Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५८२)
महापुराण
(४४-२५३
कुमार समरे हानिस्तवैव महती मया। हन्त्यात्मानमनुन्मत्तः कः स तीक्ष्णासिना स्वयम् ॥ २५३ अभव्य इव सद्धर्ममपकर्पोत्यदीरितम् । आघातयितुमारेभे गजेन स गजाधिपम् ॥ २५४ तदा जयोऽप्यतिक्रुद्धो गजयुद्धविशारदः । नवभिविजयार्द्धन दन्तघातरघातयत् ॥ २५५ नवापि कुपितेभेन्द्रनवदन्ताहतिक्षताः । अष्टचन्द्रार्ककीर्तीनां प्रपेतुर्हन्तदन्तिनः ॥ २५६ चक्रिसूनोः पुनः सेना परितोऽयात्रुयुत्सया। तदा तदायुरिक्षवहः क्षयमपद्यत ॥ २५७ सोढमर्कः खलस्तेजो जयस्याशक्नुवन्निव । जयन् जयोद्गमच्छायां संहृताशेषदीधितिः ॥२५८ शररिवोरारक्तैविमुक्तः खचरान्प्रति । जयी यैः स्वाङ्गसल्लग्नः क्षरत्क्षतजरञ्जितैः ॥ २५९ गतप्रतापः ऋरात्मा सर्वनेत्राप्रियस्तदा । पपात कातरीभूय करालम्बितभूधरः ॥ २६०
हे कुमारा, माझ्याकडून तुझ्या सैन्याची मोठी हानि होईल. कोण बरे सावधान मनुष्य तीक्ष्ण तरवारीने आपलाच घात करून घेईल बरे? ॥ २५३ ॥
अभव्य जीव जसे उत्तम धर्माचे श्रवण करीत नाही तसे जयकुमाराचे हे भाषण अर्ककीर्तीने ऐकले नाही आणि आपल्या हत्तीच्या द्वारे जयकुमाराच्या उत्तम हत्तीवर प्रहार करावयास त्याने सुरुवात केली ॥ २५४ ।।
त्यावेळी गजयुद्धनिपुणजयकुमार- देखील फार रागावला व त्याने आपल्या विजया नामक हत्तीच्या द्वारे दातांच्या नऊ प्रहारानी अर्ककीर्ती आणि अष्टचन्द्र विद्याधरांच्या नऊ हत्तीना घायाळ करविले ॥ २५५ ॥
जयकुमाराच्या रागावलेल्या विजयार्ध नामक श्रेष्ठ हत्तीच्या नऊ नऊ दातांच्या आघातानी अर्ककीर्ती व अष्टचन्द्र विद्याधरांचे नऊ हत्ती देखील अरेरे घायाळ होऊन जमिनीवर पडले ॥ २५६ ॥
त्यावेळी चक्रवर्तीपुत्राची अर्ककीर्तीची सेना सर्व बाजूनी लढण्याच्या इच्छेने धावत आली व त्यावेळी जणु त्या सेनेचे रक्षण करणारे आयुष्यच की काय असा दिवस नाश पावला, अस्ताला गेला ।। २५७ ।।
___ जयकुमाराचे तेज जणु सहन करण्यास असमर्थ झालेला, जास्वंदीच्या फुलाची जी लाल कान्ति तिला जिंकणारा, ज्याने आपले सर्व किरण आवरून घेतले आहेत असा आपल्या लाल किरणानी सूर्य असा भासतो की, जणु जयकुमाराने विद्याधरावर जे बाण सोडले होते ते सगळेच विद्याधराच्या निघणाऱ्या रक्ताने अनुरंजित होऊन याच्या ( सूर्याच्या) शरीरात जाऊन जणु संलग्न झाले आहेत असा ज्याचा प्रताप- सन्ताप देणे व पराक्रम नाहीसा झाला आहे असा, ज्याचे स्वरूप क्रूर उग्र आहे असा जो सर्वांच्या नेत्राना अप्रिय झाला आहे असा दुष्ट सूर्य भिऊन आपल्या करानी-किरणानी पर्वताला धरून खाली पडला, अस्ताला गेला ॥ २५८-२६० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org