Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५६४)
महापुराण
(४४-११३
अष्टचन्द्राः खगाः ख्याताश्चक्रिणः परितः सुतम् । शरीररक्षकत्वेन भेजुर्विद्यामदोद्धताः ॥ ११३ अकालप्रलयारम्भजम्भिताम्भोदजितम् । निजित्य तूर्ण तूर्याणि दध्वनः सेनयोः समम् ॥ ११४ धानुष्कर्मार्गणः मार्गः समरस्य पुरःसरः । प्रवर्तयितुमारेभे घोरघोषैः सवल्गितम् ॥ ११५ सङग्रामनाटकारम्भसूत्रधारा धनुर्धराः । रणरङ्ग विशन्तिस्य गर्जत्तूर्यपूरःसरम् ॥ ११६ आबध्यस्थानकं पूर्व रणरङ्ग धनुर्धरैः । पुष्पाञ्जलिरिव व्यस्तो मुक्तः शितशरोत्करः ॥ ११७ तीक्ष्णा मण्यिभिघ्नन्तः पूर्व कलहकारिणः । पश्वात्प्रवेशिनः पश्चात्खलकल्पा धनुर्भूतः ॥ ११८ उभयोः पार्श्वयोबैदवा बाणधीकृतवल्गनाः । धन्विनः खेचराकारारेजराजौ जितश्रमाः ॥ ११९
भरतचक्रवर्तीच्या मुलाच्या-अर्ककीर्तीच्या सभोवती विद्यामदाने उद्धत्त झालेले प्रसिद्ध असे अष्टचन्द्र विद्याधर शरीररक्षक म्हणून उभे राहिले. अंगरक्षक म्हणून त्याची सेवा करू लागले ॥ ११३ ॥
अकाली प्रलय करण्याकरिता वाढलेल्या मेघाच्या गर्जनेला जिंकून दोन्ही सैन्यातील वाद्ये एकदम त्वरेने वाजू लागली ।। ११४ ॥
युद्धाच्या पुढे असलेले - पुढे पुढे जाणारे व भयंकर गर्जना करणारे अशा धनुर्धारी वीरानी आपल्या बाणांच्या द्वारे उसळी मारून पुढील मार्ग तयार केला. अर्थात् धनुर्धारी योद्धयानी बाणवृष्टि करून पुढील गर्दी हटविली आणि आपला पुढे सरकण्याचा रस्ता मोकळा केला ॥ ११५ ॥
युद्धरूपी नाटकाला आरंभिणारे जणु सूत्रधार अशा धनुर्धारी वीरानी गर्जना करणाऱ्या वाद्यांना पुढे करून युद्धाच्या रंगभूमीवर प्रवेश केला ।। ११६ ॥
धनुर्धारी पुरुष उभे राहण्याच्या पद्धतीप्रमाणे उभे राहिले रणरूपी रंगभूमीवर जो तीक्ष्ण बाणांचा समूह सोडला तो जणु पुष्पांजलीप्रमाणे चोहीकडे पसरला ॥ ११७ ॥
धनुष्यावर जोडलेले बाण नेहमी दुष्टाप्रमाणे वाटत होते. कारण दुष्ट माणसे तीक्ष्ण स्वभावाचे असतात तसे हे बाणही तीक्ष्ण - खूरधारेचे होते. दुष्ट जसे लोकांच्या मर्माला विद्ध करतात तसे हे तीक्ष्ण बाणही मर्मभेदन करीत होते. जसे दुष्ट लोक तंटा करतात तसे हे बाण देखील कलह करतात, क्रोधयुक्त करतात. जसे दुष्ट प्रथमतः मधुरवचन बोलून नंतर मनात घुसतात तसे हे बाणही सूं सूं असा शब्द करीत हृदयात घुसतात म्हणून धनुर्धारी खलकल्प-दुर्जनाप्रमाणे आहेत ॥ ११८ ॥
आपल्या पाठीच्या दोन्ही बाजूला बाणांचे भाते बांधून जे उड्या मारीत आहेत व ज्यानी परिश्रमाला जिंकले आहे असे धनुर्धारी लोक, त्या युद्धात पक्ष्याप्रमाणे शोभत होते ॥ ११९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org