________________
४४-११२)
महापुराण
कुर्वन्ती शान्तिपूजां त्वं तिष्ठ मात्रेति सादरम् । प्रवेश्य चैत्यधामाग्र्चं सुतां नित्यमनोहरम् ॥ १०४ समग्रबलसम्पत्त्या चचाल चलयन्निलाम् । अकम्प्रः कम्पितारातिः माकम्पनिरकम्पनः ॥ १०५ सुकेतुः सूर्यमित्राख्यः श्रीधरो जयवर्मणा । देवकोतिर्जयं जग्मुरिति भूपाः सुसाधनाः ॥ १०६ इमे मुकुटबद्धेषु पञ्च विख्यातकीर्तयः । परे च शूरा नाथेन्दुवंशगृह्याः समाययुः ॥ १०७ मेघप्रभश्च चण्डातिप्रभाव्याप्तवियत्तलः । विद्याबलोद्धतः सार्धमर्के विद्याधरैरगात् ॥ १०८ बलं विभज्य भूभागे विशाले सकलं समे । प्रकृत्य मकरव्यूह विरोधिबलघस्मरः ॥ १०९ उच्चजिता घनिर्यनिर्घोषभीषणम् । जितमेघस्वरो गजेन्रेजे मेघस्वरस्तदा ॥ ११० चक्रव्यूहविभक्त्यात्मभूरिसाधननध्यगः । अर्ककीर्तिश्च भाति स्म परिवेषाहितार्कवत् ॥ १११ क्रुद्धाः खे खेचराधीशाः सुनमिप्रमुखाः पृथक् । गरुडव्यूहमापाद्य तस्थुश्चक्रिसुताज्ञया ॥ ११२
बाळे सुलोचने, तू आपल्या आईबरोबर आदराने शान्तिपूजा करीत बस असे म्हणून तिला नित्यमनोहर नांवाच्या श्रेष्ठ जिनमंदिरात अकम्पन राजाने पाठविले आणि स्वतः अकंप राहून ज्याने शत्रूना थरथर कंपित केले आहे असा अकम्पनराजा आपल्या पुत्राला घेऊन लढाईला निघाला, आपल्या संपूर्ण सैन्याने पृथ्वीला कंपित करीत रणभूमीकडे निघाला ।। १०४-१०५ ॥
सुकेतु, सूर्यमित्र, श्रीधर, जयवर्मा आणि देवकीति हे राजे आपले उत्तम सैन्य घेऊन जयकुमाराकडे गेले. हे पाच राजे मुकुटबद्ध राजामध्ये प्रख्यात कीर्तीचे धारक होते आणि इतर अनेक शूर राजे देखिल नाथवंश व चंद्रवंशाचा पक्ष धरून लढण्यास आले ॥१०६-१०७।।
आपल्या भयंकर तरवारीच्या कान्तीने ज्याने आकाशाचा तळभाग व्यापला आहे व जो विद्यांच्या सामर्थ्याने उद्धत आहे, असा मेघप्रभ नामक विद्याधरराजा सर्व विद्याधरराजापैकी निम्मे विद्याधर राजे घेऊन जयकुमाराकडे आला ॥ १०८ ॥
विरोधी राजांच्या सैन्याचा फन्ना उडविणारा, उत्कृष्ट वाद्यसमूहापासून निघणाऱ्या आवाजाप्रमाणे भयंकर गर्जना करणारा व ज्याने मेघांचा गडगडाट जिंकला आहे अशा जयकुमाराने विशाल व सपाट अशा जमिनीवर आपल्या सैन्याची विभागणी केली व मकर व्यूहाची-मगराच्या आकृतीप्रमाणे सैन्यरचना केली ॥ १०९-११० ॥
इकडे अर्ककीर्तीने आपल्या पुष्कळ सैन्याची चक्राप्रमाणे रचना केली व त्या चक्रव्यूहाच्या मध्यभागी तो ज्याच्या सभोवती खळे निर्माण झाले आहे अशा सूर्याप्रमाणे शोभू लागला आणि चक्रवर्तीचा पुत्र अशा अर्ककीर्तीच्या आज्ञेने जे सुनमि वगैरे विद्याधरराजे प्रमुख आहेत त्यानी आकाशात गरुडव्यूहाची रचना केली व त्या रचनेत ते वेगवेगळे राहिले ।। १११-११२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org