Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५७२)
महापुराण
(४४-१६९
समुद्धृतास्त्रसम्पृक्तलसल्लोलासिपत्रकः । नभस्तरभा यस्तवापल्लवितो यथा ॥ १६९ पतितान्यसिनिर्घातात्सुदूरं स्वामिनां क्वचित् । शून्यासनाः शिरांस्युच्चरन्वेष्टुं वाभ्रमन्हयाः॥ पशन विशङ्गान्मत्वाश्वान् कृपया कोऽपि नावधीत्। ते च दन्तकरैरेव ऋद्धाः प्राघ्नन् परस्परम् ॥१७१ बंशमात्रावशिष्टाङ्गमण्डलाश्चिरं क्रुधा । लोहदण्डरिवाखण्ड/रा युयघिरे धुरि ॥ १७२ शिरःप्रहरणेनान्योऽपश्यन्नान्ध्यं प्रकुर्वता । सर्वरोगसिराविद्धो बुवा पश्चादयुद्ध सः ॥ १७३ हयान्प्रतिष्कशीकृत्य धनुस्तकपिशीर्षकम् । अयुध्यत पुनः सुष्ठु तदा द्विगुणयन्त्रणम् ॥ १७४ जयोऽयात्साऽनुजस्तावदाविष्कृत्य यमाकृतिम् । कण्ठीरवमिवारुह्य हयमस्युद्यतः क्रुधा ॥ १७५ वाहयन्तं तमालोक्य कल्पान्तज्वालिभीषणमा विवेश विद्विडश्वाली वेलेव स्वबलाम्बधिम ॥१७६ चिरात्पर्यायमासाद्य प्रनृत्यत्केतवो रथाः । जविभिर्वाजिभिव्यूढाः प्राधावन्विद्विषं प्रति ॥ १७७
त्यावेळी वर उसळलेली व रक्ताने रंगलेली जी तरवाररूपी चंचल पाने त्यांनी आकाशरूपी वृक्ष असा शोभू लागला की जणु त्याच्यावर पुनः पालवी फुटली आहे ॥ १६९ ॥
___ तरवारीच्या मोठ्या प्रहाराने घोडेस्वारांची मस्तके तुटून कोठे तरी पडल्यामुळे घोडे स्वारांनी रहित झाले. शून्यासन असे ते घोडे मालकांची मस्तके जणु हुडकण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागले ।। १७० ।।
हे घोडे म्हणजे शिंगानी रहित पशु आहेत असे समजून दयेने कोणी योद्धयाने त्यांना मारले नाही. पण क्रुद्ध होऊन आपल्या दातांनी व पायानी एकमेकाना त्यानी मारले ॥ १७१।।
त्या युद्धात कित्येक योद्धे रागावून जणु अखण्ड लोखंडाच्या काठीप्रमाणे असलेले व ज्यांच्यापासून तरवारी निघून गेल्या आहेत अशा वेळूच्या काठ्यांनी दीर्घकालपर्यन्त धैर्याने लढले ॥ १७२॥
मस्तकावर जोराचा आघात झाल्यामुळे ज्याला आंधळेपणा प्राप्त झाला आहे असा कोणी योद्धा गळ्याच्या पाठीमागचा भाग आपल्या हस्तस्पर्शाने शाबूत आहे असे जाणून रागाने लढला ।। १७३ ॥
त्यावेळी कोणी योद्धा घोड्यांचे साहाय्य घेऊन व कपिशीर्षक नांवाचे धनुष्य घेऊन चांगल्यारीतीने दुप्पट युद्ध करू लागला ॥ १७४ ॥
जयकुमार आपल्या सर्व धाकट्या भावासह तरवार उगारून व सिंहासारख्या घोड्यावर बसून क्रोधाने यमासारखी आकृति धारण करून निघाला ॥ १७५ ॥
घोड्यावर स्वार झालेल्या व कल्पान्तकालाच्या अग्नीप्रमाणे भयंकर अशा जयकुमाराला पाहून शत्रूच्या घोड्यांची पंक्ति तरङगाप्रमाणे आपल्या सेनारूपी समुद्रात घुसली ॥ १७६ ।।
ज्यांच्यावरील पताका नृत्य करीत आहेत व ज्यांना वेगवान घोडे जुंपले आहेत असे रथ पुष्कळ वेळाने आपली पाळी आली ती प्राप्त करून शत्रूवर धावू लागले ।। १७७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org