Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
पञ्चचत्वारिंशत्तमं पर्व ।
अथ मेघस्वरो गत्वा प्रथमानपराक्रमः । मथितारातिदुर्गवः पृथु स्वावासमास्थितः ॥१ स्वयं च सञ्चिताघानि हन्तुं स्तुत्वा जिनेशिनः । अकम्पनमहाराजः समालोक्य सुलोचनाम् ॥ २ कृताहारपरित्यागनियोगामा युधस्तदा । सुप्रभाकृतपर्युष्टि कायोत्सर्गेण सुस्थिताम् ॥ ३ सर्वशान्तिकरी ध्याति ध्यायन्ती स्थिरचेतसा । धामैकाग्चनिष्पन्दां जिनेन्द्राभिमुखीं मुदा ॥४ समभ्यर्च्य समाश्वास्य प्रशस्य बहुशो गुणान् । भवन्माहात्म्यतः पुत्रि शान्तं सर्वममङ्गलम् ॥५ प्रतिध्वस्तानि पापानि नियाममुपसंहर । इत्युत्क्षिप्तकरामुक्त्वा पुरस्कृत्य सुतां सुतैः॥६ हृष्टः सुप्रभया चामा राजगेहं प्रविश्य सः । याहि पुत्रि निजागारं विसज्येति सुलोचनाम् ॥ ७ अन्यथा चिन्तितं कार्य देवेन कृतमन्यथा । इति कर्तव्यतामूढः सुश्रुतादिभिरिद्धधीः ॥८ औत्पत्तिक्यादिधीभेदैर्वालोच्य सचिवोत्तमैः । विद्याधरधराधीशान्विपाशीकृत्य कृत्यवित् ॥९
___ यानंतर ज्याचा पराक्रम चोहीकडे प्रसिद्ध आहे, ज्याने शत्रूच्या दुष्टगर्वाचा नाश केला आहे असा मेघस्वर-जयकुमार तेथून निधून आपल्या राहण्याच्या विशालस्थानी राहिला ॥ १॥
इकडे अकम्पन महाराज स्वतः जिनमंदिरात गेले व त्यानी स्वतः संचित केलेल्या पापांचा नाश करण्यासाठी जिनेश्वराची स्तुति केली. त्यानी तेथे युद्ध संपेपर्यन्त मी आहारांचा त्याग करीन असा नियम घेतलेल्या सुलोचनेला पाहिले. तिला सुप्रभाराणी जिनपूजादि कार्यात मदत करीत होती. सुलोचनेने शरीरावरचे ममत्व त्यागून कायोत्सर्ग धारण केला होता. म्हणजे ती स्वस्थचित्ताने जिनेश्वराकडे मुख करून बसली होती. आपल्या स्थिर मनाने सर्वत्र शान्ति होवो असे ध्यान करीत होती. आपल्या मनाला तिने एकाग्र केले होते ते तिचे मन धर्म्य-दया क्षमादि गुणांच्या चिंतनात लीन झाले होते. आनंदाने तिला सत्कारून तिचे समाधान करून त्यानी तिच्या पुष्कळ गुणांची प्रशंसा केली. ते म्हणाले 'मुली, तुझ्या माहात्म्याने सर्व अमंगल शान्त झाले आहे. सर्व पापें नष्ट झाली आहेत, आता तू आपला नियम सोड' तेव्हा तिने आपले हात वर केले. याप्रमाणे तिला बोलून व तिला पुढे करून आनन्दित झालेल्या अकम्पनराजाने आपल्या मुलासह व सुप्रभाराणीसह राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या मुलीला त्यानी आपल्या मंदिरात पाठविले ॥२-६ ॥
जे कार्य जसे करावयाचे आम्ही ठरविले होते पण दैवाने ते वेगळेच केले अर्थात् बिघडविले त्यामुळे काय करावे हे सुचेनासे झालेल्या बुद्धिमान् अकम्पनराजाने जन्म, व्रत, नियम, औषध आणि तप इत्यादिकांच्या द्वारे ज्यानी ज्ञान मिळविले आहे अशा सुश्रुत आदिक उत्तम सचिवाबरोबर विचार करून योग्य कार्य जाणणा-या राजाने अकम्पनाने-विद्याधर राजे आणि भूगोचरी राजे याना नागपाशातून मुक्त केले ॥ ७-९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org