________________
४४-१६८)
महापुराण
(५७१
वषं विधाय न्यायेन जयेनान्यायवर्तिनाम् । यमस्तीक्ष्णोऽप्यभूधर्मस्तत्र दिव्यानलोपमः ॥ १६१ तावद्धेषितनिर्घोषैर्भोषयन्तो द्विषो हयाः । बलमाश्वासयन्तः स्वं स्वीचऋश्चाक्रिसूनवः ॥ १६२ प्रासान्प्रस्फुरतस्तीक्ष्णानभीक्ष्णं वाहवाहिनः । आवर्तयन्तः सम्प्रापन यमस्येवाग्रगा भटाः ॥ १६३ जयोऽपि स्वयमारुह्य जयी जयतुरङ्गमम् । ऋद्धः प्रासान्समुद्धृत्य योद्धमश्वीयमादिशत् ॥ १६४ अभूत्प्रहतगम्भीरभम्भादिध्वनिभीषणः । बलार्णवश्चलस्थूलकल्लोल इव वाजिभिः ॥ १६५ असिसङ्घट्टनिष्ठातविस्फुलिङ्गो रणेऽनलः । भीषणे शरसङ्घाते व्यदीपिष्ट पराचिते ॥ १६६ वाजिनः प्राक्कशाघातावधावन्नभिनायकम् । नियन्ते न सहन्ते हि परिभूति सतेजसः ॥ १६७ स्थिताः पश्चिमपादाभ्यां बद्धामर्षाः परस्परम् । पति केचिदिवावन्तो युद्धचन्ते स्म चिरं हयाः॥
...........--
जयकुमाराच्या द्वारे अन्यायाने वागणाऱ्या लोकांचा न्यायाने वध करवून यमराज जरी तीक्ष्ण होता तरीही त्यावेळी तो दिव्य अग्निप्रमाणे धर्मरूप झाला. तात्पर्य हे की, दिव्य अग्नि जो न्यायाने वागतो त्याला जाळीत नाही पण अन्यायी लोकांना तो जाळून टाकतो तसे यम हा न्यायाने वागणान्या जयराजाला धर्मस्वरूप झाला व अन्यायी चक्रवर्तीसुत अर्क कीर्तीच्या अपेक्षेने यम हा दिव्यानलस्वरूप-नाशक झाला ॥ १६१ ॥
त्यावेळी आपल्या खिंकाळण्याच्या शब्दानी शत्रूना भय दाखविणारे आणि स्वबलाला, अर्ककीर्तीच्या सैन्याला धैर्ययुक्त करणारे घोड्यांचे सैन्य तेथे आले ॥ १६२ ॥
जणु यमाचे मुख्य भट-वीरपुरुष असे घोडेस्वार आपल्या सभोवती तीक्ष्ण व चमकणारे असे भाले अथवा पट्टे फिरवित तेथे आले ।। १६३ ।।
त्यावेळी विजयी जयकुमार देखील आपल्या जयशाली घोड्यावर स्वतः आरोहण करून तेथे क्रुद्ध होऊन आला आणि आपल्या घोडेस्वारांना भाले किंवा पट्टे धारण करून अर्ककीर्तीच्या घोडेस्वाराबरोबर लढण्याची त्यांना त्याने आज्ञा दिली ॥ १६४ ॥
त्यावेळी वाजविलेले नगारे शंख वगैरेंच्या ध्वनींनी-गर्जनानी भीषण-भयंकर असा सेनासमुद्र घोड्यांनी जणु मोठ्या लाटानी हालणाऱ्या समुद्राप्रमाणे फार खवळला ॥ १६५ ॥
त्या युद्धात रणभूमीवर जो बाणांचा भयंकर समूह पडला होता. त्यावर तरवारीच्या समूहांचे घर्षण होऊन त्यापासून ठिणग्या ओकणारा असा अग्नि प्रज्वलित झाला होता ॥१६६।।
ते घोडे चाबकाचा फटका बसण्याच्या पूर्वीच शत्रुसैन्यातील मुख्य वीरावर धावून गेले. कारण जे तेजस्वी असतात ते मरण पत्करतील पण पराभव - अपमान सहन करणार नाहीत ।। १६७ ॥
एकमेकाविषयी ज्याना क्रोध उत्पन्न झाला आहे असे घोडे आपल्या मागील पायावर उभे राहिले व आपल्या मालकांचे जणु रक्षण करीत आहेत असे ते पुष्कळ वेळपर्यंत लढले ॥१६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org