Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-१३७)
महापुराण
(५६७
धारा वीररसस्येव रेजे रक्तस्य कस्यचित् । पतन्ती सततं धैर्यादाश्वनत्पाटिताशुगम् ॥ १३१ सायकोद्धिन्नमालोक्य कान्तस्य हृदयं प्रिया। परासुरासीच्चित्तेऽस्य वदन्तीवात्मनः स्थितिम्॥१३२ छिन्नदण्डैः फलैः कश्चित्सर्वाङ्गीणैर्भटाग्रणीः । कोलितासुरिवाकम्प्रस्तथैव युयुधे चिरम् ॥ १३३ विलोक्य विलयज्वालिज्वालालोलशिखोपमैः । शिलीमुखैर्बलं छिन्नं स्वं विपक्षधनुर्धरैः ॥ १३४ गृहीत्वा वज्रकाण्डाख्यं सज्जीकृत्य शरासनम् । स्वयं योध्दं समारब्ध सक्रोधः सानुजो जयः ॥१३५ कर्णाभ्यर्णीकृतास्तस्य गुणयुक्ताः सुयोजिताः । पत्रेलघुसमुत्थानाः कालक्षेपाविधायिनः ॥ १३६ मार्गे प्रगुणसञ्चाराः प्रविश्य हृदयं द्विषाम् । कृच्छार्थ साधयन्ति स्म निसृष्टार्थसमाः शराः॥१३७
धैर्याने एका वीराने आपल्या शरीरातून बाण उपटून बाहेर काढला त्यावेळी त्या बाणाच्या पाठोपाठ त्याच्या शरीरातून रक्ताची धारा बाहेर आली व ती त्याच्या वीररसाची धारा जणु आहे अशी शोभली ।। १३१ ॥
बाणाने आपल्या पतीचे हृदय फुटले हे पाहून त्याची प्रिय पत्नी त्याच्या अन्तःकरणात आपली स्थिति होती- आपण तेथे राहत होतो असे जणु बोलणारी ती प्राणरहित झाली।।१३२॥
ज्यांचे दांडे तुटले आहेत व जे सर्व शरीरात घुसले आहेत अशा बाणांच्या टोकानी ज्याचे सर्वांग विद्ध झाले आहे असा कोणी योद्धा जणु त्या बाणाच्या टोकानी त्याचे प्राण त्या शरीराला खिळयानी ठोकून बद्ध केल्याप्रमाणे बरेच वेळ तो योद्धा निश्चल होऊन युद्ध करीत राहिला ॥ १३३ ।।
शत्रूच्या धनुर्धारी योद्धयानी प्रलयकालाच्या जळत असलेल्या अग्नीच्या प्रकाशमान चंचल ज्वालाप्रमाणे असलेल्या बाणानी आपले सैन्य छिन्नभिन्न केले आहे हे पाहून जयकुमाराने आपल्या धाकट्या भावाना बरोबर घेऊन व आपले वज्रकाण्ड नांवाचे धनुष्य सज्ज करून क्रोधाने स्वतः लढण्यास सुरुवात केली ॥ १३४-१३५ ॥ ___त्यावेळी जयकुमारचे बाण नि:सृष्टार्थ- उत्तम दूताप्रमाणे दिसत होते. कारण उत्तम
II कानाजवळ राहतात अर्थात त्यांच्या कानामध्ये अभिप्राय सांगतात. तसे बाण देखिल जयकुमाराच्या कानाजवळ राहत होते. अर्थात् कानापर्यन्त बाण ओढले जाऊन जयकुमार त्याना सोडीत होता. जसे उत्तम दूत गुण अर्थात् रहस्यमय गोष्टीचे रक्षण करतात तसेच त्याचे बाण देखिल गुणाने दोरीने युक्त होते. जशी उत्तम दूताची योजना चांगल्या त-हेने केली जाते तशी बाणाची योजनाही उत्तम केली जाते. जसे उत्तम दूत पत्र घेऊन शीघ्र उठून उभा राहतो तसे बाण देखिल आपल्या पंखानी शीघ्रशीघ्र वेगाने जात होते. जसा उत्तम दूत दीर्घकाल दवडीत नाहीत तसे बाण देखिल आपल्या पंखानी जल्दी वेगाने शत्रूवर जाऊन पडत होते. जसे उत्तम दूत मार्गाने सरळ जातात तसे बाण देखिल सरळ जात होते. जसे उत्तम दूत शत्रूच्या हृदयात प्रवेश करून आपल्या राजाचे कठिणातही कठिण अशा कार्याची सिद्धि करून देतात. तसे उत्तम बाण देखिल शत्रूच्या हृदयात घुसून कठिणात कठिण अशा कार्याची सिद्धि करून देतात ।। १३६-१३७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org