________________
५६६)
महापुराण
(४४-१२५
प्रगुणा मुष्टिसंवाह्या दूरं दृष्टयनुवर्तिनः । गत्वेष्टं साधयन्ति स्म सद्भत्या इव सायकाः ॥ १२५ प्रयोज्याभिमुखं तीक्ष्णान्बाणान्परशरान्प्रति । तत्रैव पातयन्ति स्म धानुष्काः सा हि घोषियाम्॥१२६ जाताश्चापधताः केचिदन्योन्यशरखण्डने । व्यापृताः श्लाषिताः पूर्व रणे किञ्चित्करोपमाः॥१२७ हस्त्यश्वरथपत्योघमुद्भिद्यास्पष्टलक्ष्यवत् । शरा:पेतुः स्वसम्पातमेवास्ता दृढमुष्टिभिः ॥ १२८ पूर्व विहितसन्धानाः स्थित्वा किञ्चिच्छरासने। यानमध्यास्य मध्यस्था द्वैधीभावमुपागताः ॥ १२९ विग्रहे हतशक्तित्वादगत्या शत्रुसंश्रयाः । बाणा गुणितषाड्गुण्या इव सिद्धि प्रपेदिरे ॥ १३०
प्रगुण- चांगल्या धनुष्याच्या दोरीवर जोडलेले, मुष्टिसंवाह्य- मुठीत धरता येणारे व दृष्टयानुवर्ती ज्याच्यावर आपण दृष्टि लावली असेल तेथे जाणारे, असे बाण प्रगुण-गुणवान् मुष्टिसंवाह्य- मालकाने मुठी भरून दिलेल्या अन्नावर निर्वाह करणारे आणि दृष्टयनुवर्ती मालकाच्या नजरेकडे पाहून वागणारे अशा सद्गुणी सेवकाप्रमाणे दूरच्या प्रदेशात जाऊन आपल्या मालकाचे इच्छित कार्य ( शत्रूचा नाश करणे ) साधीत होते ।। १२५ ॥
धनुर्धारी वीर आपल्यासमोर असलेल्या शत्रूवर तीक्ष्ण बाण सोडीत असत आणि स्याचे बाण तेथेच पाडीत असत. हे योग्यच आहे कारण शत्रूची अशीच बुद्धि असावी लागते ।। १२६ ॥
___ धनुष्याच्या दोरीवर जोडलेले व एकमेकांचे बाण तोडण्यामध्ये उपयोगात आणलेले आणि ते सोडण्याच्या पूर्वी ज्यांची प्रशंसा केली आहे असे ते बाण युद्धात सेवकाप्रमाणे आपले कार्य बजावित होते ॥ १२७ ।।
ज्यांच्या मुठी बळकट आहेत अशा वीरपुरुषानी सोडलेले बाण वेगामुळे ज्यांचे लक्ष्य स्पष्ट दिसत नाही असे बाण हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ सैन्य यांच्या समूहाला भेदून म्हणजे यापैकी कशातही शिरून ते आपल्या पडावयाच्या योग्य लांबीवरच पडत असत. भावार्थ- त्या बाणात वेग इतका होता की मध्ये आलेल्या हत्ती वगैरेना विद्ध करून देखिल आपल्या वेगाना अनुसरून योग्य अशा अन्तरावर ते जाऊन पडत असत ॥ १२८ ॥
सन्धि, विग्रह आदिक सहा गुणानी राजे जसे स्वकार्य सिद्ध करतात तसे ते बाण देखिल संधि आदिक सहा गुणाना धारण करून सिद्धीला प्राप्त झाले होते. जसे राजे प्रथम सन्धि करतात तसे ते बाणही धनुष्याच्या दोरीशी प्रथम सन्धि करतात - संबंध करतात. जसे राजे आपल्या परिस्थितीला अनुसरून काही कालपर्यन्त स्वस्थ राहतात तसे ते बाण काही कालपर्यन्त धनुष्याच्या दोरीवर स्वस्थ राहतात. जसे राजे युद्धासाठी आपल्या स्थानातून प्रयाण करतात तसे ते बाण धनुष्याच्या दोरीपासून प्रयाण करतात. जसे राजे लोक मध्यस्थ बनून द्वैधीभाव धारण करतात अर्थात् भेदनीतीच्या द्वारे शत्रूमध्ये फूट पाडतात तसे हे बाण शत्रूवर पडून मध्यस्थ होतात अर्थात् शत्रूच्या शरीरात घुसतात व द्वैधीभावाला प्राप्त होतात. शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करतात व राजे जसे शत्रूचे युद्ध करण्याचे सामर्थ्य संपले असे जाणून त्याला वश करतात तसे हे बाण देखिल शत्रूला वश करीत होते ॥ १२९-१३० ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org