________________
५६८)
महापुराण
(४४-१३८
पत्रवन्तः प्रतापोग्राः समग्रा विग्रहे व्रताः । अज्ञातपातिनश्चक्रुः कूटयुद्धं शिलीमुखाः ॥ १३८ प्रस्फुरद्भिः फलोपेतैः सुप्रमाणः सुकल्पितः । विरोधोद्भाविना विश्वगोचरैविजयावहैः ॥ १३९ वादिनेव जयेनोच्चः कीति क्षिप्रं जिघृक्षणा । प्रतिपक्षः प्रतिक्षिप्तः शस्त्रैः शास्त्रैजिगीषुणा ॥१४० खगाः खगान्प्रति प्रास्ताः प्रोद्भिद्य गगनं गताः । निवर्तन्ते न यावत्ते ते भियेवापतन्मृताः॥ १४१ सुतीक्ष्णा वीक्षणाभीलाः प्रज्वलन्तः समन्ततः। मूर्चस्वशनिववत्पेतुः खाद्विमुक्ताः खगैः शराः ॥१४२ शरसङ्घातसञ्छन्नानगृध्रपक्षान्धकारितान् । अदृष्टमुद्गराघातान्नभोगा नभसोध्यधुः ॥ १४३ चण्डरकाण्डमृत्युश्च काण्डरापाद्यतादिमे । युगेऽस्मिन्किकिमस्तांशुभासिभि शुभं भवेत् ॥ १४४
अथवा ते बाण कपटयुद्ध करीत आहेत असे वाटत होते. जसे कपटयुद्ध करणारे वीर पत्रवन्त अर्थात् रथ, घोडा इत्यादिकानी सहित आणि प्रतापाने उग्र असतात त्याप्रमाणे ते बाण देखिल पत्रवन्त पंखाने सहित व अधिक तेजस्वीपणाने उग्र दिसत होते. जसे कपट युद्ध करणारे वीर शीघ्र आक्रमण करतात तसे हे बाण शीघ्र शत्रूवर जाऊन पडत होते. शत्रूला न समजेल अशा रीतीने जाऊन त्याच्यावर पडत होते. म्हणून ते बाण जणु कपट युद्धच करीत आहेत की काय असे वाटू लागले ॥ १३८ ।
___ जसे विजय मिळवून उत्तम कीर्तीची प्राप्ति करून घेणारा व जिंकण्याची इच्छा करणारा वादी स्फुरण पावणारी म्हणजे उत्तम अध्ययन झाले असल्यामुळे त्वरित आठवणारी, प्रतिवादीचा पराभव करणे या फलाने युक्त, ज्यातील प्रमाणे अबाधित आहेत अशी, योग्य प्रसंगी योजलेली, ज्यात संपूर्ण विश्व विषय होत आहे अशी व विजयप्राप्ति करून देणारी जी शास्त्रे त्याच्या योगाने शीघ्र कीर्ति मिळविण्याची इच्छा करणाऱ्या वादी पुरुषाने ज्याप्रमाणे प्रतिवादीच्या पक्षाला खंडित करून दूर फेकून द्यावे त्याप्रमाणे प्रस्फुरणारी, चमकणारी, तीक्ष्णाग्रानी युक्त, ज्यांची लांबी रुंदी वगैरे प्रमाणयुक्त आहे अशी व योग्यप्रकारे योजलेली, चोहोकडे प्रवेश करणारी आणि विजयाची प्राप्ति करून देणारी अशी जी शस्त्रे त्यांच्यायोगे निर्मल कीर्ति मिळविण्याची व शत्रूला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या जयकुमाराने शत्रूची बाजू त्वरेने मागे सारली. अर्थात् आपल्या तीक्ष्ण बाणानी शत्रूस हटविले ॥ १३९-१४०॥
विद्याधरावर सोडलेले आणि आकाशात गेलेले ते बाण विद्याधरांच्या शरीराना भेदून परत आले नाहीत तोंच ते विद्याधर जणु भीतीने मरून खाली पडले. जे विद्याधरानी बाण सोडले ते अतिशय तीक्ष्ण होते व पाहण्याला भयंकर आणि सर्व बाजूनी पेटणारे होते. आकाशातून सोडलेले ते बाण लोकांच्या मस्तकावर वज्राप्रमाणे पडले. त्या विद्याधरानी आकाशातून भूमीवरील वीराना बाणांच्या समूहाने आच्छादिले. तेव्हा ते वीर गिधाडांच्या पंखानी अंध:कारमय झाले व त्यांना मुद्गराचे आघात आपल्यावर पडत आहेत हेही दिसेना. अशी परिस्थिति विद्याधरानी भूमीवरील वीरांची केली ॥ १४१-१४३ ।।
___ या प्रथमयुगात प्रखर अशा बाणानी अकाली अनेक वीरांचा मृत्यु उत्पन्न केला. बरोबरच आहे की, ज्यानी सूर्याचे तेजही कमी केले आहे अशा पुरुषाच्या द्वारे काय काय होणार नाही बरे ? सर्व काही होईल ॥ १४४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org