________________
५७४)
महापुराण
(४४-१८७
प्रज्वलन्तं जयन्तं ते जयं तं सोदुमक्षमाः । सह सर्वेऽपि सम्पेतुरभ्यग्नि शलभा इव ॥१८७ सन्नद्धस्यन्दनाश्चण्डास्तदा हेमाङ्गदादयः । कोदण्डास्फालनाध्वाननिरुद्धहरितः क्रमात् ॥ १८८ वह्निवृष्टि वा बाणवृष्टि प्रतिद्विषः । यावत्ते लक्ष्यतां नेयुस्तावदाविष्कृतोद्यमाः ॥ १८९ मिरुध्यानन्तसेनादिशरजालं रणार्णवे । स्यन्दनाश्चोदयामासुः पोतान्या वातरंहसः ॥१९० बलद्वयास्त्रसङघट्टसमुत्पन्नाशुशक्षणिम् । पेतुर्वाहाः परं तेजस्तेजस्वी सहते कथम् ॥ १९१ अन्योन्यं खण्डयन्ति स्म तेषां शस्त्राणि तद्रणे । नैकमप्यपरान्प्राप चित्रमस्त्रेषु कौशलम् ॥ १९२ न मृता वणिता नैव न जयो न पराजयः । युद्धमानेष्वहो तेषु नाहवोऽप्याहवायते ॥ १९३ मुद्धवाप्येवं चिरं शेकुर्न जेतुं ते परस्परम् । जयः सेनाद्वये तस्मिन्जयावन्येन दुर्लभः ॥ १९४
चोहीकडे चमकणारा व सर्वत्र जय मिळविणाऱ्या त्या जयकुमाराला अर्थात् त्याच्या पराक्रमाला सहन न करणारे ते वीर जसे अग्नीवर पतंग आक्रमण करतात तसे त्याच्यावर चालून आले ॥ १८७ ॥
ज्यांनी आपले रथ सज्ज केले आहेत व धनुष्यांच्या दोरीच्या टंकारानी ज्यांनी सर्व दिशा शब्दमय केल्या आहेत अशा प्रचंड हेमाङ्गदादि वीरांनी क्रमाने प्रत्येक शत्रूवर अग्निवृष्टीप्रमाणे बाणवृष्टि केली व जोपर्यन्त ते आपल्या दृष्टीच्या मार्गातून वेगळे झाले नाहीत तोपर्यन्त आपला प्रयत्न-उद्योग चालू केला ॥ १८८-१८९ ।।
त्या वीरांनी अनन्तसेन वगैरे राजांच्या बाणसमूहाला अडवून रणसमुद्रात वायुप्रमाणे वेग ज्यांचा आहे अशा रथाना नावेप्रमाणे पळविले ॥ १९० ॥
दोन्ही बाजूंच्या सैन्यांच्या शस्त्रांच्या संघर्षाने उत्पन्न झालेल्या अग्नीवर घोड्यानी आक्रमण केले. बरोबरच आहे की, जे तेजस्वी असतात ते दुसऱ्याच्या तेजाला कसे बरे सहन करतील ? मुळीच सहन करणार नाहीत ॥ १९१॥
त्या युद्धात दोन्ही बाजूंच्या वीराकडून एकमेकाच्या शस्त्रांचे छेदन केले जात होते. एक देखील शस्त्र कोणाच्या अंगाला लागले नाही. कारण त्या वीराचे अस्त्रशस्त्रादिकाविषयीचे कौशल्य आश्चर्यकारक होते ॥ १९२ ॥
त्या युद्धात कोणी मेले नाहीत व कोणी जखमी झाले नाहीत. कोणाला जय मिळाला नाही व कोणाचा पराजय झाला नाही. ते वीर लढत असता ते युद्ध युद्धाप्रमाणे वाटले नाही ॥ १९३ ॥
याप्रमाणे बराच कालपर्यंत ते वीर लढून देखील एकमेकांना जिंकण्यास समर्थ झाले नाहीत. त्या दोन्ही सैन्यामध्ये जयकुमाराशिवाय इतरांना जय मिळणे दुर्लभ झाले ॥ १९४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org