________________
५९४)
महापुराण
(४४-३४२
सोऽन्वयः स पिता तादृक् पदं सा सैन्यसंहतिः । तस्याप्यासीदवस्थेयमन्मार्गः कं न पीडयेत् ॥३४२ वीरपट्टेन बद्धोऽयं चक्रिणानेन तत्सुतः । व्रणपट्टपदं नीतः पश्य कार्यविपर्ययम् ॥ ३४३ पतत्पतङ्गसङ्काशमर्ककीर्तिमनायुधम् । स्वरथे स्थापयित्वोच्चरारुह्यानेकपं स्वयम् ॥ ३४४ विपक्षखगभूपालान्नागपाशेन पाशिवत् । निष्पन्दं निजितारातिय॑मंसीसिहविक्रमान् ॥ ३४५ इति सौलोचने युद्धे समिद्धे शमिते तदा । पपात पञ्चभूजेभ्यो वृष्टिः सुमनसां दिवः ॥ ३४६ जयश्रीजयस्वामितनूजविजयाजिता । नोत्सेकायेति नास्यैनं अपैव प्रत्युताश्रयत् ॥ ३४७ जयनास्थानसंग्रामजयायातेति लज्जया । दूरीकृतेति तत्कोतिदिगन्तमगमत्तदा ॥ ३४८ अकम्पनमहीशस्य यूथेशं वा वनद्विपः । भूपैः संथमितैः सार्धमर्ककोति समर्प्य सः ॥ ३४९
तो प्रसिद्ध व उच्च असा इक्ष्वाकुवंश, षट्खण्डाचा स्वामी असा भरतचक्रवर्ती ज्याचा पिता, स्वतःला प्राप्त झालेले युवराजपद व अवर्णनीय सामर्थ्यशाली अशी सेना, हे ज्याचे आहेत अशा या अर्ककीर्तीची अशी दुरवस्था झाली. यावरून हे सिद्ध होते की वाईट मार्ग कोणाला बरे पीडा देत नाही ।। ३४२ ॥
या भरतचक्रवर्तीने जयकुमाराला वीरपट्ट बांधला होता. पण या जयकुमाराने त्याच्या पुत्राला व्रणपट्ट बांधला, हे राजा श्रेणिका हा कार्यविपर्यास पाहा ॥ ३४३ ॥
ज्याच्या हातात शस्त्र राहिले नाही, ज्याची अवस्था अस्ताला जात असलेल्या सूर्यासारखी तेजोहीन झाली आहे, अशा अर्ककीर्तीला जयकुमाराने आपल्या रथात आणून ठेवले व आपण एका उंच हत्तीवर बसला ॥ ३४४ ॥
__ ज्याने शत्रूला जिंकले आहे अशा या जयकुमाराने सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या शत्रुपक्षीय राजाना नागपाशाने हालता येणार नाही असे जखडून बांधले ।। ३४५ ॥
याप्रमाणे सुलोचनेमुळे पेटलेले हे युद्ध जेव्हां शांत झाले त्यावेळी मंदार, पारिजात, नमेरु, संतान व हरिचन्दन या पाच प्रकारच्या कल्पवृक्षांच्या फुलांची स्वर्गातून वृष्टि झाली ।। ३४६ ।।
जिंकण्याला कठिण अशा भरतचक्रवर्तीच्या पुत्रावर विजय मिळविल्यामुळे प्राप्त झालेली ही जयलक्ष्मी जयकुमाराला गर्वाला कारण झाली नाही. पण उलट ती लज्जेला कारण झाली ।। ३४७ ॥
. अयोग्यसमयी युद्ध केल्यामुळे प्राप्त झाली म्हणून जणु लज्जेने दूर केलेली या जयकुमाराची र्कीति त्यावेळी दिगन्तरी गेली ॥ ३४८ ।।
जसा एखादा मुख्यकळपाचा नायक हत्ती त्याच्या इतर हत्तीसह एखाद्याच्या स्वाधीन केला जातो तसा नागपाशानी बांधलेल्या इतर राजासह अर्ककीर्तीला जयकुमाराने अकम्पन राजाच्या स्वाधीन केले ॥ ३४९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org