________________
४५-५९)
महापुराण
(६०५
अकम्पनैः किमित्येवमुदीर्य प्रहितो भवान् । गुरुभ्यो निर्विशेषास्ते सर्वज्येष्ठाश्च संप्रति ॥५१ गहाश्रमे त एवास्तैिरेवाहं च बन्धमान् । निषेद्धारः प्रवृत्तस्य ममाप्यन्यायवर्त्मनि ॥ ५२ पुरवो मोक्षमार्गस्य गुरवो दानसन्ततेः । श्रेयांश्च चक्रिणां वृत्तयेथेहास्म्यहमग्रणीः ।। ५३ तथा स्वयंवरस्येमे नाभूवन्यद्यकम्पनाः । कः प्रवर्तयितान्योऽस्य मार्गस्यैष सनातनः ॥ ५४ मार्गाश्चिरन्तनान्येऽत्र भोगभूमितिरोहितान् । कुर्वन्ति नूतनान्सन्तः सद्धिः पूज्यास्त एव हि ॥५५ न चक्रेण न रत्नश्च शेषेर्न निधिभिस्तथा । बलेन न षडङ्गन नापि पुत्रर्मथा च न ॥ ५६ तदेतत्सार्वभौमत्वं जयेनकेन केवलम् । सर्वत्र शौर्यकार्येषु तेनैव विजयो मम ॥ ५७ म्लेच्छराजान्विनिजित्य नाभिशेले यशोमयम् । मन्नाम स्थापितं तेन किमत्रान्येन केनचित् ॥ ५८ अर्ककोतिरकोतिर्मे कीर्तनीयामकोतिषु । आशशाङ्कमिहाकार्षीन्मषोमाषमलीमसाम् ॥ ५९
काय अकम्पन महाराजांनी असे असे बोल म्हणून तुला पाठविले आहे काय ? ते तर आम्हाला गुरु सारखेच विशिष्ट आहेत व ते यावेळी सर्वांत वडील आहेत. या गृहाश्रमात तेच आम्हाला पूजनीय आहेत व त्यांच्यामुळेच मी स्वतःला बंधुयुक्त समजतो. तेच माझे खरे हितकर्ते आहेत व मी देखिल अन्यायमार्गात प्रवृत्त झालो तर माझा देखिल ते निषेध करतील अशी त्यांची मी योग्यता समजतो ॥ ५१-५२ ॥
हे सुमुखा, भगवान् आदिनाथ हे मोक्षमार्गाचे गुरु आहेत. हे मोक्षमार्गाचे आद्यप्रवर्तक आहेत. आणि श्रेयान् महाराजा हे आहारदानाच्या परंपरेचे गुरु- आद्यप्रवर्तक आहेत व चक्रवर्तीच्या आचारांचा मी मुख्य गुरु आहे. त्याप्रमाणे स्वयंवरविधीचे हे अकंपनमहाराज आद्य प्रवर्तक गुरु आहेत. जर अकम्पन महाराज नसते तर या स्वयंवरमार्गाची प्रवृत्ति करणारा दुसरा कोण झाला असता बरे ? हा मार्ग सनातन आहे ॥ ५३-५४ ॥
पूर्वी भोगभूमीच्या काली जे प्राचीन मार्ग लुप्त झाले होते त्यांना जे सज्जन पुनः नवीन चालू करतात ते सत्पुरुष सज्जनांनी पूजेला योग्य होतात ।। ५५ ।।
प्रसिद्ध असा हा चक्रवर्तीपणा जो मला प्राप्त झाला आहे तो चक्राने किंवा बाकीच्या खङगादिरत्नांनी किंवा निधीनी तसेच सहा प्रकारच्या सैन्यांनी, किंवा माझ्या मुलांच्या साहाय्याने अथवा माझ्या प्रयत्नाने मिळाला नाही पण फक्त एकटया जयकुमारानेच मिळालेला आहे. सगळ्या शौर्याच्या कार्यात मला जयकुमारामुळेच विजयलाभ झाला आहे ॥ ५६-५७ ।।
म्लेंच्छराजांना जिंकून नाभिपर्वतावर कीर्तियुक्त असे माझे नाव त्यानेच स्थापिले आहे. इतराने कोणी यात काही केले आहे काय ? ॥ ५८ ।।
या अर्ककीर्तीने अपकीतियुक्त लोकामध्ये वर्णन करण्याला योग्य व काळी शाई व उडीदाप्रमाणे मळकट अशी माझी अकीर्ति चन्द्र राहील तोपर्यन्त राहील अशी स्थिर केली आहे ॥ ५९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org