Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(४५-४३
तस्मै कन्यां गहाणेति नास्माभिः सा समपिता। आराधकस्य दोषोऽसौ यत्प्रकुप्यन्ति देवताः ॥४३ मयैव विहिताः सम्यक्वद्धिता बन्धवोऽपि नः । स्निग्धाश्च कथमेतेषां विदधामि विनिग्रहम् ।।४४ इत्येतद्देव मा संस्थाः स्यात्सदोषो यदि त्वया। कुमारोऽपि निगृह्येत न्यायोऽयं त्वदुपक्रमः ॥ ४५ तदादिश विधेयोऽत्र को दण्डस्त्रिविधेऽपि नः । किं वधः किं परिक्लेशः किं वार्थहरणं प्रभो ॥४६ तदादिश विधानेन नितरां कृतिनो वयम् । इहामुत्र च तद्देव यथार्थमनुशाधि नः ॥ ४७ इति प्रश्रयिणी वाणी निगद्य हृदयप्रियाम् । सुमुखो राजराजस्य व्यरंसीत्करसंज्ञया ॥ ४८ सतां वांसि चेतांसि हरन्त्यपि हि रक्षसाम् । किं पुनः सामसाराणि तादृशां समतादृशाम् ॥ ४९ इहैहीति प्रसन्नोक्त्या प्रफुल्लवदनाम्बुजः । उपसिंहासनं चक्री निसृष्टार्थं निवेश्य तम् ॥ ५०
-----------........
हे कुमार या कन्येचा तू स्वीकार कर असे म्हणून आम्ही त्यास ती कन्या दिली नाही. देवता ज्या अर्थी रागावतात त्या अर्थी तो आराधकाचाच दोष आहे ।। ४३ ।।
___ माझे या लोकावर प्रेम आहे, हे माझे बन्धु आहेत, यांना मीच वाढविले आहे तेव्हा मी यांना कशी शिक्षा करू असा विचार हे प्रभो आपण करू नका. कारण कुमार देखिल जर अपराधी असेल तर त्यालाही आपण शिक्षा कराल. या न्यायाची उत्पत्ति आपणापासूनच झाली आहे ॥ ४४ ॥
___ यास्तव हे प्रभो, आपण तीन प्रकारच्या दण्डापैकी कोणता दंड आम्हाला करणार आहा त्याची आज्ञा करा. काय वध करणार आहा? अथवा आम्हाला क्लेश देणार आहात 'किंवा आमचे धन हरण करणार आहात ? ॥ ४५ ॥
___ यास्तव आपण आम्हाला आज्ञा करा तिचे आम्ही पालन करून इहलोकी व परलोकी अत्यन्त कृतकृत्य होऊ. म्हणून आम्हाला योग्य शिक्षा सांगा ॥ ४६-४७ ।।
याप्रमाणे राजाधिराज भरताच्या हृदयाला आवडणारे नम्रतायुक्त भाषण सुमुखाने केले व राजेश्वराच्या हाताच्या खुणेने त्याने आपले भाषण पुरेसे केले ॥ ४८ ॥
_ सलोखा करणे हा ज्यांचा मुख्य उद्देश आहे अशी सज्जनांची भाषणे जर राक्षसांच्याही अन्तःकरणाला हरण करितात तर मग चक्रवर्तीसारख्या समदृष्टि पुरुषांच्या अन्तःकरणांचे ती हरण करणार नाहीत काय? ।। ४९ ॥
वरील प्रसन्न भाषण ऐकून ज्याचे मुखकमल प्रफुल्ल झाले आहे अशा त्या चक्रवर्तीने इकडे ये असे सर्व हकीकत ज्याने कळविली आहे अशा दूताला म्हटले व आपल्या सिंहासनाजवळ बसवून घेतले ।। ५० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org