________________
४४-१८६)
महापुराण
(५७३
निःशेषहेतिपूर्णेषु रथेषु रथनायकाः । तुलां जगर्जुरारुह्य पाञ्जरैः कुञ्जरारिभिः ॥ १७८ चक्रसङघट्टसम्पिष्टशवासृङमांसकर्दमे । रथकड्याश्चरन्ति स्म तत्राब्धी मन्दपोतवत् ।। १७९ कुन्तासिप्रासचक्रादिसङ्कीर्ण वणितक्रमाः । अक्रामन् कृच्छ्रकृच्छेण रणे रथतुरङ्गमाः ॥ १८० तदा सन्नद्धसंयुक्तसर्वायुषभतं रथम् । सङक्रम्य वृषभं वार्कः समारूढपराक्रमः ॥ १८१ । पुरो ज्वलत्समत्सर्पच्छरतीक्ष्णांशुसन्ततिः । शत्रुसन्तमसं भिन्दन बालार्कमजयज्जयः ॥ १८२ मण्डलानसमुत्सृष्टदुष्टात्रः शस्त्रकर्मवित् । जयो भिषजमन्वीयः शत्रुशल्यं समुखरन् ।। १८३ ध्वजस्योपरि धूमो वा तेनाकृष्टो नु सायकः । पपात तापमापाद्य सूचयनशुभं द्विषाम् ॥ १८४ ध्वजदण्डान्समाखण्डय विद्विषो वीतपौरुषान् । कुर्वन्सर्वान्स निवंशान्सोमवंशध्वजायते ॥ १८५ विच्छिन्नकेतवः केचित्क्षणं तस्थुम॒ता इव । प्राणन प्राणिनः किंतु मानप्राणा हि मानिनः ॥ १८६
संपूर्णशस्त्रांनी भरलेल्या रथात रथी वीर बसून पिंजऱ्यात असलेल्या हत्तीच्या वऱ्याप्रमाणे-सिंहाप्रमाणे गर्जना करू लागले ॥ १७८ ।।
चाकांच्या घर्षणाने चूर्ण झालेल्या प्रेतांच्या रक्तांच्या व मांसांच्या चिखलाने भरलेल्या त्या रणाङ्गणात ते रथांचे समूह समुद्रात फिरणाऱ्या लहान नावाप्रमाणे फिरू लागले ॥ १७९॥
भाले, तरवारी, पट्टे, चक्र यांनी भरलेल्या त्या रणांगणात ज्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत असे रथाचे घोडे मोठ्या कष्टाने चालत होते ॥ १८० ॥
त्यावेळी तयार केलेला, जोडलेला व सर्व शस्त्रांनी भरलेला अशा रथात जसा वृषभ राशीवर सूर्य आरोहण करतो तसे जयकुमाराने आरोहण केले. ज्याचा पराक्रम वृद्धिंगत झाला आहे व पुढच्या बाजूला चमकणारे व वर पसरत आहेत तीव्र किरणसमूह ज्यांचे असे बाणसमूह ज्याच्याजवळ आहेत अशा जयकुमाराने शत्रूरूपी अंधाराच्या समुदायाचे भेदन करून बालसूर्याला जिंकले ॥ १८१-१८२ ॥
आपल्या तरवारीने ज्याने दुष्टांचे-शत्रूचे रक्त बाहेर काढले आहे, जो शस्त्रक्रिया चांगली जाणत आहे व शत्रुरूपी शल्य काढून टाकणारा तो जयकुमार शस्त्रवैद्यासारखा भासत होता ॥ १८३ ॥
त्या जयकुमाराने धनुष्याच्या दोरीवर लावून ओढलेला बाण शत्रूना संताप उत्पन्न करणारा व त्यांचे अशुभ सुचविणारा जणु धूमकेतु असा होऊन त्यांच्या ध्वजावर पडला ॥१८४॥
शत्रूच्या ध्वजदंडाना तोडून शत्रूना पौरुषरहित करणारा व निवंश करणारा अथवा वंश-वेळूच्या काठ्या नाहीतशा करणारा, असा तो जयकुमार सोमवंशाच्या ध्वजाप्रमाणे शोभत आहे ॥ १८५ ।।
ज्यांचे ध्वज छिन्नभिन्न केले आहेत असे कित्येक शत्रु क्षणपर्यन्त मेल्याप्रमाणे उभे राहिले. बरोबरच आहे को फक्त प्राणानेच-प्राणांच्या सद्भावानेच प्राणी मानले जातात असे नाही परन्तु मान हाच प्राण्यांचा प्राण आहे ॥ १८६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org