Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-३४१)
महापुराण
(५९३
नास्त्येषामोदशी शक्तिविद्येयमिति विद्यया । जयो युद्धाय सन्नद्धस्तदा मित्रभुजङ्गमः ॥ ३३४ विदित्वा विष्टराकम्पाज्जयं सम्प्राप्य सादरः। नागपाशं शरं चालचन्द्रं दत्वा ययावसौ ॥ ३३५ तं सहस्रसहस्रांशुस्फुरवंशुप्रभास्वरम् । कौरवः शरमादाय वज्रकाण्डे प्रयोजयन् ॥ ३३६ हत एव सुतोभर्तुर्भुवोऽनेनेति सम्भ्रमम् । नरविद्याधराधोशा महान्तमुदपादयन् ॥ ३३७ रयान्नव तथा दुष्टानष्टचन्द्रान्ससारथीन् । स शरो भस्मयामास शस्त्राणि च यथाशनिः ॥ ३३८ छिन्नदन्तकरो दन्तीवान्तको वा हतायुधः। भग्नमानः कुमारोऽस्थाद्धिक्कष्टं चेष्टितं विधेः॥३३९ इति दन्तग्रहं वीरं गजं वा पादपाशकः । अपायुवेरुपाय विधिज्ञस्तमजीग्रहत् ॥ ३४० तच्छौयं यत्पराभूतेः प्राक् प्राप्तपरिभूतिभिः। यत्पश्चात्साहसं घाष्टर्यात् स द्वितीयः पराभवः॥३४१
____ माझ्या पक्षाच्या लोकात याना जिंकण्याचे असे सामर्थ्यही नाही व अशी विद्याही नाही. यास्तव या अर्ककीर्त्यादिकाना विद्येच्या द्वारेच जिंकावे असा विचार जयकुमाराने केला व त्या अर्ककीर्त्यादिकाबरोबर स्वतः लढण्यास तयार झाला. त्यावेळी त्याचा मित्र असलेल्या नागकुमाराने आसनकम्पनाने हे जाणले व तो जयकुमाराकडे आदराने प्राप्त झाला-आला व त्याने जयकुमाराला नागपाश दिला व अर्धचन्द्र नांवाचा बाण दिला. यानंतर तो स्वस्थानी गेला ॥ ३३४-३३५ ॥
हजारो सूर्याच्या चमकणाऱ्या किरणाप्रमाणे कान्तिसंपन्न असा बाण कौरवाने-कुरुवंशी जयकुमाराने आपल्या वज्रकाण्ड नामक धनुष्याला जोडला ॥ ३३६ ॥
त्यावेळी या बाणाने षट्खण्डपृथ्वीचा स्वामी अशा भरताचा पुत्र मरणारच असे जाणून भूमिगोचरीराजे व विद्याधरराजे यांच्यात मोठा क्षोभ उत्पन्न झाला ॥ ३३७ ॥
___जशी वीज पडली असता पर्वतादिक नष्ट होतात तसे त्या बाणाने नऊ रथ, दुष्ट असे आठ चन्द्रनामक विद्याधर व त्याचे सर्व सारथी व सर्व शस्त्रे याना भस्म करून टाकले ।। ३३८ ॥
ज्याचे दात व सोंड तुटले आहेत अशा हत्तीप्रमाणे किंवा ज्याचे शस्त्र नष्ट झाले आहे अशा यमाप्रमाणे अर्ककीर्ति मानरहित झाला. अरेरे दुःख देणाऱ्या दुर्दैवाच्या कृतीला धिक्कार असो ॥ ३३९ ॥
जसे शस्त्ररहित पण उपाय जाणणारे लोक पायांच्या फाशानी हत्तीच्या दाताना बांधून वीरहत्तीना पकडतात त्याप्रमाणे उपाय जाणणान्या जयकुमाराने अर्ककीर्तीला पकडले ॥३४०।।
पराभव प्राप्त होण्यापूर्वी लढण्याला शौर्य म्हणतात. पण पराभव ज्याचा झाला आहे अशा लोकानी पुनः निर्लज्जपणाने जे साहस करणे तो दुसरा पराभव होय ॥ ३४१ ॥ म. ७८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org