Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-३६६)
महापुराण
(५९७
परिणतपरितापात्स्वेदधारी विलक्षो । विगलितविभुभावो विह्वलीभूतचेताः॥ अषित विधिविधानं चिन्तयंश्चक्रिसूविरहविषुरवृत्ति वीरलक्ष्मीवियोगे ॥ ३६३ येषामयं जितसुरः समरे सहायस्तानप्यहं कृतरतिः समुपासयामि ॥ धुर्योऽयमेव यदि कात्र विलम्बनेति । मत्वेव मंक्षु समियाय जयं जयश्रीः ॥ ३६४ स बहुतरमराजत्प्रोच्छ्रिताञशत्रुपांसून् । द्रुतमिति शमयित्वा वृष्टिभिः सायकानाम् ।। उपगतहरिभूमिः प्राप्य भूरिप्रतापम् । दिनकर इव कन्यासम्प्रयोगाभिलाषी ॥ ३६५ सौभाग्येन यदा स्ववक्षसि पता मालातदैवापरम् । वीरो वोध्रमवार्यवीर्यविभवी विभ्रश्य विश्वद्विषः ॥ वीरश्रीविहितं दधौ स शिरसाऽम्लानं यशःशेखरम् । लक्ष्मीवान्विदधाति साहससखः किं वा न पुण्योदये ॥ ३६६
या अर्ककीर्तीला पुष्कळ पश्चात्ताप झाल्यामुळे त्यांच्या अंगात घाम उत्पन्न झाला. तो मनात खिन्न झाला. आपला प्रभुपणा गळून गेला म्हणून त्याचे मन फार विह्वल झाले, दुःखी झाले. देवाचे कार्य कसे विलक्षण-दुःखदायक आहे याचा तो विचार करू लागला. वीरलक्ष्मीचा वियोग झाल्यामुळे तिच्या विरहाने त्याची मनोवृत्ति दुःखित झाली ॥ ३६३ ॥
ज्याने देवानाही जिंकले आहे असा हा जयकुमार ज्या लोकाना युद्धात सहायक झाला त्यांची देखिल मी सेवा करिते. त्यांच्यावर प्रेम करून त्यांची मी सेवा करिते. मग हाच जयकुमार त्या लोकात जर पुढारी आहे तर मी वेळ का लावावा ? विलम्ब का करावा असा जणु विचार करून जयश्री शीघ्र जयकुमाराकडे गेली ।। ३६४ ॥
____ अधिक शोभत असलेली व उडत असलेली जी शत्रुरूपी धूळ तिला बाणांच्या वृष्टीने या जयकुमाराने शीघ्र शमविली. ज्याने पुष्कळ प्रताप दाखवून सिंहाचे स्थान-सिंहरांशि प्राप्त करून घेतली आहे व आता सूर्याप्रमाणे कन्या जी सुलोचना तिच्या समागमाची इच्छा करणारा झाला आहे ॥ ३६५ ।।
__ जेव्हा याने आपल्या उत्कृष्ट भाग्याने आपल्या वक्षःस्थलावर माला धारण केली त्यावेळी ज्याच्या शक्तीचे वैभव कोणालाही नाहीसे करता येत नाही, अशा या वीर जयकुमाराने सर्व शत्रूना नष्ट केले व वीरश्रीने रचलेला अतिशय शुभ्र असा टवटवीत यशरूपी तुरा आपल्या मस्तकाने धारण केला. ज्याला साहसरूपी मित्र प्राप्त झाला आहे असा लक्ष्मीवान् पुरुष पुण्याचा उदय झाला असता कोणते बरे असाध्य कार्य करणार नाही ? ।। ३६६
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org