Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५९२)
महापुराण
(४४-३२४
अष्टचन्द्रान्सखोकुर्वन् नष्टचन्द्रोपमायुधः । सोत्पातकेतुसङ्काशचक्रकेतूपलक्षितः ॥ ३२४ प्रत्यायातमहावातविहतस्वजवैः शरैः । विध्यन्मध्यन्दिनाकं वा सुमनःक्षतहेतुभिः ॥ ३२५ जयं शत्रुदुरालोकं ज्वलत्तेजोमयं स्मयात् । कलभो वागमद्वारि प्रेरितः खलकर्मणा ॥ ३२६ जयोऽपि शरसन्तानघनीकृतघनाधनः । सहार्ककोतिमर्केण कुर्वन्विनिहतप्रभम् ॥ ३२७ प्रतीयायान्तरे छिन्दरिपुप्रहितसायकान् । शराश्चास्य पुरो धावन्नध्नस्येवोदयेऽशवः ॥ ३२८ अच्छेत्सीच्छस्त्रमस्त्राणि वैजयन्ती च दुर्जयः । जयोऽर्ककीर्तेरौद्धत्यं विहत्य विनिनीषया ॥३२९ अष्टचन्द्रास्तदाभ्येत्य विद्याबलविजृम्भणात् । न्यषेधयञ्जय स्येषूनम्भोदा वा रवेः करान् ॥ ३३० भुजबल्यादयोऽभ्येयोद्धं हेमाङ्गदं धा । सानुज सिंहसङ्घातं सिंहसङ्घ इवापरः ॥ ३३१ सानजोऽनन्तसेनोऽपि प्राप मेघस्वरानुजान् । आङ्गकेयो यूथा यथः कलिङ्ग-जमतङ्गजान् ॥ ३३२ अन्येऽप्यन्यांश्च भूपाला भूपालान्कोपितास्तदा । अभिपेतुः कुलाद्रीन्वा सञ्चलन्तः कुलाद्रयः ॥३३३
हत्तीचा बच्चा जसा त्यालाच पकडण्यासाठी केलेल्या खळग्याकडे जातो त्याप्रमाणे युद्धाला निघाला ॥ ३२३-३२६॥
वाणांच्या वृष्टीने ज्याने मेघालाही घट्ट केले आहे अर्थात् जयकुमाराने बाणवृष्टि करून आकाशात मेघाचे जण छत बनविले व सूर्यासह अर्ककीर्तीला त्याने कांतिरहित केले ।। ३२७ ॥
व शत्रने सोडलेल्या बाणाना मध्येच अन्तराळामध्ये जयकुमाराने तोडले व अशा रीतीने जयकुमाराने शत्रूवर हल्ला केला व सूर्याचे किरण जसे उदयाचे वेळी पुढे जातात तसे या जयकुमाराचे बाण पुढे जात असत अर्थात् याच्या बाणाना शत्रू मध्येच तोडून टाकीत नसे ॥ ३२८॥
___ ज्याला जिंकणे कठिण आहे अशा जयकुमाराने अर्ककीर्तीचा उद्धतपणा नाहीसा करून त्याच्या ठिकाणी पराजय उत्पन्न करण्याच्या इच्छेने त्याचे शस्त्र, त्याची अस्त्रे व त्याच्या ध्वजालाही तोडून टाकले ॥ ३२९ ॥
जसे मेघ सूर्याच्या किरणाना अच्छादतात तसे अष्टचंद्र विद्याधर तेथे येऊन त्यानी विद्येच्या बलाला वाढवून जयकुमाराच्या बाणाना प्रतिबंध केला ॥ ३३० ॥
जसे एक सिंहांचा समूह दुसऱ्या सिंहसमुहावर हल्ला करतो तसे अर्ककीर्तीच्या भुजबलि वगैरे भावानी आपल्या धाकट्या भावासह असलेल्या हेमांगदावर लढण्यासाठी क्रोधाने चाल केली, आक्रमण केले ॥ ३३१ ॥
जसे अंगदेशाचे हत्ती कलिंगदेशाच्या हत्तीवर चाल करून जातात तसे आपल्या धाकट्या भावाना बरोबर घेऊन अनन्तसेनाने मेघस्वराच्या-जयकुमाराच्या भावावर हल्ला केला. त्यावेळी जसे चालणारे कुलपर्वत दुसऱ्या कुलपर्वतावर चालून जातात तसे इतर राजे देखिल आपले प्रतिपक्षी असलेल्या राजावर क्रोधाने धावून गेले ॥ ३३२-३३३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org