Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-२५२)
महापुराण
(५४१
प्रवृद्धप्रावृडाररम्भसम्भताम्भोधरावलिम् । विलङध्यानेकपानीकं कौमारं जयमारुणत् ॥ २४४ जयोऽप्यभिमुखीकृत्य विजयाद्धं गजाधिपम् । धीरोद्धतं रुषाप्राप्तं धीरोदात्तोऽब्रवीविदम् ॥ २४५ न्यायमार्गाः प्रवर्त्यन्ते सम्यक सर्वेऽपि चक्रिणा । तेषामेभिर्दुराचारः कृतस्त्वं परिपन्थिकः ॥ २४६ बद्धिमांस्त्वं तवाहार्यबुद्धित्वमपि दूषणम् । कुमार नीयसे पापस्तृतीयं तद्विहितम् ॥ २४७ अन्तःकोपोऽप्ययं पापमहानुत्थापितो वथा । सर्वतन्त्रक्षयो भर्तुः सहसा येन तादृशः॥ २४८ आहवः परिहार्योऽयं मामाद्य भवता सह । अकीतिश्चावयोरस्मिन्नाकल्पस्थायिनी ध्रुवम् ॥२४९ चक्री सुतेषु राज्यस्य योग्यं त्वामेव मन्यते । स्यात्तस्यापि मनःपीडा न वेत्यन्यायवर्तनात् ॥ २५० द्रोग्धुयायस्य भूभर्तुस्तव चैतांस्ततः क्षणात् । दुष्टान्सखेचरान्सन्बिद्धवाद्य भवतोऽपये ॥ २५१ नागमारुह्य तिष्ठात्र काष्ठान्तं प्रार्थितो मया । अन्यायो हि पराभूतिर्न तत्त्यागो महीयसः॥२५२
वर्षाऋतूच्या आरंभी पाण्याने तुडुंब भरलेले व खूप वाढलेले असे जे मेघ त्याप्रमाणे असलेल्या हत्तींच्या सेनेला उल्लंघून कुमार अर्ककीर्तीच्या सैन्याने जयकुमाराला रोखले ॥२४४ ॥
____ जयकुमाराने देखील आपला विजयाई नामक हत्ती अर्ककीर्तीच्या पुढे उभा केला व धीर आणि उदात्त पण रागावलेल्या कुमाराला धीरोदात्त असा जयकुमार याप्रमाणे बोलला ॥ २४५ ।।
चक्रवर्तीने सर्व न्यायमार्ग चांगल्यात-हेने चालू केले आहेत. पण या दुराचरणी लोकांनी तुला त्या न्यायमार्गांचा शत्रु बनविले आहे ।। २४६ ॥
हे कुमार? तू बुद्धिमान आहेस पण तुझ्याठिकाणी आहार्यबुद्धित्व होणे दोष आहे. अर्थात् दुसऱ्यांनी सांगितलेले अनसरून त्याप्रमाणे करणे हा दोष तुझ्याठिकाणी आहे आणि पापी लोकाकडून तू नेला जात आहेस हा तिसरा दोष तुझ्या ठिकाणी आहे. अर्थात् पापी लोकांच्या सल्ल्याने तू वागतोस ।। २४७ ।।
या दुष्ट लोकांनी तुझ्या मनात विनाकारण फार मोठा क्रोध उत्पन्न केला आहे व त्यामुळे भरतमहाराजांच्या सर्व सैन्याचा नाश होण्याचा प्रसंग प्राप्त झाला आहे ॥२४८ ॥
___ माझे तुझ्याशी जे युद्ध चालू आहे ते आजच बन्द करण्यायोग्य आहे. कारण या युद्धाने तुझी आणि माझी कल्पान्तकालापर्यन्त टिकणारी अपकीर्ति अवश्य होईल ॥ २४९ ।।
चक्री भरताला पुष्कळ मुले आहेत पण तो तुलाच राज्ययोग्य मानीत आहे या तुझ्या अन्यायाच्या वागणुकीने त्याच्या मनाला पीडा होणार नाही काय? ॥ २५० ॥
भरत महाराजांच्या न्यायमार्गाशी द्रोह करणाऱ्या या तुझ्या दुष्ट लोकाना विद्याधरासह बांधून मी तुझ्या स्वाधीन एका क्षणात करीन ।। २५१ ॥
__मी तुझी प्रार्थना करतो की थोडा वेळपर्यन्त तू या हत्तीवर चढून बैस. महापुरुषानी अन्याय करणे हाच त्यांचा पराभव आहे. अन्यायाचा त्याग करणे हा पराभव नाही ।। २५२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org