________________
५९०)
महापुराण
(४४-३१५
जयस्य विजयः प्राणस्तवैवैतद्विनिश्चितम् । सवतावद्य यास्यावो दिवमित्यब्रवीत्परा ॥ ३०८ शराः पौष्पास्तव त्वं च संयुक्तेष्वतिशीतलः । तत्र विज्ञातसारोऽसि पुरुषेभ्यो भयं तव ॥ ३०९ आयसाः सायकाः काम त्वमप्यस्माकमन्तकः । इति काम समुद्दिश्य खण्डिताः स्वगतं जगः ॥३१० सा रात्रिरिति संल्लापैः प्रेमप्राणेरनीयत । तावत्सन्ध्यागता रागात्राक्षसीवेक्षितुं रणम् ॥ ३११ प्रभातानककोटीनां निःस्वनः सेनयोः समम् । आक्रामति स्म दिक्चक्रमक्रमेणोच्चरंस्तदा ॥ ३१२ प्रतीच्यापि युतश्चन्द्रो मयैवोदेति भास्करः । इति स्नेहादिव प्राची प्रागभादुक्याद्रवेः॥ ३१३ सरसां कमलाक्षिभ्यः प्रबुद्धानां तदा मुदा । निर्ययो स्वार्थमादाय निद्रव भ्रमरावली ॥ ३१४ गतायां स्वेन सडकोचं पद्मिन्यां स्वोदये रविः । लक्ष्मी निजकरणोच्चविदधे सा हि मित्रता ॥ ३१५.
हे प्रिय, या जयकुमाराला तुझ्या प्राणानीच विजय मिळणार आहे हे निश्चित आहे. म्हणून व्रतधारण करणारे आपण दोघेही स्वर्गाला जाऊ असे एका स्त्रीने आपल्या पतीला सांगितले ॥ ३०८ ॥
हे मदना, तुझे बाण फुलांचे आहेत व तू संयुक्त असलेल्या स्त्री पुरुषाविषयी अगदीच थंड आहेस. यास्तव त्या स्त्री-पुरुषाविषयी तुझे बल किती आहे हे आम्ही ओळखले आहे व तू पुरुषाना भितोस कारण त्यांचे बाण लोखंडाचे असतात. पण तू आम्हाला मात्र यम आहेस असे कामाला उद्देशून खंडित-स्त्रिया. (पतीने ज्यांचा अपमान केला आहे ) मनात म्हणाल्या ॥ ३०९-३१०॥
प्रेम हेच ज्यांचा प्राण आहे अशा स्त्री-पुरुषानी या प्रकारच्या भाषणानी ती रात्र घालविली. यानन्तर सन्ध्यावेळा झाली व सर्वत्र लाल रंग पसरला आणि राक्षसीप्रमाणे संध्याही रण पाहण्यासाठी आली ॥ ३११ ॥
त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्यात प्रातःकाली कोटयवधि नगाऱ्यांच्या शब्दानी एकदम सर्व दिशामंडलाला व्यापून टाकले ॥ ३१२ ॥
जरी चंद्र पश्चिम दिशेशी युक्त आहे तरीही सूर्य माझ्याशी युक्त राहूनच उदय पावतो म्हणून सूर्योदयाच्या पूर्वीच पूर्वदिशा जणु स्नेहामुळे फार शोभू लागली ॥ ३१३ ॥
___ त्यावेळी जणु जागे झालेल्या सरोवराच्या कमलरूपी डोळ्यापासून जणु निद्रेसारखी असलेली भुग्यांची पंक्ति आपला स्वार्थ म्हणजे मकरंद घेऊन बाहेर पडली ।। ३१४ ॥
आपल्या अस्तामुळे म्लान झालेल्या पद्मिनीच्या ठिकाणी सूर्य उगवल्यानंतर आपल्या करानी-किरणानी दु. अ, हातानी लक्ष्मीला-शोभेला दु. अ. संपत्तीला त्याने ठेवले हे योग्यच झाले. यालाच मित्रपणा म्हणतात ॥ ३१५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org