्यांना शिक्षा करणे योग्य आहे अशा अपराधी लोकांत ह्याने स्वतःला पहिला क्रमांक प्राप्त करून घेतला आहे ॥ ६० ॥
जसे दिव्यापासून काजळ उत्पन्न होते तसे हा माझ्यापासून अयशरूपाने उत्पन्न झाला आहे. हा अर्ककीति नव्हे तर हा स्पष्ट अयशःकीर्तिच आहे ॥ ६१ ।।
माझ्या आज्ञेला अनुसरून जयकुमारच अशा रीतीने अन्यायाने वागणा-या लोकांना दंडित करू शकतो व त्याने युद्धात या अर्ककी तिला चांगलेच हैराण केले आहे ।। ६२ ।।
राजाने आपला वडील मुलगा जर सदोष असेल अपराधी असेल तर त्यालाही दंड करावा अशा रीतीच्या नीतिमार्गाला रूढ करण्यास मी आज सिद्ध झालो आहे ।। ६३ ॥
___ या उन्मत्ताला तुम्ही अक्षमाला कन्या दिली हे कार्य विचार न करिता केले आहे. हे कार्य अगदी विरुद्ध तुम्ही केले आहे. ॥ ६४ ।।
या कन्येला पुढे करून या अर्ककीर्तीला तुम्ही आदरणीय केले आहे. बरोबरच आहे की, चन्द्राचा देह सकलङक काळया डागाने सहित आहे म्हणून काय त्याला त्यागणे योग्य होईल काय ? ।। ६५ ॥
चक्रवर्तीने आपला पुत्र दोषी असूनही त्याची अपेक्षा केली अशा रीतीची माझी अकीर्ति मात्र अकम्पनमहाराजांनी नेहमी टिकणारी केली ॥ ६६ ।।
याप्रमाणे जगत्पति भरताने त्या सुमुखदूताला सन्तुष्ट करून प्रसन्नमुख केले व आपल्या ज्येष्ठपुत्राचा त्याग करून भरतेश्वराने न्यायालाच आपला औरस पुत्र मानले ।। ६७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org