Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-३५७)
महापुराण
विजयार्द्धमहागन्धसिन्धुरस्कन्धसन्धृतः । निर्भत्सितोदयक्ष्माभन्मर्षस्थब्रध्नमण्डलः ॥ ३५० रणभूमि समालोक्य समन्ताद्बहुविस्मयः । मृतानां प्रेतसंस्कारं जीवतां जीविकाक्रियाम् ॥ ३५१ कारयित्वा पुरीं सर्वसम्मदाविष्कृतोदयाम् । प्राविशत्प्रकटेश्वर्यः सहमेघप्रभादिभिः॥ ३५२ अकम्पनोऽप्यनुप्राप्य वृतैरन्तःसमाकुलः । राजकण्ठीरवैर्धाम राजपुत्रशतैः पुरम् ॥ ३५३ सरक्षान्धृतभूपालान्कुमारं च नियोगिभिः । आश्वास्याश्वासकुशलर्यथास्थानमवापयत् ॥ ३५४ विचिन्त्य विश्वविघ्नानां विनाशोऽर्हत्प्रसादतः । इति वन्दितुमाजग्मुः सर्वे नित्यमनोहरम् ॥ ३५५ दूरादेवावरुह्यात्मवाहेभ्यः शान्तचेतसः । परीत्यार्थ्याभिरागत्य तुष्टुवस्तुतिभिजिनान् ॥ ३५६ जयोऽपि जगदीशानमित्याप्तविजयोदयः । अस्तावीदस्तकर्माणं भक्तिनिर्भरचेतसा ॥ ३५७
विजया नांवाच्या महान्मत्त हत्तीच्या खांद्यावर ज्याने आरोहण केले आहे व उदय पर्वताच्या मस्तकावर-शिखरावर विराजमान झालेल्या सूर्याला आपल्या शोभेने ज्याने तिरस्कृत केले आहे अशा जयकुमाराने सर्व बाजूनी रणभूमीचे निरीक्षण केले त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले, त्याने तेथे मेलेल्यांच्या प्रेतांचा संस्कार करविला व जे जिवंत होते त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था त्याने करविली. यानंतर सर्वांना आनंद झाल्यामुळे जिचा उत्कर्ष झाला आहे अशा त्या नगरीत ज्यांचे ऐश्वर्य प्रकट झाले आहे अशा जयकुमाराने मेघप्रभादिक आपल्या आप्तजनासह प्रवेश केला ।। ३५०-३५२ ॥
त्यावेळी शेकडो राजपुत्रांनी व शेकडो राजसिंहांनी (श्रेष्ठ राजांनी) वेष्टित असा अकम्पन राजाही नगरात प्रवेश करून आपल्या राजवाड्यात आला व ज्यांच्या रक्षणाकरिता ज्यांची नेमणूक केलेली आहे अशा लोकांच्याद्वारे नागपाशाने पकडलेल्या राजांचा व अर्ककीर्ति कुमाराचा खेद त्याने दूर करविला व त्यांना योग्यस्थानी पाठविले ॥ ३५३-३५४ ॥
अरिहंताच्या प्रसादाने सर्व विघ्नांचा नाश होतो असा विचार करून ते सगळे अकम्पनादि राजे नित्यमनोहर नामक जिनमन्दिरात अर्हत्प्रभूला वन्दन करण्यासाठी आले ॥ ३५५ ॥
ज्यांची मने शान्त आहेत असे ते राजे दुरूनच आपल्या वाहनावरून खाली उतरले.. त्यानी मंदिराला प्रदक्षिणा घातल्या व उत्तम अर्थानी भरलेल्या स्तुतीनी त्यानी जिनेश्वराना स्तविले ॥ ३५६ ॥
___ ज्याला विजय व उत्कर्ष प्राप्त झाला आहे अशा जयकुमाराने देखिल सर्वकर्मांचा ज्याने नाश केला आहे अशा जगत्प्रभु जिनेश्वराची भक्तीने भरलेल्या अन्तःकरणाने स्तुति केली ती अशी-। ३५७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org