Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४-९४
द्रोणादिप्रक्षयारम्भघनाघनघनध्वनिम् । तद्ध्वनिर्व्याप निर्जित्य विभिद्य हृदयं द्विषाम् ॥ ९४ तद्रवाकर्णनाद्धूणितार्णवप्रतिमे बले । अतिमालोत्सवोऽत्रासीदुत्सवो विजये यथा ।। ९५ तदोन्निकटप्रान्तप्रक्षरत्मदपायिनः । स्वमदनेव मातङ्गाः प्रोत्तुङ्गाः प्रोन्मदिष्णवः ।। ९६ सुस्वनन्तः खनन्तः खं वाजिनो वायुरंहसः । कृतोत्साहा रणोत्सहाद्रेजुस्तेजस्विता हि सा ॥ ९७ रथाः प्रागिव पर्यस्ताः पूर्णसर्वायुधा युधः । महावाहसमायुक्ताः प्रनृत्यकेतुबाहवः ॥ ९८ योषितोऽप्यभटायन्त पाटवात्संयुगं प्रति । तथा प्रतिबलं तत्र भूयांसो वा पदातयः ॥ ९९ वर्धमानो ध्वनिस्तुर्ये रणरङ्गे भविष्यतः । वीरलक्ष्मीप्रनृत्तस्य प्रोद्ययौ गुणयत्रिव ॥ १०० वनान्वयं वयः शिक्षालक्षणंर्वीक्ष्य विग्रहम् । सुधर्माणं सुवर्माणं कामवन्तं क्षरन्मदम् ॥ १०१ सामजं विजयार्द्धाख्यं विजयार्द्धमिवापरम् । बहुशो दृष्टसङ्ग्रामं गजध्वजविराजितम् ॥ १०२ अधिष्ठाय जयः सर्वसाधनेन सहानुजः । निर्जगाम युगप्रान्तकाललीलां विलङ्घयन् ॥ १०३
५६२)
महापुराण
त्या नगाऱ्यांच्या शब्दाने द्रोण, काल, पुष्करावर्त वगैरे जे प्रलयकालचे मेघ त्यांची वृष्टि होण्याच्या वेळी होणारा जो गडगडाट त्यालाही जिंकले होते आणि त्याने शत्रूंची हृदये विदीर्ण केली ॥ ९४ ॥
त्या नगान्याचा आवाज ऐकून खवळलेल्या समुद्राप्रमाणे क्षुब्ध झालेल्या सैन्यता शत्रूला जिंकण्याने जसा आनन्द होता तसा आनंद झाला व सुलोचनेने जकुमाराच्या गळयात माला घातली त्यावेळी जो आनंद झाला होता त्याहीपेक्षा अधिक आनन्द यावेळी सैन्यात झाला ।। ९५ ।
त्यावेळी फुटलेल्या गण्डस्थलाच्या जवळच्या प्रदेशातून वाहणारे मदजल पिणारे असे अतिशय उंच हत्ती स्वतःच्याच मदानेच अतिशय उन्मत्त झाले ।। ९६ ।।
याचप्रमाणे मधुर खिंकाळणारे आणि आकाशाला वर टापा करून जणु खणणारे, वायुप्रमाणे वेग ज्यांचा आहे असे उत्साही घोडे रणाच्या उत्साहामुळे फार शोभू लागले. बरोबरच आहे की त्यांचा उत्साह म्हणजे त्याची तेजस्विताच होय ।। ९७ ।।
सर्व आयुधानी पूर्ण भरलेले, ज्याना मोठे घोडे जुंपलेले आहेत असे, ज्यांचे ध्वजरूपी बाहु नृत्य करीत आहेत असे रथ ज्याप्रमाणे मेघकुमारांना जिंकताना सर्व बाजूनी घेरून राहिले होते तसे आता यावेळी सर्व बाजूनी घेरून राहिले ।। ९८ ।।
युद्ध करण्याचे नैपुण्य असल्यामुळे स्त्रिया देखिल वीर बनल्या होत्या. या जयकुमाराच्या सैन्यविभागात पुष्कळ पायदळ मोठे शूर होते ।। ९९ ।।
युद्धरूपी रंगभूमीवर होणारे जे वीरलक्ष्मीचे नृत्य त्याला जणु वृद्धिंगत करणारा असा वाद्यांनी ध्वनि बाहेर येत होता ।। १०० ॥
यानंतर वनात उत्पन्न झालेला, वय, शिक्षण व चांगली लक्षणे धारण करणारा देह ज्याचा आहे असा, चांगल्या स्वभावाचा व उत्तम देहाचा, धारण करणारा इच्छानुकूल वागणारा, ज्याचा मद् गळत आहे, विजयार्धपर्वताप्रमाणे अतिशय उंच व शुभ्र ज्याचे विजयार्ध हे नांवही आहे, ज्याने अनेक युद्धे पाहिली आहेत असा, गजाच्या ध्वजाने जो शोभत आहे असा, अशा त्या विजयार्ध नामक हत्तीवर बसून जयकुमार सर्व सैन्यासह व आपल्या सर्वभावासह निघाला त्यावेळी युगान्त कालाच्या लीलेला जिंकणारा असा शोभत होता ।। १०१-१०३ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org