Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५७८)
महापुराण
(४४-२२१
जयोऽपि सुचिरात्प्राप्तप्रतिपक्षो व्यदीप्यलम् । लब्ध्वेव रन्धनं वह्निरुत्साहाग्निसखोच्छ्रितः ॥२२१ तदोभयबलख्यातगजादिशिखरस्थिताः । योद्धमारेभिरे राजराजसिंहाः परस्परम् ॥ २२२ अन्योन्यरदनोद्धिन्नौ तत्र कौचिद्वयसू गजौ । चिरं परस्पराधारावास्थातां यमलाद्विवत् ॥ २२३ समन्ततः शरैश्च्छन्ना रेजुराजौ गजाधिपाः । क्षुद्रवेणुगणाकीर्णसञ्चलगिरिसन्निभाः॥ २२४ दानिनो मानिनस्तुङ्गाः कामवन्तोऽन्तकोपमाः। महान्तः सर्वसत्वेभ्यो न युध्यन्ते कथं गजाः ॥२२५ मृगैर्मगैरिवापातमात्रभग्नर्भयाद्विपः । स्वसैन्यमेव संक्षुण्णं षिक् स्थौल्यं भीतचेतसाम् ॥ २२६
निःशक्तीन शक्तिभिः शक्ताः शक्तांश्चक्रुरशक्तकान् । शक्तियुक्तानशक्तांश्च निःशक्तीन विधिगूनताम् ॥ २२७
जसा वायुमित्रामुळे भडकलेला अग्नि पुष्कळसे जळण मिळाल्यामुळे उत्साहाने वाढतो तसे पुष्कळ वेळाने प्रतिपक्षाची गाठ पडल्यामुळे अतिशय उत्साहाने फार चमकू लागला ॥२२१॥
नंतर दोन्ही सैन्यात प्रसिद्ध असलेले आणि हत्तीरूपी पर्वतशिखरावर विराजमान झालेले असे अनेक राजेरूपी सिंह एकमेकाबरोबर लढण्यास उद्युक्त झाले ॥ २२२ ॥
त्यावेळी एकमेकांच्या दातांनी विदीर्ण झालेले कोणी दोन हत्ती मरण पावले व एकमेकाशी मिळून गेलेल्या दोन यमक पर्वताप्रमाणे एकमेकांच्या आधाराने उभे राहिले होते ॥ २२३ ॥
___ त्या युद्धभूमीत सर्व बाजूनी बाणानी ज्यांचे अंग भरून गेले आहे असे श्रेष्ठ हत्ती लहानशा वेळूच्या समूहानी व्याप्त झालेल्या व हालत असलेल्या पर्वताप्रमाणे शोभू लागले ॥ २२४ ।।
जे दानी आहेत, ज्यांच्यापासून मदजल गळत आहे, जे मानी आहेत व उंच आहेत, जे कामवन्त म्हणजे मालकाच्या इच्छेला अनुसरून वागत आहेत व जे यमासारखे दिसतात व सर्व प्राण्यापेक्षा जे मोठे आहेत असे भद्र जातीचे हत्ती का बरे युद्ध करणार नाहीत अर्थात् ते अवश्य युद्ध करतातच ।। २२५ ॥
मृग जातीचे हत्ती हरिणाप्रमाणे शत्रूचा हल्ला झाल्याबरोबर भीतीने पळत सुटले व त्यानी स्वतःचेच सैन्य चिरडून टाकले. यास्तव ज्यांची अंतःकरणे भयग्रस्त आहेत अशांच्या मोठेपणाला धिक्कार असो ।। २२६ ।।
शक्तिशाली-सामर्थ्यवान् योद्धे, शक्तिनामक शस्त्राच्या साहाय्याने ज्यांच्याजवळ शक्तिनामक शस्त्र नाही अशा समर्थ योद्धयांना शक्तिरहित करीत होते व ज्यांच्याजवळ शक्तिनामक शस्त्र आहे, पण जे असमर्थ आहेत, दुबळे आहेत त्यानाही त्यांचे ते शस्त्र त्यांच्यापासून हिसकावून त्यानी असमर्थ केले. बरोबरच आहे की, ऊनताही धिक्काराला पात्र आहे दुर्बलताही धिक्काराला योग्य आहे ।। २२७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org