________________
महापुराण
(४५-२६
इति प्रसाद्य सन्तोष्य समारोप्य गजाधिपम् । अर्ककीति पुरोधाय वृतं भूचरखेचरः ।। २६ शान्तिपूजां विधायाष्टौ दिनानि विविद्धिकाम् । महाभिषेकपर्यन्तां सर्वपापोपशान्तये ॥ २७ जयमानीय संघाय सन्धानविधिवित्तदा । नितरां प्रीतिमुत्पाद्य कृत्वैकोभावमक्षरम् ॥ २८ अक्षमालां महाभूत्या दत्त्वा सर्वार्थसम्पदा । सम्पूज्य गमयित्वनमनुगम्य यथोचितम् ॥ २९ तथेतरांश्च सम्मान्य नरविद्याधराधिपान । सद्यो विसर्जयामास सद्रत्नगजवाजिभिः॥३० ते स्वदुर्णयलज्जास्तवैराः स्वं स्वमगुः पुरम् । सा धोर्दैवापराधस्य प्रतिको हि याऽचिरात् ॥ ३१ तदा पूर्वोदितो देवः समागत्य सुसम्पदा । सुलोचनाविवाहोरुकल्याणं समपादयत् ॥ ३२ मेधप्रभसुकेत्वादिसत्सहायान्सहानुजान् । जयोऽप्यगमयत्सर्वान्सन्ताबहुप्रियः ॥ ३३
याप्रमाणे मधुरभाषणाने अर्ककीर्तीला अकम्पन राजाने प्रसन्न करून सन्तुष्ट केले. भूमिगोचरी राजे व विद्याधरराजांनी वेष्टित अशा त्याला मोठ्या हत्तीवर बसविले व पुढे करून तो नित्यमनोहर जिनमंदिरात गेला. तेथे सर्व पापांची शान्ति व्हावी म्हणून नानावैभव सम्पन्न अशी आठ दिवसपर्यन्त शान्तिपूजा त्याने केली व शेवटच्या दिवशी महाभिषेक केला ॥ २६-२७॥
___ यानंतर सलोखा कसा करावा याचे ज्याला चांगले ज्ञान आहे अशा या राजाने जयकुमाराला आणवून दोघामध्ये सलोखा उत्पन्न केला, दोघात अतिशय प्रेम उत्पन्न केले. दोघांत नाश न पावणारी अशी एकता उत्पन्न केली. अर्ककीर्तीला राजाने आपली कन्या अक्षमाला महावैभवाने धनसम्पदेसह दिली. असा त्याने त्याचा आदर केला. यानन्तर त्याने त्याला आपल्या नगराकडे (अयोध्येकडे) पाठविले व आपणही स्वतः यथायोग्य पोचवावयास गेला. याचप्रमाणे इतर राजे व विद्याधर राजांचाही त्याने उत्कृष्ट रत्ने, हत्ती, घोडे देऊन सन्मान केला व त्याने त्यांना पाठविले ॥ २८-३० ।।
आपण केलेल्या दुर्नीतीमुळे ज्यांना लाज उत्पन्न झाली व त्यामुळे ज्यांनी वैर त्यागले आहे अशा त्या राजानी आपआपल्या नगराकडे प्रयाण केले. बरोबरच आहे की दुर्दैवाने उत्पन्न झालेल्या अपराधांचे जी लौकरच क्षालन करिते तिलाच बुद्धि म्हणावे ॥ ३१ ॥
त्यावेळी पूर्वी ज्याचे कथन केले आहे असा चित्राङगद देव पुष्कळ सम्पत्तीसह आला व त्याने सुलोचनेचा विवाहरूपी मोठा उत्सव केला व विधिपूर्वक त्याची त्याने समाप्ति केली ॥ ३२॥
ज्याला पुष्कळ आवडते मित्र आहेत अशा जयकुमाराने मेघप्रभ, सुकेतु वगैरे उत्तम सहायक मित्रांना अनेकधनादिक पदार्थांनी संतुष्ट करून आपआपल्या गांवी पाठविले व आपल्या सर्व धाकटया भावांनाही नाना वस्तु देऊन सन्तुष्ट करून पाठवून दिले ॥ ३३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org