Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५-४२)
महापुराण
(६०३
नाथवंशाग्रणीश्चामा जामात्रालोच्य सत्वरम् । सुधीः स्वगृहसाराणि बद्ध्वा रत्नान्युपायनम् ॥३४ विदितप्रस्तुतार्थोऽसि यथासो नः प्रसीदति । तथा कुविति चक्रेशं सुमुखाख्यमजीगमत् ॥ ३५ आशु गत्वा निवेद्यासौ दृष्ट्वेशं धरणी तनुम् । क्षिप्त्वा प्रणम्य दत्वा च प्राभृतं निभृताञ्जलिः॥३६ देवस्यानुचरो देव प्रणम्याकम्पनो भयात् । देवं विज्ञापयत्येवं प्रसादं कुरु तच्छृणु ॥ ३७ सुलोचनेति नः कन्यासारस्त्वविहितश्रिये । स्वयंवरविधानेन सम्प्रादायि जयाय सा ॥ ३८ तत्रागत्य कुमारोऽपि प्राक्सर्वमनुमत्य तत् । विद्याधरधराधीशैः सुप्रसन्नैः सह स्थितः ॥ ३९ पश्चात्कोऽपि ग्रहः क्रूरः स्थित्वा सह शुभग्रहम् । खलो बलाद्यथा स्मभ्यं वृथा कोपयति स्म तम् ॥४०. विज्ञातमेव देवेन सबं तत्संविधानकम् । चारचक्षुश्च वेत्त्येतरिक पुनः सावधिर्भवान् ॥ ४१ कुमारो हि कुमारोऽसौ नापराषोऽस्ति कश्चन । तत्र तस्य सदोषाः स्मो वयमेव प्रमादिनः ॥४२
___ नाथवंशाचा स्वामी अशा अकम्पन राजाने त्यावेळी आपला जावई जो जयकुमार त्याच्या बरोबर शीघ्र विचार केला. व त्याने सुमुख नामक सेवकाला बोलावले. त्याला आपल्या घरातील उत्तम रत्ने चक्रवर्तीला नजराणा म्हणून अर्पण कर म्हणून दिली व तू विद्वान आहेस. सध्या घडलेला प्रसंग तुला चांगला माहित आहे तेव्हा तो प्रसंग चक्रवर्तीला कळव व जेणे करून तो आम्हावर प्रसन्न राहील अशा रीतीने हे कार्य सिद्ध कर म्हणून त्याला चक्रवर्तीकडे पाठविले ॥ ३४-३५ ।।
तो सुमुख शीघ्र चक्रवर्तीकडे गेला. त्याला आपली हकीकत सांगितली. चक्रवर्तीला पाहिल्यावर त्याने जमीनीवर आपला देह टाकून त्याला साष्टांग नमस्कार केला. व दिलेला नजराणा प्रभु पुढे ठेविला. आपले दोन हात जोडून प्रभु भरतेशाला असे म्हणाला. हे प्रभो आपले सेवक असे अकम्पन महाराज आपणास नमस्कार करून भीतीने आपणास याप्रमाणे निवेदन करीत आहेत आपण त्यांच्यावर प्रसन्न व्हा व त्यांचे निवेदन ऐका ॥ ३६-३७ ।।
हे प्रभो, सुलोचना नांवाचे आमचे कन्यारत्न आपण ज्याला लक्ष्मीसंपन्न केले आहे अशा जयकुमाराला आम्ही स्वयंवरविधीने दिले आहे ॥ ३८ ॥
त्या स्वयंवरप्रसंगी कुमार अर्ककीर्तिही आला. त्याला ते सर्व मान्य वाटले. प्रसन्न असे विद्याधर राजे व भूमिगोचरी राजे यांच्यासह येऊन तो स्वयंवरमंडपात बसला. नंतर एकादा दुष्टग्रह शुभ ग्रहाबरोबर राहून त्याला दुष्ट बनवितो तसे कोणी दुष्टाने आमच्याबद्दल कुमाराच्या मनांत व्यर्थ व मुद्दाम कोप उत्पन्न केला ॥ ३९-४० ॥
हे प्रभो यानंतर तेथे जो प्रसंग घडला तो आपण जाणलाच असेल. कारण हेर हे ज्याचे डोळे आहेत असा देखील हे जाणत आहे मग आपण तर अवधिज्ञानी आहात. अर्थात् आपणास अवधिज्ञानाने सर्व समजले असेलच ॥ ४१ ।।
हा कुमार तर कुमारच- बालकच आहे. त्याचा कांही अपराध नाही. याविषयी चूक आमच्याकडून घडली असल्यामुळे आम्हीच दोषी आहोत ॥ ४२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org