Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५८०)
महापुराण
(४४-२३६
जयमुक्ता द्रुतं पेतुरविमुक्तजयाः शराः । अष्टचन्द्रान्प्रति प्रोच्चैः प्रदीप्त्योल्कोपमाः समम् ॥ २३६ जयप्रहितशस्त्राली तैनिषिद्धा च विद्यया । ज्वलन्ती परितश्चद्रान् परिवेषाकृतिर्बभौ ॥ २३७ विश्वविद्याधराधीशमादिराजात्मजस्तदा । द्विषो निःशेषयाङ्गतानित्याह सुनर्मि रुषा ॥ २३८ सोऽपि सर्वैः खगैः साधं निधूतारातिविक्रमः । वह्निवृष्टिमिवाकाशे ववर्ष शरसन्ततिम् ॥ २३९ भीकराः किङ्कराकारा रुवन्तो रुद्धदिङमुखाः । कांस्कान् श्रृणाम नेतीव सुतीक्ष्णाः शरवोऽपतन् । मेघप्रभो जयादेशादिभेन्द्रं वा मृगाधिपः । आक्रम्य विक्रमी शस्त्रररौत्सीत्तं विहायसि ॥ २४१ तमोग्निगजमेघादिविद्याः सुनमियोजिताः । तुच्छीकृत्य स चिच्छेद सहसा भास्करादिभिः ॥ २४२ जयपुण्योदयात्सद्यो विजिग्ये खचराधिपम् । सग्रामेऽनुगुणे देवे क्षोदिमा बंहिमेति न ॥ २४३
___ ज्यानी जयश्रीला सोडले नाही असे जयकुमाराने सोडलेले बाण आपल्या कान्तीनी अग्निचक्राप्रमाणे भासत होते व अष्टचन्द्रनामक विद्याधरराजावर एकदम व शीघ्र जाऊन ते त्यांच्यावर पडले ॥ २३६ ॥
जयकुमाराने सोडलेल्या शस्त्रपंक्तीला त्या अष्टचन्द्रविद्याधरांनी आपल्या विद्येच्या द्वारे रोखून धरले तेव्हां ती उज्ज्वल शस्त्रपंक्ति अष्टचन्द्रविद्याधरांच्या सभोवती, परिवेषाकाराने खळयाच्या रूपाने शोभू लागली ।। २३७ ।।
त्यावेळी सगळ्या विद्याधरांचा स्वामी अशा नमिविद्याधराला आदिराजाने जो भरतचक्रवर्ती त्याच्या मुलाने म्हणजे अर्ककीर्ति राजाने रागाने या सगळ्या शत्रूचा संहार कर असे म्हटले ।। २३८ ॥
ज्याने शत्रूचा पराक्रम हाणून पाडला आहे अशा त्या सुनमि विद्याधर राजाने त्या सर्व विद्याधरांना बरोबर घेऊन आकाशातून अग्नीच्या वृष्टीप्रमाणे बाणांची वृष्टि केली ॥२३९।।
ज्यानी सर्व दिशा व्यापल्या आहेत, जे अतिशय तीक्ष्ण, वेगामुळे सू सू शब्द करणारे, नोकराप्रमाणे आपली कामगिरी बजावणारे भयंकर बाण, आम्ही शत्रूकडील लोकांना कोणाकोणाला बरे न मारावे अर्थात् सर्वानाच मारले पाहिजे असे म्हणूनच की काय शत्रूच्या सैन्यावर पडू लागले ॥ २४० ॥
जसा सिंह गजेन्द्रावर आक्रमण करतो, तसे पराक्रमी मेघप्रभ राजाने जयकुमाराच्या आज्ञेने शस्त्रानी आक्रमण करून सुनमीला आकाशात पुढे येण्यास प्रतिबंध केला ॥ २४१ ।।
___ अंधार, अग्नि, गज, मेघ आदिक विद्यांचा सुनमीने शत्रुसैन्यावर प्रयोग केला पण सूर्य वगैरे विद्यांच्या द्वारे तो प्रयोग मेघप्रभाने निष्फल केला व सुनमियोजित विद्यांचा मेघप्रभाने नाश केला ॥ २४२ ।।
जयकुमाराच्या पुण्योदयाने मेवप्रभाने तत्काल सुनमि विद्याधराला युद्धात जिंकले. बरोबरच आहे की, दैव अनुकूल असले म्हणजे क्षुद्रपणा व मोठेपणा यांचा काही उपयोग होत नाही ॥ २४३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org