Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५८४)
महापुराण
(४४-२६७
कोयोपमानतां यातो यातोऽर्कश्चेददृश्यताम् । उपमेयस्य का वार्तेत्यवादीद्विदुषां गणः ॥ २६७ दुनिरीक्ष्यः करस्तीक्ष्णः सन्तप्तनिजमण्डलः । अलं कुवलयध्वंसी दुःसुतो दुर्मतिस्तुतः ॥ २६८ निःसहायो निरालम्बोऽप्यसोढा परतेजसाम् । सिंहराशिश्चलः क्रूरः सहसोच्छित्य मूर्षगः ॥ २६९
----
...............................
कीर्तीमुळे उपमानपणाला सूर्य प्राप्त झाला तरीही जर तो अदृश्यपणाला प्राप्त झाला तर उपमेयाचे वर्णन कशास करावयाचे असे विद्वान् लोक म्हणाले. तात्पर्य- जे उपमान असते त्याच्यात अधिक गुण असतात व जे उपमेय असते त्याच्यात कमी गुण असतात असा काव्यशास्त्राचा नियम आहे. येथे चक्रवर्ती भरताच्या पुत्राचे नांव अर्ककीर्ति आहे. सूर्याप्रमाणे ज्याची कीर्ति आहे असा तो अर्ककीर्ती असा शब्दार्थ होतो. यात उपमान सूर्य आहे व उपमेय चक्रवर्तिपुत्र आहे. गुणाने अधिक असलेल्या उपमानभूत सूर्याचा जर नाश होतो तर उपमेयाचीगुणानी कमी असलेल्या अर्ककीर्तीची काय कथा ? अर्थात त्याचा नाश होईलच असा या श्लोकाचा अभिप्राय आहे ।। २६७ ॥
या वरील चार श्लोकात सूर्याची आणि दुष्ट राजाची तुलना केली असल्यामुळे प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ होतात. त्यात पहिला अर्थ सूर्याकडे लावावा व दुसरा अर्थ दुष्ट राजाकडे लावावा. जो सूर्य करानी-किरणानी तीक्ष्ण आहे म्हणन तो दुनिरीक्ष्यः त्याच्याकडे पाहणे शक्य होत नाही. सूर्याचे मण्डल नेहमी तापलेले असते. तो सूर्य नेहमी कुवलयध्वंसी- पांढऱ्या कमलांचा नाश करणारा असतो. तो सूर्य दुःसुतः- दुष्ट अशा शनिनामक पुत्राने सहित आहे व दुर्मतिस्तुतः- ज्यांची मति-ज्ञान कुमार्गाला लावणारे आहे अशा लोकाकडून सूर्य स्तविला जात आहे व दुसरा अर्थ असा आहे दुष्ट राजा करैः तीक्ष्ण:- प्रजेवर अनेक प्रकारचे कर लादून तीक्ष्णः दुःखदायक होतो. तो कठोर असल्यामुळे त्याचेकडे बघणे लोकाना शक्य होत नाही. तो दुष्ट राजा सन्तप्तनिजमण्डल:- ज्याचे मांडलिक राजे त्याच्याविषयी सन्तप्त झालेले असतात व तो राजा कुवलयध्वंसी- कुवलयाचा-पृथ्वीमण्डलाचा नाशक होतो व तो दुःसुतः- मातेने कष्ट भोगून त्याला जन्म दिलेला असतो आणि तो राजा ज्यांची बुद्धि अनीतिवर्धक आहे अशा लोकाकडून स्तविला जातो ।। २६८ ।।
सूर्य निःसहायः- कोणाचा आश्रय घेत नाही व निरालम्बः- आधाररहित असतो आणि परतेजसां असोढा- दुसऱ्या चन्द्र, नक्षत्रादिकांचे तेजाला तो सहन करीत नाही, दुसऱ्याच्या तेजांचा तो घात करतो तो सिंहराशीवर असतो, चल चंचल व क्रूर असतो व उदय पावून मध्याह्नकाली मस्तकावर चढतो व दुष्ट राजा सिंहराशीवर जन्मलेला असतो म्हणून तो चंचल व क्रूर आणि सर्वांच्या डोक्यावर बसलेला असतो ।। २६९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org