Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५-२५)
महापुराण
विश्वविश्वम्भराह्लादी यदि क्षिपति वारिदः । कदाप्यशनिमेकस्मिस्तत्तस्यैवाशुभोदयः ॥ १८ हयेनेव दुरारोहाज्जयेनेहासि पातितः। स ते प्रेष्यः किमत्रास्ति वैमनस्यस्य कारणम् ॥ १९ सुलोचनेति का वार्ता सर्वस्वं नस्तवैव तत् । निषिद्धश्चेत्त्वया पूर्व क्रियते कि स्वयंवरः ॥ २० लक्ष्मीवती गहाणेमामक्षमालापराभिषाम् । निर्मलां वा यशोमालां कि ते पाषाणमालया ॥२१ आहारस्य यथा तेऽद्य विकारोऽयं विना त्वया। जीविकास्ति किमस्माकं प्रसीदतु विभो भवान् ॥२२ यद्वयं भिन्नमर्यादे त्वय्यवर्येऽम्बुधाविव । तत्तेऽवशिष्टाः पुण्येन भवत्प्रेषणकारिणः ॥ २३ त्वं वह्निनेव केनापि पापिना विश्वजीवनः । उष्णीकृतोऽसि प्रत्यस्मान शीतीभव हि वारि वा ॥२४ न चेदिमान्सुतान्दारान्प्रतिग्राहय पालय । मम तावाश्रयो यामि पुरूणां पादपादपो ॥ २५
सगळ्या जगाला आनन्दित करणारा मेघ जर केव्हा तरी एखाद्या व्यक्तीवर विद्युत्पात करील तर त्या व्यक्तीच्या ठिकाणीच अशुभ कर्माचा उदय आहे असे समजणे योग्य आहे ॥ १८ ॥
ज्याच्यावर चढून बसणे कठिण आहे अशा घोड्याप्रमाणे जयकुमाराकडून हे कुमारा तू पाडला गेला आहेस पण तो जयकुमार तर तुझा नोकरच आहे, यास्तव येथे वैराचे कारणच कांही नाही ।। १९ ।।।
__सुलोचनेची गोष्ट बाजूला राहू दे. हे कुमारा, आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे कुमारा जर तू आमच्या कार्याविषयी आधीच निषेध व्यक्त केला असता तर आम्ही हे स्वयंवर कशाला केले असते ।। २० ॥
हे कुमार, जिथे अक्षमाला हे दुसरे नांव आहे अशा लक्ष्मीवतीचा जी जणु दुसरी निर्मल अशी यशोमालेसारखी आहे तिचा स्वीकार कर. त्या पाषाणाच्या या मालेशी तुला काय करावयाचे आहे ॥ २१ ॥
हे कुमार, आहाराचा विकार-बिघडलेले अन्न खाण्याने जसे जगणे नष्ट होते तसे तुझ्यात विकार झाल्यामुळे आमचे जीवन कसे टिकेल ते नष्ट होईल. म्हणून हे कुमारा, तू आमच्यावर प्रसन्न हो ॥ २२ ।।।
__ ज्याचे निवारण करणे शक्य नाही अशा समुद्राप्रमाणे तू आपली मर्यादा त्यागली असताही तुझी आज्ञा मान्य करून त्याप्रमाणे वागणारे आम्ही तुझ्या पुण्यानेच फक्त जगत आहोत ॥ २३ ॥
सर्वांच्या जगण्याला हे कुमार तू पाण्याप्रमाणे कारण आहेस पण कोणी तरी पाप्याने तुला उष्ण केले आहे. यास्तव तो उष्णपणा सोडून दे व आमच्यासाठी तू पाण्याप्रमाणे शीतल हो म्हणजे आम्ही जगू ॥ २४ ॥
जर तू शीत-शान्त होणार नाहीस तर माझ्या या मुलाना व पत्नीला स्वीकारून त्यांचा सांभाळ कर म्हणजे मी सर्वाना आश्रय देणा-या आदिभगवंताच्या पायरूपी दोन वृक्षाकडे जातो ॥ २५ ॥
म. ७९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org