Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-२०३)
महापुराण
(५७५
अन्तर्हासो जयस्सर्व तत्तवालोक्य लीलया। शरैः संच्छादयामास सैन्यं पुत्रस्य च क्रियाः ॥ १९५ निष्पन्दीभूतमालोक्य चक्रिसूनुः स्वसाधनम् । रक्तोपलदलच्छायामुच्छिद्य नयनत्विषा ॥ १९६ जयः परस्य नो मेऽद्य जयो जयमहं रणे। विध्वस्य भुवने शुद्धमाकल्पं स्थापये यशः॥ १९७ विदधाम्यद्य नाथेन्दुप्रसरवंशवर्धनम् । जयलक्ष्मीर्वशीकृत्य विधेयान्मेऽधुना सुखम् ॥ १९८ ब्रुवन्स कल्पनादुष्टमिति स्वानिष्टसूचनम् । द्विपं प्रचोदयामास क्रुधे वा जयमात्मनः ॥ १९९ प्रतिवातसमुद्भूतपश्चागतपताकिकाः । मन्दमन्दं कृणद्घण्टाः कुण्ठितस्वबलोत्सवाः ॥ २०० संशुष्यदाननिष्यन्दकटदीनाननश्रियः । निर्वाणालातनिर्भासनिःशेषास्त्रभरक्षमाः ॥ २०१ आषोरणः कृतोत्साहैः कृच्छुकृच्छ्रण चोदिताः। आक्रन्दमिव कुर्वन्तः कुण्ठितः कण्ठजितैः ॥२०२ भीतभीतायुषोऽन्यश्च चिह्नरशुभसूचिभिः । गजा गतजवाश्चेलुरचला इव जङ्गमाः ॥ २०३
हे सर्व पाहून जयकुमार मनात हसला व त्याने चक्रवर्तीच्या पुत्राचे सैन्य आपल्या बाणांनी आच्छादून टाकले ॥ १९५ ॥
आपले सैन्य हालचालीने रहित झाले आहे असे अर्ककीर्तीने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या डोळ्यांच्या कान्तीने तांबड्या कमलाच्या पाकळीची कान्ति नष्ट केली अर्थात् त्याचे डोळे फारच लालबुंद झाले व तो असे म्हणाला आज दुसऱ्याचा जय होणार नाही. आज माझा जय होणार आहे. मी आज रणामध्ये जय मिळवीन. आज जयकुमाराचा युद्धामध्ये नाश करून या जगामध्ये कल्पान्तापर्यन्त माझे निर्मल यश स्थापीन. आज नाथवंश व सोमवंशचंद्रवंश याचा प्रसार मी छाटून टाकणार आहे. जयलक्ष्मी मला वश करून मला सुखी करील असे अर्ककीर्ती बोलला. त्याचे हे भाषण कल्पनेने दुष्ट व त्याचेच अनिष्ट सूचित करणारे होते. याप्रमाणे बोलून क्रोधाने जणु आपला पराजय असा हत्ती त्याने युद्धात प्रेरिला ।। १९६-१९९॥
तोंडासमोर येणाऱ्या वाऱ्याने उडविल्यामुळे ज्यांच्यावरील पताका मागे जाऊ लागल्या आहेत, ज्यांच्या गळ्यातील घंटा मंदमंद आवाज करीत आहेत, ज्यांची शक्ति व उत्साह हे कमी झाले आहेत, मद पाझरणे शुष्क झाल्यामुळे ज्यांच्या गंडस्थल व मुखाची शोभा दीन झाली आहे, विझलेल्या अग्निचक्राप्रमाणे निस्तेज झाल्यामुळे जे शस्त्रास्त्राचे ओझे वाहण्यास असमर्थ झाले आहेत, उत्साहाला उत्पन्न करणान्या महांतानी मोठ्या कष्टाने ज्याना प्रेरित केले आहे, कुंठित झालेल्या कंठातील गर्जनेमुळे जे जणु रडत आहेत की काय? जे युद्धापासून जणु भ्याले आहेत अशा अशुभ सूचक चिह्नांनी वेगरहित झालेले जणु चालणारे पर्वत असे हत्ती चालू लागले ॥ २००-२०३ ॥
मंद जातीचे हत्ती अधिक मंद चालू लागले आणि मृगजातीचे हत्ती युद्धभीतीने मंद चालू लागले व भद्र जातीचे हत्ती काही कारण नसता मंद चालू लागले. हे याप्रसंगी अशुभ सूचक झाले ॥ २०४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org