Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५-७६)
महापुराण
सुमुखस्तद्दयाभारमिव वोढुं तदा क्षमः । सजथोऽकम्पनो देव देवस्य नमति क्रमौ ॥ ६८ लब्धप्रसाद इत्युक्त्वा क्षिप्त्वाङ्गानि प्रणम्य तम् । विकसद्वदनाम्भोजः समुत्थाय कृताञ्जलिः ॥ ६९ इत एवोन्मुखौ तौ त्वत्प्रतीच्छन्तौ मदागतिम् । आस्थातां चातको वृष्टि प्रावृषो वादिवार्मुचः ॥७० इति विज्ञाप्य चक्रेशात्कृतानुज्ञः कृतत्वरः । सम्प्राप्याकम्पनं नत्वा सजयं विहितादरम् ॥ ७१ गोभिः प्रकाश्य रक्तस्य प्रसादं चक्रवर्तिनः । रवेर्वा वासरारम्भस्तद्वक्त्राब्जं व्यकासयत् ॥ ७२ साधुवादः सदानैश्च सम्मानैस्तौ च सदा । आनिन्यतुरतिप्रीति कृतज्ञा हि महीभृतः ॥ ७३ इत्यतर्योदयावाप्तिविभासितशुभोदयः । अनूषिवान् जयः श्रीमान् सुखेन श्वाशुरं कुलम् ॥ ७४ सुलोचनामुखाम्भोजषट्पदायितलोचनः । अनङ्गानणुबाणैक तूणीरायितविग्रहः ॥ ७५ तथा प्रवृत्ते सङ्ग्रामे सायकंरक्षतः क्षतः । पेलवैः कुसुमैरेभिविचित्रा विधिवृत्तयः ॥ ७६
(६०७
त्यावेळी चक्रवर्तीचे ते दयेचे ओझे वाहण्यास असमर्थ झालेला तो सुमुख चक्रवर्तीला असे म्हणाला हे प्रभो आपला प्रसाद ज्यांना मिळाला आहे असे जयकुमारासह अकम्पन महाराज आपल्या राजाधिराजांच्या दोन चरणांना वंदन करीत आहेत असे म्हणून आपले सर्व शरीर त्याने जमिनीवर टाकले अर्थात् चक्रवर्तीला साष्टाङ्ग नमस्कार केला. नन्तर ज्याचे मुखकमल प्रफुल्ल झाले आहे असा तो उठला व त्याने दोन हात जोडले. व असे म्हणाला हे प्रभो, दोन चातक पक्षी वर्षाकालाच्या पहिल्या मेघाच्या जलवृष्टीची उत्कंठेने वाट पाहतात तसे ते जयकुमार व अकम्पन महाराज हे दोघे माझ्याकडेच तोंड करून आपणापासून हा केव्हा येईल म्हणून माझी वाट पाहत आहेत. अशी विनंति चक्रवर्तीला त्याने केली तेव्हा चक्रवर्तीने त्याला अनुज्ञा दिली. यानन्तर तो त्वरेने जयकुमारसहित अकम्पन राजाकडे आला व त्याने आदराने त्याना नमस्कार केला. व दिवसाचा प्रारंभ जसे सूर्याच्या किरणानी कमलांना प्रफुल्लित करितो तसे त्या सुमुखाने प्रेमळ चक्रवर्तीची प्रसन्नता आपल्या भाषणानी प्रकट केली व त्या दोघांच्या मुखकमलांना त्याने प्रफुल्ल केले ।। ६८-७२ ।।
त्यावेळी जयकुमार व अकम्पन राजा या दोघांनी त्या दूताची फार प्रशंसा केली. त्याला पुष्कळ दान दिले व त्याचा चांगला संमान केला. त्यामुळे त्याच्या मनांत फार प्रेम उत्पन्न झाले. हे सर्व योग्यच आहे कारण राजे हे कृतज्ञ असतात ॥ ७३ ॥
याप्रमाणे अत अशा उत्कर्षाची प्राप्ति होऊन ज्याचा शुभोदय प्रकट झाला आहे असा तो श्रीसंपन्न जयकुमार आपल्या सासऱ्याच्या घरी सुखाने राहिला ॥ ७४ ॥
Jain Education International
सुलोचनेच्या मुखरूपीकमलावर ज्याचे डोळे भुंग्याप्रमाणे झाले आहेत व मदनाच्या मोठ्या बाणाना ज्याचे शरीर अद्वितीय भात्याप्रमाणे बनले आहे. अशा जयकुमाराचे शरीर खऱ्या युद्धात बाणानीं जखमी झाले नाही. पण आता मदनाच्या नाजुक पुष्परूपी बाणानी तो जखमी झाला. यावरून देवाची प्रवृत्ति मोठी विचित्र आहे असे म्हणावे लागते ।। ७५-७६ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org