Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
५६०)
महापुराण
चलद्धरिखुरोद्धट्टकठोरध्वाननिर्भरः । पदातिपद्धतिप्रोद्यभूरिभूरवभीवहः ॥ ७५ स्पन्दरस्यन्दनचक्रोत्थ पृथुचीत्कारभीकरः । धनुः सज्जीक्रिया सक्त गुणास्फालनकर्कशः ॥ ७६ प्रतिध्वनित दिग्भित्तिस्सर्वानकभयानकः । बलकोलाहलः कालमिवाह्नातुं समुद्यतः ॥ ७७ शिक्षिता बलिनः शूराः शूरारूढाः सकेतवः । गजाः समन्तात्सन्नाह्या प्राक्चेलुर चलोपमाः ॥ ७८ तुरङ्गमास्तरङ्गाभाः सङग्रामाब्धेः सवर्मकाः । अनुदन्ति नदन्तोऽयान् विक्रामन्तः समन्ततः ॥ ७९ सचक्रं धेहि संयोज्य सधुरं प्राजवाजिनः । इति सम्भ्रमिणोऽपप्तन् रथास्तदनु सध्वजाः ॥ ८० चण्डाः कोदण्डकुन्तासिप्रासचक्रादिभीकराः । यान्ति स्मानुरथं क्रुद्धा रुद्धविषकाः पदातयः ॥ ८१ मजं गजस्तदोद्घटच वाहो वाहं रथं रथः । पदातयश्च पादातं सम्भ्रमान्निर्ययुर्युधे ॥ ८२
(४४-७५
त्यावेळी चालणाऱ्या घोड्यांच्या टापांचा जमीनीवर आघात होऊन उत्पन्न झालेल्या कठोर ध्वनीनी तो नगाऱ्यांचा ध्वनि खूप मोठा झाला व पायदळ सैन्याच्या पायांच्या आघातानी उत्पन्न झालेले जमीनीचे शब्द त्यानी तो आवाज अधिक भीति उत्पन्न करणारा भासला ।। ७५ ।।
चालणाऱ्या रथाच्या चाकापासून निघालेला जो मोठा करकर शब्द त्यानी नगाऱ्याच्या शब्दात अधिकच भीषणपणा उत्पन्न झाला. वीर पुरुषानी आपली धनुष्ये सज्ज केली तेव्हा त्यांच्या दोरीचा जो झणत्कार त्याने तो नगाऱ्यांचा ध्वनि फार कर्कश वाटू लागला ॥ ७६ ॥
दिशारूपी भिंतीना प्रतिध्वनि युक्त करणारे जे अनेक प्रकारच्या नगाऱ्यांचे आवाज त्यानी भयंकर वाटणारा, त्यात सैन्यांचा कोलाहल मिसळल्यामुळे जणु हा मोठा शब्द यमाला आव्हान देत आहे असा भास उत्पन्न झाला ।। ७७ ।।
त्यावेळी शिकविलेले, बळकट, शूर व ज्यांच्यावर पुरुष बसलेले आहेत असे ध्वजयुक्त व युद्धासाठी तयार झालेले आणि पर्वतासारखे मोठे असे हत्ती प्रथमतः चालू लागले ॥ ७८ ॥
युद्धरूपी समुद्राच्या जणु लाटाप्रमाणे भासणारे व कवचाने सहित असे ते घोडे हत्तींच्या मागून खिंकाळत चोहीकडून जात होते ।। ७९ ।।
चक्रसहित आणि जूनेसहित अशा रथाला घोडे जुंप व त्याना प्रेरणा कर. अशा रीतीने त्वरा करून सज्ज केलेले ध्वजसहित रथ त्या मागून चालू लागले ॥ ८० ॥
धनुष्ये, भाले, तरवारी, कटचार, पट्टा, चक्र वगैरे शस्त्रामुळे भयंकर वाटणारे, ज्यानी सर्व दिशा व्यापल्या आहेत असे पायदळ स्थाना अनुसरून जात होते ॥ ८१ ॥
Jain Education International
त्यावेळी हत्ती हत्तीला, घोडा घोडयाला, रथ रथाला व पायदळ पायदळाला घासून गडबडीने युद्धाकरिता निघाले ॥ ८२ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org