________________
६१४)
महापुराण
(४५-१२९
काशीदेशेशिना देवदेवस्याजाविधायिना । विवाहविधिभेदेषु प्रागप्यस्ति स्वयंवरः ॥ १२९ इति सर्वैः समालोच्य सचिवैः शास्त्रवेदिभिः । कल्याणं तत्समारब्धं देवेन कृतमन्यथा ॥ १३० शान्तं तत्त्वत्प्रसादेन मन्मूलोच्छेदकारणम् । रणं शरणमायात इत्येष भवतः क्रमौ ॥ १३१ सुरखेचरभूपालास्त्वत्पदाम्भोरुहालिनः । चक्रेणाक्रान्तदिक्चक्रकिकरास्तत्र कोऽस्म्यहम् ॥ १३२ देवेनानन्यसामान्यमाननां मम कुर्वता । ऋणीकृतः क्ववानण्यं भवान्तरशतेष्वपि ॥ १३३ नायेन्दुवंशसंरोही पुरुणा विहितौ त्वया । वद्धितौ पालितौ स्थापितौ च यावद्धरातलम् ॥ १३४ इति प्रथयिणी वाणीं श्रुत्वा तस्य निधीश्वरः । तुष्टया सम्पूज्य पूजाविद्वस्त्राभरणवाहनः॥ १३५ दत्वा सुलोचनायै च तद्योग्यं विससर्ज तम् । महीं प्रियामिवालिङग्य तं प्रणम्य ययौ जयः ॥१३६ सम्पत्सम्पन्नपुण्यानामनुबध्नाति सम्पदम् । पौरैर्वनीपकानीकैः स्तूयमानस्वसाहसः ॥ १३७
हे प्रभो, आपली आज्ञा मान्य करणाऱ्या काशीदेशाधिपति अकम्पनमहाराजानी विवाहाचे जे भेद आहेत त्यापैकी स्वयंवर हा एक भेद आहे व तो पूर्वीपासून रूढ आहे असे जाणून व शास्त्रज्ञ सर्व सचिवाबरोबर त्याचा चांगला विचार करून ते मंगलकृत्य करावयाचे ठरविले व आरंभिले पण देवाने त्यात बिघाड उत्पन्न केला. माझा मुळासकट नाश करण्यास कारण असलेले तें युद्ध हे प्रभो आपल्या कृपेने शान्त झाले म्हणून मी हा आपल्या चरणाना शरण आलो आहे ॥ १२९-१३१ ॥
हे प्रभो आपण चक्ररत्नाच्या साहाय्याने दहाही दिशांचे वलय जिंकले आहे. हे प्रभो देव, विद्याधर व राजे हे सर्व आपल्या चरणकमलावर भ्रमरासारखे लीन होऊन आपले नोकर बनले आहेत. त्यात मी कोण आहे ? मी एक नगण्य आहे, तुच्छ मनुष्य आहे ॥ १३२ ।।
हे प्रभो आपण माझा असामान्य आदर केला आहे. प्रभूनी मला असे ऋणी केले आहे की, ते शेकडो जन्मात देखिल कोठे बरे फिटेल ? ॥ १३३ ॥
हे प्रभो आदिभगवंतानी नाथवंश व इन्दुवंश-चंद्रवंश याचे रोप लाविले व आपण ते वाढविले, रक्षिले, व जोपर्यन्त हे पृथ्वीतल आहे तोपर्यन्त राहण्यासारखे बळकट केले आहेत ॥ १३४ ॥
याप्रमाणे जयकुमाराची ती नम्रवाणी ऐकून आदरविधि जाणणारे निधिपति भरत महाराज सन्तुष्ट झाले व त्यांनी त्या जयकुमाराचा वस्त्र, अलंकार व वाहने देऊन सत्कार केला. सुलोचनेलाही तिला योग्य अशी वस्त्रे अलंकारादिक चक्रेश्वराने दिले. अशा रीतीने जयकुमाराला त्यांनी निरोप दिला ॥ १३५-१३६ ॥
जणु प्रियेप्रमाणे असलेल्या पृथ्वीला आलिंगून व भरतेशाला वन्दन करून जयकुमार तेथून निघाला. बरोबरच आहे की, जे पुण्यसम्पन्न आहेत, विशाल पुण्यवन्त आहेत, लक्ष्मी त्यांच्या संपत्तीला वाढविण्यास कारण होते ॥ १३७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org