________________
४४-१५२)
दूरपाताय नो किन्तु दृढपाताय खेचरैः । खगाः कर्णान्तमाकृष्य मुक्ता हन्युद्विपादिकान् ।। १४५ अधोमुखाः खगैर्मुक्ता रक्तपानात्पलाशनात् । पृषत्काः सांहसो वेयुर्नरकं वावनेरधः ॥ १४६ भूमिष्ठनिष्ठुरं क्षिप्ता द्विष्टानुत्कृष्य यष्टयः । ययुर्दूरं दिवं द्वतीदेशीया दिव्ययोषिताम् ॥ १४७ चक्रिणश्चक्रमेकान्तं न ततः कस्यचित्क्षतिः । चक्रेशकालचक्राभर्बहवस्तत्र जघ्निरे ॥ १४८ समवेगैः समं मुक्तैः शरैः खेचरभूचरैः । व्योम्न्यन्योन्यमुखालग्नः स्थितं कतिपयक्षणान् ॥ १४९ खभूचरशरंश्च्छते खे परस्पररोधिभिः । अन्योन्यावीक्षणे तेषामभूद्रणनिषेधनम् ॥ १५० स्वास्त्रैः शस्त्रैर्नभोगानां शरैश्चाबाधितं भृशम् । स्वसैन्यं वीक्ष्य खोत्क्षिप्त वीक्षणोप्राशुशुक्षणिः ॥ १५१ सद्यः संहारसङक्रुद्धसमवतसमो जयः । प्रारब्ध योद्धुं वज्रेण वज्रकाण्डेन वज्रिवत् ।। १५२
महापुराण
बाण दूर जावेत म्हणून नव्हे तर त्यांचा जबर आघात व्हावा म्हणून विद्याधरानी कानापर्यन्त ते बाण ओढून सोडले तेव्हा त्यानी हत्ती वगैरेना ठार मारले ।। १४५ ।।
(५६९
जेव्हा विद्याधरानी खाली ज्यांची तोंडे आहेत असे बाण सोडले तेव्हा ते रक्त प्याल्याने व मांस खाण्याने जणु पापी झालेले या पृथ्वीच्या खाली जणु नरकात गेले की काय असे वाटले ।। १४६॥
जमिनीवरच्या वीरानी जोराने धनुष्यांच्या दोरी ओढून फेकलेल्या बाणयष्टि जणु बाणकाठ्या देवांगनांच्या दासीप्रमाणे वर स्वर्गात गेल्या की काय अशा दिसल्या ।। १४७ ॥
चक्रवर्तीचे चक्र ते चक्रवर्तीनेच सोडले पाहिजे असे एकान्तस्वरूपी होते म्हणून त्याच्यापासून कोणाचा नाश होत नाही, पण त्यावेळी संहारकालाप्रमाणे भासणारी जी अनेक चक्रे त्यानी शत्रुसैन्यातले पुष्कळ हत्ती, घोडे वगैरे सैन्य मारले ।। १४८ ॥
भूमीवरील वीरानी व आकाशातील विद्याधरानी एकदम सोडलेले समवेगाचे बाण आकाशात एकमेकाच्या मुखाला लागून थोडा वेळपर्यन्त ते तेथे राहिले ।। १४९ ।।
विद्याधर व भूगोचरी अशा बाणानी आकाशात एकमेकाना अडविले. त्यामुळे एकमेकांचे दर्शन न झाल्यामुळे युद्ध बंद पडू लागले ।। १५० ।।
Jain Education International
आपली आणि शत्रूंची शस्त्रे विद्याधरांचे बाण यानी आपले सैन्य अतिशय पीडिले गेले असे पाहून जयकुमाराने आपले डोळेरूपी उग्र अग्नि वर करून पाहिले व तत्काल संहार करण्यासाठी रागावलेल्या यमाप्रमाणे जयकुमाराने इन्द्र जसा वज्राने लढतो तसे आपल्या वज्रकाण्ड नांवाच्या धनुष्याने युद्धास प्रारंभ केला ।। १५१-१५२ ।।
म. ७२
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org