________________
४४-२३५)
महापुराण
(५७९
शस्त्रनिभिन्न सर्वाङ्गा निमीलितविलोचनाः। सम्यक् संहृतसंरम्भाः सम्भावितपराक्रमाः ॥२२८ बुद्धव बद्धपल्यङ्कास्त्यक्तसर्वपरिच्छदाः । समत्याक्षुरसूञ्छूरा निधाय हृदयेऽर्हतः ॥ २२९ कस्य चित्क्रोधसंहारः स्मृतिश्च परमेष्ठिनि। निष्ठायामायुषोऽत्रासीदभ्यासात्कि न साध्यते ॥२३० हृदि नाराचनिभिन्ना वक्त्रास्रवदसप्लवाः । शिवाकृष्टान्त्रतन्त्रान्ताः पर्यन्तव्यस्तपत्कराः ॥ २३१ गद्धपक्षानिलोच्छिन्नमूर्छाः सम्प्राप्तसंज्ञकाः । समाधाय हि ते शुद्धां श्रद्धां शूरगति गताः ॥ २३२ छिन्नश्चक्रेण शूराणां शिरोऽम्भोजैविकाशिभिः। रणरङ्गोऽन्वितो वाभात् नृत्य जयजयश्रियः ॥२३३ स्वामिसन्मानदानादिमहोपकृतिनिर्भराः । प्राप्याधमर्णतां प्राणः सेवां सम्पाद्य सेवकाः ॥ २३४ स्वप्राणध्ययसन्तुष्टैस्तद्भूभृद्भिः स्वभूभृतः । लब्धपूजाविधायान्ये धन्या नैर्ऋण्यमागमन् ॥ २३५
__ शस्त्रांनी ज्यांचे सर्वांग-सर्व अवयव विदीर्ण झाले आहेत, ज्यानी आपले डोळे मिटविले आहेत, ज्यानी युद्धाचे कार्य उत्तमरीतीने बंद ठेवले आहे, ज्यानी अनेक शौर्याची कामे केली आहेत, ज्यानी आपल्या मनाने पल्यङकासन घातले आहे व मनाने ज्यानी परिग्रहत्याग केला आहे अशा शूर पुरुषानी आपल्या मनात अरिहन्ताला स्थापन करून प्राणाला शान्तपणाने त्यागले आहे ॥ २२८-२२९ ।।
एका योद्धयाच्या आयुष्याच्या समाप्तीच्या वेळी त्याने क्रोधाचा त्याग केला व आपल्या हृदयात तो परमेष्ठीचे स्मरण करू लागला. त्याला अभ्यासाने हे साध्य करता आले ॥२३०॥
___ जे छातीत बाणाने फार विदीर्ण झाले आहेत व ज्यांच्या मुखातून रक्ताच्या गुळण्या बाहेर पडत आहेत व कोल्ह्यानी ज्यांची आंतडी बाहेर काढली आहेत, ज्यांचे हातपाय अस्ताव्यस्त पडले आहेत असे काही वीर गिधाडांच्या पंखानी मूर्छा नाहीशी झाल्यामुळे सावध झाले व त्यावेळी ते अन्तःकरणात शुद्ध निर्मल अशी अर्हच्छद्धा धारण करून शूरगतीला पावलेस्वर्गाला गेले ॥ २३१-२३२ ।।
शूर योद्धयांची विकसित झालेली मुखकमले चक्रनामक शस्त्राने तुटून रणरंगभूमीवर पडली तेव्हां ती जयकुमाराच्या जयलक्ष्मीच्या नृत्याकरिता जणु तयार केल्याप्रमाणे शोभू लागली ॥ २३३ ।।
आपल्या मालकाने आपला सन्मान केला, आपल्याला धनदान दिले वगैरे मोठा उपकार केला त्यामुळे आपण त्याचे ऋणी झालो आहोत, तेव्हां आपण आपल्या प्राणानी मालकाची सेवा केली पाहिजे असा विचार करून सेवकानी युद्धात प्राणदान देऊन सेवा केली व त्यात सन्तोष मानला व मालकाच्या ऋणातून ते मोकळे झाले आणि कित्येक धन्यसेवक शत्रूना मारून कृतार्थ झाले. तात्पर्य असे की, कित्येक नोकर लढत लढत मरण पावले व कित्येक सेवक शत्रला मारून कृतार्थ झाले ॥ २३४-२३५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org